एक होतं अनोखं जोडपं
राजा *रमेशचंद्र* आणि त्यांची *राणी छाया* .
त्यांची पहिली भेट अशीच झाली जशी वनात प्रथम भेटली श्री रामचंद्र-सीता .
*रमेशचंद्रा* भासली जनु जयाप्रदा ची *छाया* .
*प्रभावती नगरीच्या रमेशचंद्रा* ने प्रस्ताव पाठविला , मला हवीय आपल्या *नावंदीची राणी छाया* .
प्रस्तावे मंजुरी दरशुनी झाला शालमुदी सोहळा .
पण अनुपस्थित सोहळास राहुनी परिक्षेत हजर रमेशचंद्र होता .
दि. २२फेब्रुवारी १९८१ तारीख ठरली लग्नाची .
माघ कृष्ण ४ संकष्ट चतुर्थी शके १९०२ तिथी विवाह सोहळाची .
वेळ @१० वा. १०मी. मुहूर्ताची .
आपापली लग्नाची तयारी सुरू झाली .
लग्नाच्या सोन्या चांदीच्या दागिना सह बस्ताची ही खरेदी झाली .
आले वर्हाडी आली वरात .
विवाह सोहळा सजला नुतन विद्यामंदिरात .
पहिले *आशा-आनंद* विवाह सोहळा त्याच मांडवी करुनी *रमेशचंद्रांनी* भावाचे कर्तव्य पुर्ण केले .
मग सर्व कामांची जोड लावुनी मस्तकी मुंडावळ्या बांधले .
मुहूर्ताची वेळ आली .
श्री गौरी नंदना वंदुनी शुभ मंगली सनई चौघडा वाजली .
हार हाती घेऊनी *रमेश-छाया* सभामंडपी आली .
पाट-चौरंगावर उभे राहता दोघांमध्ये अंतरपाट धरून ब्राह्मण आली .
स्वस्ती श्री... ने मंगलाष्टके सुरू झाली .
आता सावध... ने अक्षदा सावधान झाली .
सुंदर फुलांच्या माळा एकमेकांना घालून गाठ साता जन्माची बांधिली .
मंगळसुत्र बांधुनी सप्तपदी पुर्ण झाली .
होम लज्जा करूनी *रमेश रावांना छाया* सोडू नका आमच्या बहिणीची म्हणत मेव्हणांनी कान-पिळनी केली .
झाल-परातीत दिवे लावूनी भावकीनं आशिर्वाद रुपी गोड खडीसाखर नववधू *छायास*
दिली .
आरस्यात सासुबाईंनी *रमेश-छाया* सुन मुखे पाहिली .
श्री कृष्ण - अन्नपुर्णा - गौरी हार - रुखवत पुजोनी श्री लक्ष्मी पुजनाची वेळ आली.
श्री लक्ष्मी पुजन करुनी *रमेशचंद्र छाया* हस्ते आरती मनोभावे केली .
विहीन पंगतीची तयारी सुरू झाली .
पंचपक्वान्नाने *रमेशचंद्र छाया* च्या जेवणात शोभा वाढवली .
*रानी छाया* च्या पाठवणी ने सर्वांचेच अश्रु अनावर झाली .
माप ओलांडुनी *छायालक्ष्मी* रुपे *रमेशचंद्रां* कडे नांदली .
असा झाला *रमेशचंद्र छाया* लग्न समारंभाची कथाच वर्णीयली .
कारण , *रमेशचंद्रां* च्या कॅमेरात विवाह सोहळ्याची *छाया* चित्रे टिपलेली .
अजाणत्याने सुर्य प्रकाशी कॅमेरातील रील काढल्यानं होती नव्हती ती *रम्य छाया* चित्रांची स्मृती कायमची गेली .
*रमेशचंद्रांना छाया* चित्रांची होती फार आवड पण लग्नाच्या आठवणी नराहिल्याची कधीही खंत ना व्यक्त केली .
आम्हां मुलांना एवढेच ते सुख लाभले @२५ वा लग्नाच्या वाढदिवस सोहळा थाटात करण्याची संधी मिळाली .
आम्हां मुलांनी आजच्या आठवणींना पुन्हा उजाळा देऊनी ही स्मृती *रमेशचंद्र छाया* लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत प्रत्यक्षात *आईबाबांच्या* चरणी अर्पण केली .
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद 🙏