मला मिळालेलं अनोखं बक्षीस



 माझ्या *देशभक्ती गीताची* दखल घेऊन _CERTIFICATE_ दिल्याबद्दल *MINISTRY OF CULTURE भारत सरकारचे* शतशः आभार🙏🙏🙏🇮🇳 *भारत माता की जय* 🇮🇳 *वन्दे मातरम्* 🇮🇳 *जय हिंद* 🇮🇳


*बक्षीस* म्हंटले की लहानपणाची आठवण येते .

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्याने शाळेत स्नेहसंमेलनात स्व-अंगीचे कलागुण ओळखण्यासाठी घेतले जाणारे क्रीडा प्रकार , स्पर्धा , इ..

काही प्रकारात मध्ये स्वत:हुन भाग घ्यायचो तर काही स्पर्धांमध्ये *मी ते नाही पेलू शकेल .* या खचलेल्या आत्मविश्वासाने माघारी फिरत असे .

असं करता करता मनात एक न्यूनगंड ची भावना तयार झाली .

मग काय मी सर्वच स्पर्धेतून बाहेर पडलो .

तशी तर स्पर्धा जिंकून बक्षिसे ही मी मिळवायची .

पण आता जिंकण्यापेक्षा मी त्यात सातत्य राखले का ही भिती मला सतत भेडसावत होती .

 काही दिवसांपूर्वी सत्र परीक्षा झाली आणि माझे मराठीचे शिक्षकच वर्ग शिक्षक म्हणून नवीन सत्रात आले . ते मराठी सोबत इतिहास विषय ही छान सोपे करून शिकतात .

सरांची आणि माझी इतकी जवळीक कशी झाली मला तेव्हा कळलंच नाही .

नविन शाळेत नेहमीच तिसऱ्या बाकावर बसणारा मी कधी जुन्या शाळेत बसणारा पहिल्या बाकावर आलो हे कळलंच नाही .

बरं मी तसा वर्ग प्रमुख ही नव्हतो . पण सर मला मॉनिटर असल्यासारखे वागवत .

 एकदा अशीच एक गंमत झाली . एका मराठीच्या स्पर्धेची तोंडी सूचना शाळेत संपूर्ण वर्गा-वर्गात जाऊन द्यायची होती .

सरांचा लाडका विद्यार्थी म्हणुन

ते काम सरांनीच मला सोपवलं .

शाळेतील सर्व वर्गात सूचना देऊन झालं . पण दोनदा टाळण्याचा प्रयत्न करुन ही शेवटी तेच झालं त्याची शंका होती . 

त्या वर्गात सूचना घेऊन गेलो . जिथे माझे आदरणीय गणित विषयाचे शिक्षक होते . जसं आमच्या वर्ग शिक्षकांचा लाडका विद्यार्थी होतो तसाच या गणिताच्या शिक्षकांचा लाडका विद्यार्थी . कारण , गणित माझ्या आवडीचा विषय म्हणुनच मला ते यायचं आणि जमायचं .

 वर्गात तोंडी सूचना देणारं इतक्यात गणिताच्या शिक्षकांनी मला विचारले , " काय रे! वर्ग सोडून शाळाभर का फिरतोस ? "

आधीच सरांचा धसका आता त्यांच्या भितीने माझी सुचनाही तोंडातल्या तोंडातच फिरली .

 वकृत्व ऐवजी वतृत्व स्पर्धा झाली . सर्व वर्ग संभ्रमात पडला . सर म्हणाले नीट दमानी सांग ! कशाची स्पर्धा आहे ! तोंडचे पाणी पळाले नयनीं अश्रू आले .

सरांनी जवळ बोलावून माझ्या पाठीवरून हात फिरवत म्हणाले की , " अरे! मी तुझी चेष्टा केली . मला माहित आहे तू कारणाशिवाय बाहेर फिरणारा मुलगा नाहीस ." आणि मला पाणी दिलं प्यायला . मग माझी सुचना पुर्ण झाली .

 काही दिवसांनी मला शारीरिक शिक्षकांनीथंडीच्या दिवसांत शालेय प्रार्थनेत परेडच्या मध्ये डाव्या-उजव्यात पकडलं . मी म्हणालो की , " सर थंडीच खुप आहे की पायही उचलत नाहीत ." सर म्हणाले की , " तु तर नवं जवान आहेस , आम्ही बघ . तुझं मेहनतीचं वय आहे ." 

मी , "sorry sir ."

" तुझी शिक्षा की , तु आज शालेय प्रार्थना व्यासपीठावरून सर्वांसमोर म्हणावी ." 

सरांची शिक्षा ऐकावीच लागली . पण मनात भिती होती stage courage ची . प्रथमच मी एवढ्या मोठ्या व्यासपीठावरून सर्वांसमोर प्रार्थना म्हणण्यात मी पुढे आणि बाकी सर्व माझ्या मागे .

सुरवातीला दोन-पाच दिवस मनात भिती आणि काही दिवसांनी धाडसाने आवड निर्माण करून गेली .

खरंच शारीरिक शिक्षकांनी मला शिक्षा दिली का स्व-विकासाचे शिक्षण दिलं . हे ही अजुनही माझ्या संभ्रमणात आहे .

खरं तर हा माझ्यातील बदल मला ही खुप आवडला .

ज्या न्यूनगंडात मी जगत होतो त्यातून बाहेर मला माझ्या या सर्व शिक्षकांनीच काढलं .

सत्र संपलं आता सर्वात महत्त्वाचं सत्र सुरू झालं . गणिताचे शिक्षक तेच होते पण आता इतिहासाचे , मराठीचे नवीन शिक्षक आले होते . 

सर्वात महत्त्वाचं सत्र म्हणुन जरा घाईगडबडीतच जात होतं .

 आता महत्त्वाची परिक्षा जवळ आली . काही नसमजलेला परिपाठ विचारण्यासाठी शाळेत गेलो असतांनाच मला मराठीचे जुने वर्ग शिक्षक भेटले आणि म्हणाले , "कसा काय चाललाय अभ्यास ? तुझ्या गणितासारखा इतिहास ही चांगला हवा .बाकीत अभ्यास कर . मराठीत फक्त अक्षर सुंदर काढ आणि प्रश्नांची उत्तरे थोडक्यात आणि दिर्घ यात Mark's प्रमाणेच लिही . व्याकरणात थोडं लक्ष दे ! निबंध छान लिहितोस . गेले दोन-तीन वर्षांत पाहतोय ना! वाचण्यासारखे असतात . तो 'आई' चा निबंध अजुनही माझ्या लक्षात आहे . फक्त स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेव ! आणि... ती मनातील नकारात्मकता काढून टाक! Best of luck in your all life . "

 मी सरांना , " thanks sir , तुम्ही माझ्या अभ्यासासह मलाही ओळखलं . आणि... ती मागच्या वर्षीची माझी प्रगती तुम्हीच केलीत . मी तुमचे आभार कसे मानू ? सर मी तुमचा ऋणी आहे ." म्हणतच सरांच्या पाया पडलो आणि पुन्हा एकदा नयनीं अश्रू अनावर झाले .

सरांनी मला जवळ घेऊन , " हे त्या सुंदर आईच्या निबंधाचं बक्षीस समज . "

आज बरीच वर्षे झालीत त्याला .

निबंध संपूर्ण आठवत नाहीये पण आशेय आठवतोय की , " आई बाळाला पोटात नऊ महिने पासुन मोठं होईपर्यंत कशी अन् किती सांभाळते . "

त्यावेळी तर त्या न्यूनगंडात असलेल्या मुलाला ते शिक्षक समर्पकपणे सामान्य बनवतात . असा 'तारें जमीन पर' आला ही नव्हता .

खरंच! एक उत्तम शिक्षकच विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देऊ शकत .

तसं पाहायला गेलं तर सर्वच जणांचं नाव इथं घ्यायला हवं पण त्यातही मोजके म्हटंल तर ,

शारीरिक शिक्षक :- स्वामी सर

गणिताचे शिक्षक :- गोराडकर सर 

माझे मराठीचे शिक्षक :- बोराडे सर .



टिप्पण्या