एक पत्र माझ्या महाराजांना.

 


*एक पत्र माझ्या महाराजांना.* 


मला अतिशय प्रिय असलेले श्रीमहाराज ,

मी तुमचे एक हीन दीन आणि खऱ्या अर्थाने अनाथ लेकरु आहे. नाही मला आई वडील. पण जाताना ते तुमच्या सारख्या माऊलीच्या हाती सोपवुन गेले. ते पण आध्यात्मिक होते. लौकिकात व्यवहार असतो तर अध्यात्मात प्रेमभाव. आपल्या सद्गुरूंबद्दल अनन्य निष्ठा. प्रिय पू बाबा त्याला निष्ठा म्हणायचे. मी तेवढी भाग्यवान नाही. मला वेदांत कळत नाही. कळते ते तुमच्या त्या शोनुल्या गोडुल्या रामावरचे प्रेम आणि नाम. नाम माझे हवे तसे होत नाही. त्या बाबतीत मी तुमचे नालायक लेकरु आहॆ !हो ना ? गोंदवल्याच्या रामाचा अति सुंदर खरोखर त्याला जाऊन कुरुवावाळावेसे वाटते. माझ्या कडे त्याची अत्यंत sundarwतसबीर आहे. त्या रामराया कडे बघून मी घळाघळ रडते हो. तो रामराया मागणे नष्ट करतोच. हा अनुभव आहे. कारण तुमचे प्रेम त्याच्यात वसले आहे. तुमचा तो मंचक माझे अत्यंत आवडते स्थान त्यावर डोकं टेकले ना की या अनाथ बाळाच्या डोक्यावरून हात फिरवताना. समाधी मंदिरात रात्री प्रोक्षळ पुजेला असलेली ती विलक्षण शांतता. आणि होणारा जप. समाधी वरची तुळस आणि फुले सर्वच कसे अति मधुर. तो गोपालकृष्ण. म्हणावेसे वाटते. .मधुराधिपते रखिलम मधुरम. आज ह्या जीवनाच्या ह्या टप्प्यावर मी अत्यंत समाधानी आहे. आणि ते अखेरच्या श्वासापर्यंत टिकू द्यावे. महाराजांनी पारमार्थिक खुपश्या इच्छा पुरवल्या आता फक्त एक म्हणावेसे वाटते. .!  

एक वार पंखांवरुनि फिरो तुझा हात. .शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात. 

मेधा (सुरभी )❤️🙏🌹

सुरभि हे माझे सासरचे नाव आहे. 

लिहिलं आहे पण चूक भूल द्यावी घ्यावी. 

श्रीराम समर्थ 🙏

 *लेखिकाचे हे पत्र काही अंशी माझ्या मनातील गूज* 👆

टिप्पण्या