गोष्ट झोपी गेलेला जागा झाल्याची ... गोष्ट विकास च्या जन्माची...
उल्कावर्षाव पाहण्याकरिता छोटी मोठी सर्व मंडळी गच्चीवरती जमली होती .
काळ्याकुट्ट काळोखात चांदण्यांची ही मैफिल रंगली होती .
आकाशातील तुटत्या ताऱ्यांना पाहून छोटी मंडळी काही तरी इच्छा मागत होती .
नभातील उल्कापात मोठी मंडळी ही लक्ष एकवटून पाहत होती .
अवकाशातून आतिषबाजी जनू काही होत होती .
ती रम्य घटना सर्व मंडळी मिळुन उत्साहाने निरखत होती .
उल्कावर्षावाचा जोर अचानक काहीसा थांबला .
सर्व मंडळींचा ही उत्साह काहीसा थंडावला .
शांततेत पाहणाऱ्या मंडळींची हळुच किलबिलाट सुरू झाली .
आता मात्र कंटाळा येतोय! काही मजेशीर खेळूया !
नको या अंधारात खेळ कुठे? आई गोष्ट सांगेल ती आपण ऐकुया !
तुम्हाला माहिती आहे का? पुर्वी असे म्हणायचे तारा तुटला की अद्भुत बालकाचा जन्म होतो ! आई म्हणाली.
बापरे! म्हणजे आज किती जण जन्माला येतील? आम्ही म्हणालो.
जन्मा वरुनच आज तुम्हाला सांगते गोष्ट नवसाने जन्मालेल्या बाळाची.
ही गोष्ट नसूनी सत्य कथा आहे झोपी गेलेला जागा झाला ची.
आताच्या सारखंच नोव्हेंबर महिन्यातील तिसरा आठवड्यातील दुसरा दिवस सोमवारचा .
असंख्य कामे त्यामानाने दिवस फार छोटा कारण हिवाळ्याचा .
त्यावेळच्या प्रभावती नगरीत पाण्याची चिंता नव्हती.
सकाळ-संध्याकाळ दोन वेळा पाणीपुरवठ्याची नळे येतं होती.
अंगणी सडा होताच पाणी भरण्याची लगबग सुरू होते .
स्नान-देव आराधना करूनी स्वयंपाकाची तयारी सुरू होते .
घरच्यांची शाळा-ऑफिस ला जाण्याची गडबड .
वाड्यात दोन दिवसांपासूनी आज असलेला शेजारच्या मुलीच्या साखरपुड्याची धावपळ .
घरचं पुर्ण करता करता साखरपुड्याची ही तयारी चालू होती .
वाडा म्हटला की मालक-मालकीन आणि भाडेकरू ही व्याख्याच मुळी येथे नव्हती .
सुख दुःखात संपुर्ण वाडाच एक कुटुंब होती .
वाड्यातील कार्यक्रमांत सहभाग मालकीण-मालकांचा जनु घरच्यां सम झटत होती .
चारचौघांच गच्च भरलेलं घर हे , वडीलधाऱ्यांच्या आदरामुळे अतिथींची आवक-जावक सदैव चालू होती.
घरी आलेल्या पाहुण्यांचं आदरातिथ्य व कार्य स्थळी मंडळींचा पाहुणचार अशी ताळमेळ लावत कामे सुरू होती .
दिवसभर अगदी आनंदाने गर्भवती ही सोहळा सुख संपन्न करण्यात कष्ट घेत होती .
नियमाप्रमाणे संध्याकाळी पाण्याचा नळ आला , संपलेला हौद-पिंप भरण्यात सुरुवात झाली.
अन् अचानकच गर्भवतीच्या पोटतूनी कळा निघाल्या.
लगबगीने सुनेला दवाखान्यात घेऊन सासुबाई निघाल्या.
डॉक्टरांनी तपासणी करूनी सांगितले , "अजुन बाळंतीण व्हायला अवकाश आहे ."
जन्म होणाऱ्या बाळाच्या आईने सांगितले "डॉक्टर तुम्ही तयारी सुरू करा . मला असह्य वेदना होत आहेत ."
तरीही डॉक्टर साहेब आईचे काही ऐकेना !
आई म्हणतच राहते ,"मी दोन मुलींची आई आहे . मला या कळा बाळांतीण होण्याच्याच असल्याचे जाणवत आहेत ."
डॉक्टरांनी समजावलं , "दिवसभराच्या दगदगीने असंच होतं असतं ना !"
आज्जी ! बाळाच्या जन्माला अजुनही सावकाश आहे.
शेवटी डॉक्टरांनी स्वतःचचं खरं केलं .
गर्भिणी सुनेला सासुबाईं सोबत घरीच पाठवलं .
शेवटी कोणाचा कुठे? कोणत्या वेळी? कोणत्या स्थानी? जन्म होणार हे नियतीने असतं लिहिलेलं .
भाग्यविधाताने ज्याचं त्याचं भाग्य लीला करत आधीच असतं लिहिलेलं .
घरी आल्यावर नियमित प्रमाणे वाड्यातली मंडळी टिव्ही समोर बसलेली होती .
घरात पाहुणे मंडळी मुक्कामी आली होती .
सर्वांच्या जेवण्यासाठी स्वयंपाकाची तयारी सुरू होती.
नुकतेच सहा महिन्यांपूर्वी नौकरी join झालेल्या होणाऱ्या बाळाच्या वडीलांचे साहेब आजोबांच्या सदिच्छा भेटीस आले होते .
घरात म्हटलं तर सगळीकडे नुसती धावपळच चालू होते .
तेव्हढ्यातच इकडे देवघरा समोर आराम करणाऱ्या आईला बाळांपणाच्या कळा चालूच आहे.
तिकडे बाळांचे बाबा सुईनीला घरी आणायला निघालेले आहे .
आजची तारीख सोमवार १७ नोव्हेंबर १९८६ , वेळ रात्रीचे ८:०० वाजले अन् टिव्हीवर मालिका सुरू झाली , " झोपी गेलेला जागा झाला " .
आणि देवा समोर दोन मुलींच्या पाठीवर श्रीकृष्णाच्या नवसाच्या प्रसादाने कुळाचा विकास करण्यासाठी कुलवंशज बाळ जन्माला आला .
दिवस आज हर्षाचा .
दिवस आज उत्कर्षाचा .
दिवस आज नवस पुर्तीच्या प्रसादाचा .
दिवस आज नऊ महिने नऊ दिवस गर्भ जिवापाड सांभाळण्याच्या यशस्वीतेचा .
दिवस आज जननी उद्धाराचा .
दिवस आज नवं नातं नाळेने जोडण्याचा .
दिवस आज नवजात शिशू जन्माचा .
दिवस आज धरणी वरती नवं पाऊल स्पर्शाचा .
दिवस आज नवे रडके-हसरे सूरात मंत्रमुग्धीचा .
दिवस आज घराण्यांची वंशवेल वृद्धिंगतीचा .
दिवस आज पासून पुन्हा गृही बोबडे बोल बोलण्याचा .
दिवस आज पुन्हा घरभर खेळण्यांच्या खुळखुळाटीचा .
दिवस आज पासून पुन्हा चिऊ-काऊची बडबडगीते गुणगुण्याचा .
दिवस आज पुन्हा एकदा आपल्याच बालपणीच्या स्मृती उजाळण्याचा .
दिवस आज पुन्हा देवाच्या कृपेने कृतार्थाचा .
बाळाच्या रडण्याच्या आवाजाने आनंदाचे आश्चर्य वाटले.
अरे! सुईन येण्याच्या आधीच घरच्या घरीच बाळ सुखरूप जन्माले .
आई मुलाची अतुट नाळ वेगळी करुनी दवाखान्याला सायकल रिक्षेत बाळ - बाळांतीण अन् सुईन आणि मागेमागे वडील आज्जी नी काकू लगबगीने निघाले .
दवाखान्यात जाताच बाळांतीण म्हणाली , " डॉक्टर मी म्हटले होते ना ! शेवटी माझी फजिती केलीत ."
खरंच मी चुकलो ! यावेळेस माझा अनुभव बाळाने चुकवीला .
तोपर्यंत अजान असलेल्या बाबांनी आज्जीला प्रश्न विचारला , " या सर्व धावपळीत विचारायचचं राहिलं मला कोण झालं आई !"
" अरे बाबा ! आता तुला म्हटल्याप्रमाणे पुजेत चांदीचा श्रीकृष्ण घ्यावा लागेलच . श्रीकृष्ण नवसाला पाऊण प्रसाद दिला . तुझा विकास करण्यासाठी तुला मुलगा झाला रे बाळाचा बाबा ! "
आजोबा-काका-काकू - मोठ्या भावा-बहिणींनी साखर पेढे वाटूनी नव्या बाळाच्या आगमनाचा आनंद उत्सव साजरा केला .
आजोळी कळताच आज्जी-आजोबा-मामा-मावश्यां-आत्यांनी ही बाळाला अनेक आशिरवदनेचा निरोप पाठवला.
पिवळ्या रंगाच्या फ्रॉक च्या पाठीवर लाल रंगाचा पंजा असा पोशाख सुरेख घालुनी दोन जपानी गुड़ीया आपल्या लहान भावाला भेटायला आल्या .
" आई बाळ किती गोरेपान अन् माऊमाऊ आहे ना ! " त्या बाळाच्या बहिणी म्हणाल्या .
परभणी च्या गावात होतं भलंमोठं पोस्ट ,
आणि इथेच बाळाच्या जन्माची झाली आमची संपुर्ण गोष्ट .
आई ही एवढी मजेशीर आहे तरी कोणाची गोष्ट .
आई म्हणते , " त्या वेळी बाळ कसं हसरं मुसरं होतं .
आता पाहा ना ! कसं आईवर रुसलं आहे .
रुसु बाई रुसू .
कोपऱ्यात बसू .
गालावर आलंय खुदकन हसू ..
चला आपण सर्व जण त्याच्या जवळ जाऊं ."
इतक्यात , अरे ! १२:०० वाजायलेत अन् उल्कावर्षाव पुन्हा एकदा अतिषबाजी सारखा सुरू झाला .
आई ने हळुच त्या रुसू बाई रुसू समोर केक नेला .
अन् लहान-मोठ्या सर्वांनीच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! Happy Birthday to you विकास एकच गजर केला .
भारावलेल्या विकासच्या डोळ्यात अश्रू आले .
असं वाटतं की, झोपी गेलेला जागा झाला च्या कथेनं खरंच त्याचे डोळे उघडले .
"आई इतके कष्ट घेतले तु मला जन्म देतांना .
आई मी चुकलो सतत तुला बोलतांना .
आई लहानपणापासून आतापर्यंत कधीच कमी नाही केलं माझ्या प्रत्येक आजारपणात माझी सेवा करतांना .
मला याची जाणीव कधीच नाही झाली तुझ्यावर राग काढतांना .
आई तू मनात किती दुःखावली असशील माझे अनंत अपराध तुझ्या पोटी घेतांना .
मी जराही प्रयत्न नाही केला तुझी अनंत प्रेमाची छाया समजतांना .
आई मी खरंच चुकलो मला क्षमा कर ना !
चरणी तुझ्या नतमस्तक होतो नेहमी प्रमाणे मला पोटाशी तुझ्या घे ना ! "
डोळ्यांतील अश्रू पुसूनी पोटशी घेऊनी विकासचे डोळे पुसले .
लहान मोठ्या सर्वांनाच आनंद अश्रू आले.
अरे ! आम्हाला ही रडवलंस आता खुप भुक लागलीय.
अरे ! तुझ्यासाठी आई अन् ताईने घरीच तुझा आवडता केक केलाय .
सुवासिनींनी ओवाळूणी पारंपरिक पद्धतीने वाढदिवस साजरा केला .
केक खावूनी सर्वांनी वाढदिवसाचा शुभ आशिष दिला .
ही गोष्ट थोडीशी काल्पनिक अन् गोष्टीतील गोष्ट पुर्ण सत्य आहे .
पण सांगण्यास कारण की , माझ्या जन्म वेळीच्या प्रसंगाने अभिमन्यू प्रमाणे गर्भावर संस्कार नक्कीच होत असतात .
जे ते ज्यांच्या त्यांच्या नशिबात विधात्याने विधी लिखित असतात.
जन्मा वेळी अवती-भवतीच्या सोबतीने काही संस्कार गुण मला देऊन गेले आहेत .
प्रसंगाने आईनं मला कार्यक्रम सोहळ्यात उत्साहाने सहभागी व्हायला शिकवलं .
आईचं आनंदाने पाणी भरण्याचं कार्य आजही मी घरीच काय नातेवाईकांच्या घरीही अगदी आनंदाने भरलं .
आईच्या आदरातिथ्याने मी माझ्या परीने पाहुणचार करतो .
आईची नातेवाईक-शेजारी जोडुन ठेवण्याची कला मी आजही जपतो .
आईबाबांची देवभक्ती ची तपस्याचा थोड्या अंशी करण्याचा मी प्रयत्न जपतो .
आईची बाळगोपाळात रमण्याची कला मी ही little little जाणतो .
आई-बाबांचा मनमिळाऊ स्वभावाचे अनुकरण करून मी ही इतरांचे मन जपण्याचा प्रयत्न करतो .
आज्जी-आजोबांपासुन लोहगांवकर देशपांडेचे वंशपरंपरागत संस्कार गुण अत: इति मिळाले .
संस्कारी कला गुण आत्मसात करण्याचा मी प्रयत्न केले .
आई बाबा धन्यवाद तुमच्यामुळेच हा जन्म .
तुमच्याच संस्कारामुळे सार्थकी हा जन्म .
श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏

तुझ्या सर्व ईच्छा पूर्ण होवो , पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
उत्तर द्याहटवाआणि येणारा प्रत्येक क्षण आनंदायी व नवे क्षतिज , पहाट येवो ..🌄
धन्यवाद 🙏🙏🙏
उत्तर द्याहटवा