आईबाबा वाचूनी मी



 सगळं काही आहे घरात .

तरीही हूरहूर लागते मनात .

जिवन जगतो आहे ऐश्वौआरामात .

तरीही आलेले दिवस काढत जातोय आयुष्यात .

सत्ता-संपत्ती आहे हातात .

तरीही चिंता लागते काळजात .

आता आनंदाचे क्षणही येतात जिवनात .

तरीही दुखा: च्या प्रसंगी वेळ जातो तुमच्याच आठवणीत .

सुखद अश्रु दिसलेच जाते या जगतात .

तरीही दुःखीत आसवे काढतो बंद खोलीच्या दारात .‌

आता हवं तसं वागायची मुभा आहे माझ्यात .

तरीही आदरयुक्त तुमची भिती असते वागण्यात.

नवं नवीन आठवणींचा ठेवा जपतो मी हृदयात .

तरीही जुन्या तुमच्या आठवणींना विसरण्याचा प्रयत्न करतो दगड ठेवून माझ्या काळजात .

पटला नाही तुमचा उपदेश असतांना अस्तित्वात.

तरीही बोधवाक्य ऐकायला तरसतोय तुमच्या अस्थीत .

उनीव तुमची जाणवते माझ्या आयुष्यात .

तरीही आस लागते आईबाबा तुमची भेट होईल आज तरी माझ्या स्वप्नात .

वाट पाहतोय तुमचाच विकास .


टिप्पण्या