[01/11, 5:02 AM] Ganesh Puran: *श्री नर्मदाष्टकम*
सबिंदु सिन्धु सुस्खल तरंग भंग रंजितम
द्विषत्सु पाप जात जात कारि वारि संयुतम
कृतान्त दूत काल भुत भीति हारि वर्मदे
त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे 1
त्वदम्बु लीन दीन मीन दिव्य सम्प्रदायकम
कलौ मलौघ भारहारि सर्वतीर्थ नायकं
सुमस्त्य कच्छ नक्र चक्र चक्रवाक् शर्मदे
त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे 2
महागभीर नीर पुर पापधुत भूतलं
ध्वनत समस्त पातकारि दरितापदाचलम
जगल्ल्ये महाभये मृकुंडूसूनु हर्म्यदे
त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे 3
गतं तदैव में भयं त्वदम्बु वीक्षितम यदा
मृकुंडूसूनु शौनका सुरारी सेवी सर्वदा
पुनर्भवाब्धि जन्मजं भवाब्धि दुःख वर्मदे
त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे 4
अलक्षलक्ष किन्न रामरासुरादी पूजितं
सुलक्ष नीर तीर धीर पक्षीलक्ष कुजितम
वशिष्ठशिष्ट पिप्पलाद कर्दमादि शर्मदे
त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे 5
सनत्कुमार नाचिकेत कश्यपात्रि षटपदै
धृतम स्वकीय मानषेशु नारदादि षटपदै:
रविन्दु रन्ति देवदेव राजकर्म शर्मदे
त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे 6
अलक्षलक्ष लक्षपाप लक्ष सार सायुधं
ततस्तु जीवजंतु तंतु भुक्तिमुक्ति दायकं
विरन्ची विष्णु शंकरं स्वकीयधाम वर्मदे
त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे 7
अहोमृतम श्रुवन श्रुतम महेषकेश जातटे
किरात सूत वाड़वेषु पण्डिते शठे नटे
दुरंत पाप ताप हारि सर्वजंतु शर्मदे
त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे 8
इदन्तु नर्मदाष्टकम त्रिकलामेव ये सदा
पठन्ति ते निरंतरम न यान्ति दुर्गतिम कदा
सुलभ्य देव दुर्लभं महेशधाम गौरवम
पुनर्भवा नरा न वै त्रिलोकयंती रौरवम 9
त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे
नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे
त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे
[01/11, 5:02 AM] Ganesh Puran: १.
दिनांक: ०१/११/२०२०
*|| श्रीस्वामीसमर्थ ||*
*नर्मदे हर! नर्मदे हर! नर्मदे हर!*
*|| श्री नर्मदा माहात्म्य ||*
*अध्याय पहिला (मंगलाचरण)*
*|| श्री गणेशाय नमः || श्री सद्गुरवे नमः|| श्रीकृष्णाय नमः||*
हे विघ्नहरा! हे पार्वतीकुमारा! तुझा जयजयकार असो. नर्मदा माहात्म्य सांगण्याचे कार्य निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी तू मला प्रेरणा दे. हे गणराया! हेरंभा! तुझी एवढी महती आहे की देवादिक सुद्धा कार्यारंभी तुला वंदन करायला विसरत नाही. हे लंबोदरा! माझे त्रिविधताप तूच दूर कर. माझ्या आत्मशुद्धीचे माप दिवसेंदिवस वाढव गणेशा. हे पार्वतीरमणा! तुझे दर्शन देवादिकांनाही दुर्लभ आहे. हे सत्कर्म निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी मी मतिमंद बालक तुझ्यासमोर हात जोडून तुला नमन करत आहे. देवा तू माझ्यावर प्रसन्न हो!
हे वाग्देवी सरस्वती! हे माते! तुझ्या शक्तीचे वर्णनही मला करता येत नाही. तुझ्या कृपेने भूतलावावर कितीतरी जण अजरामर झाले आहेत. तु प्रसन्न झाल्यामुळेच वाल्मिकी आणि व्यास ऋषींनी पुराणे रचिली. त्या ग्रंथांच्या श्रवणानेच आम्हां पामरांना मुक्ती मिळते. मोठमोठे साधुसंतही तुझ्या कृपेने भगवंताचे नामस्मरण करतात आणि त्यांनी लिहिलेल्या रचनांचे अमृत चाखल्याने आमच्या अंतराला शांती लाभते. मी त्या सर्वांच्या पायाची धुळही नाही. मी तुझे अज्ञान बाळ आहे. सद्गुरूच्या कृपेने बोबडे बोलल्यासारखे, काहीतरी बडबड केल्यासारखे हे लिखाण करत आहे.
हे श्रीकृष्णा! हे शामवर्णा! हे पतितपावना! तू माझ्यावर प्रसन्न हो. हे मुरलीधरा! हे मनोहरा! हे शामसुंदरा! तुझा जयजयकार असो. तुझ्याविना मला कोणीही वाली नाही. तुझे रूप बघण्यासाठी माझे डोळे मोहित होतात. तुझे गुण ऐकायला माझे कान आतुर असतात. देवा, माझ्या वाचेने फक्त ‘कृष्ण कृष्ण’ एवढेच नाव येवो, हेच तुझ्याकडे मागणे आहे. हे घनश्यामा! तुझ्याच चरणी हे शिर सदा लीन होवो. या हातांनी तुझेच पूजन होवो. अष्टांगाने तुला प्रणिपात केले असता, सर्व मार्ग पवित्र होवोत व हृदयात तुझेच प्रेमाने ध्यान करत असता माझे मन शांत होवो. या जगामध्ये श्रेष्ठ ऋषीमुनी, महर्षींनी वेद पुराणांद्वारे तुझीच स्तुती केली आहे. त्यांच्यापुढे मी तुझी स्तुती करण्यास कशी धजाऊ? म्हणूनच हे रमावरा ! मी माझ्या वाचेने जे ‘कृष्ण कृष्ण’ असे नामोच्चरण करत आहे; तीच तुझी स्तुती मानून घे जगदीशा. हे माधवा! तुझ्याविना मला दुसरा कोणताही आधार नाही. आता माझा भार निरंतर तुलाच वहायचा आहे.
हे श्रीहरी! तुझ्याच कृपेने हा देह नर्मदातीरी वसतो आहे. ती पुण्यसरिताच आम्हा बालकांना पावन करत आहे. हे माधवा! त्या नर्मदेचीच स्वल्पसेवा घडावी म्हणून वशिष्ठसंहितेस प्राकृत स्वरूप देत आहे.
*श्री सद्गुरू धार्मिक यात्रा कंपनी*,
कर्वेनगर, पुणे
8983194154/9767118804
[01/11, 5:02 AM] Ganesh Puran: २.
महान पुण्यवान, पवित्र आणि मंगल अशा भूमीवरचे ते एक पवित्र अरण्य म्हणजे नैमिष्यारण्य! त्या तपोवनाच्या पवित्र भूमीत अनेक ऋषिवर्य एकत्र येत, यज्ञभाग आणि तपाचरण करीत, धर्मचर्चा करीत आणि अनेक शंका, समस्या, अडीअडचणी यांच्यावर विचारविनिमय होई. एके दिवशी अचानक, अज्ञानरात्रीचा नाश करीत प्रखर सूर्यनारायणाचे जसे आगमन व्हावे, त्याप्रमाणे त्या पवित्र अशा तपोवनात सूत नावाच्या एका विद्वान पुराणिकाचे आगमन झाले. नैमिष्यारण्यातील मुनींचा संघ पाहून सुतांच्या मनाला अत्यानंद झाला. त्यांच्या तोंडून आपसूकच प्रोत्साहनपर ‘धन्य धन्य’ असे शब्द उच्चारले गेले. शौनक ऋषींनी त्वरित उत्थापन देऊन सूत पुरानिकांचे पूजन केले आणि त्यांना विनंती केली, “हे धर्मवीद महाभाग सूत महाराज, वशिष्ठ ऋषींनी रामास जी नर्मदा कथा सांगितली आहे, ती वशिष्ठसंहितेतील कथा आपण आम्हाला सांगण्याची कृपा करावी. ज्या नर्मदेच्या फक्त सहवासात राहिल्याने देखील पापनाशन होते, अशा परमपावन नर्मदेचे भूमंडळी कसे अवतरण झाले, हे सांगावे. जिच्या तटावर अल्पकाळ जरी तप केले तरी त्यांचे फळ लाभते, अशा नर्मदेचे माहात्म्य आम्हाला कथन करण्याची कृपा करावी.”
सर्व ऋषींची नर्मदेबद्दलची जिज्ञासा बघून सूतांना आनंद झाला. त्यांनी प्रेमभावाने नर्मदा माहात्म्य कथा कथन करण्यास आरंभ केली.
सूत पुराणिक सांगू लागले, ”रावणाचा वध केल्यानंतर प्रभू श्रीराम आयोध्येस आले. बंधु भरतास दिलेल्या वचनानुसार त्यांनी आयोध्येच्या सिंहासनावर बसून आयोध्येचा कारभार सांभाळला. सिंहासनावर बसल्यावर श्रीरामांनी रघुवंश कुलाचे कुलगुरू ऋषीश्रेष्ठ वशिष्ठ ऋषींचे पूजन केले. त्यांचे पूजन झाल्यानंतर श्रीराम म्हणाले, “मुनीश्रेष्ठ, आपण सर्व वेद जाणता. गुरुवर्य, मी महाशूर रावणास मारले खरे, पण त्या लंकानाथाचा महिमा मी कसा वर्णन करू? सीतेला लंकेतून सोडून आणण्यासाठी वानरसेनेच्या मदतीने आम्ही समुद्रामध्ये सेतू बांधला. त्यावेळी तेथे देवाधिदेव महादेवाचे लिंग स्थापन केले. शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी त्या अरण्यातील दंडकवासी मुनींना बोलावले. ते सर्वजण वेदांमध्ये पारंगत होते. त्यांनी मला सांगितले की, “हे महाबाहो राम, पुरुषाचे अर्धांग हे स्त्री असते. शास्त्रानुसार तू सीतेविना शिवलिंग स्थापना करू शकत नाही.”
पुढे ते दंडकवासी ऋषी म्हणाले, “आम्ही तुम्हाला एक युक्ती सांगतो. आपण पवनपुत्र हनुमानास लंकेमध्ये पाठवा. तेथे थोर असा शिवभक्त, मंत्रसामर्थ्य यामध्ये थोर असा देदीप्यमान, विश्रवापुत्र दशानन म्हणजे रावण राहतो. पुलस्तिपुत्र विश्रवा याला दोन भार्या आहेत. इडवीला आणि कैकशी. इडविलेपासून विश्रवाला कुबेर नावाचा पुत्र झाला. तर कैकेशीपासून रावण, कुंभकर्ण व विभीषण असे तीन पुत्र, तर शूर्पणखा ही पुत्री झाली. सुमाळी या दैत्याची कैकेशी ही कन्या. पुलस्तीचे जरी ब्रह्मकुळ असले, तरी रावणावर आपल्या मातेच्या (कैकेशीच्या) दैत्यकुळाचा जास्त प्रभाव पडला आहे. असे जरी असले तरी रावण हा एक थोर शिवभक्त आहे. सर्व वैदिक मंत्र हे त्याला कंठस्थ आहेत. तसेच तो दशग्रंथी ब्राह्मण आहे. त्याला आपण शिवलिंगाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी त्वरित बोलवावे.”
*श्री सद्गुरू धार्मिक यात्रा कंपनी*,
कर्वेनगर, पुणे
8983194154/9767118804
[01/11, 5:02 AM] Ganesh Puran: ३.
रामाने त्वरित हनुमानास ‘लंकेत जाऊन प्राणप्रतिष्ठापणेच्या पूजनाचा विधी सांगण्यासाठी रावणास व पूजेला बसण्यासाठी सीतेला घेऊन येण्याची’ आज्ञा केली. रामज्ञा ऐकताच मारुतीने त्याचक्षणी लंकेच्या दिशेने उड्डाण केले. पुढच्याच क्षणी हनुमान लंकाधिपती रावणासमोर जाऊन उभा ठाकला व रावणास म्हणाला, “मी प्रभू श्रीरामचंद्रांचा दूत म्हणून येथे आलो आहे. माझ्या अफाट शक्तीची तुला या आधीही कल्पना आलीच आहे. सर्व लंकेतील प्रजाजन माझी शक्ती जाणतात. परंतु आज मी येथे श्रीरामांचे काम घेऊन आलो आहे. समुद्राच्या पलिकडच्या किनार्यामवर प्रभू श्रीराम शिवलिंग स्थापन करू इच्छितात. वेदविद्या मध्ये पारंगत असे अनेक ब्राह्मण तेथे जमले आहेत. त्यांच्या अभिप्रायानुसार हे कार्य सीतामाते विना होणे शक्य नाही. म्हणून आपण या कार्यासाठी सीतामातेला घेऊन यावे व शिवपूजनाचे आचार्य व्हावे. असा निरोप घेऊन मी आलो आहे. माझे कार्य हे फक्त तुला निरोप देण्याचे होते. तुझ्या इच्छेनुसार तू काय करायचे ते ठरव.”
प्रभू रामचंद्र पुढे वशिष्ठ मुनींना सांगू लागले, “कपि हनुमानाच्या तोंडून शिवपुजेचा उल्लेख ऐकून रावणाला अतिशय हर्ष झाला. रावण मंदोदरी व सीतेला घेऊन विमानातून सेतुबंधतीरी पोहोचला आणि रावणाने स्वतः सीतेला माझ्याकडे सुपूर्द केले. मी जानकी समवेत उत्तरतीरी रामेश्वरम लिंगाची स्थापना केली. या पूजनाचा सर्व विधी आचार्य बनून रावणाने वदला. वेदमंत्रांद्वारे रावणाने माझ्या हस्ते शिवस्थापन केली. सर्व पूजा आटोपल्यावर मी सीतेसह आचार्यपदी विराजमान असलेल्या रावणाच्या पाया पडून ‘विजयी भव!’ असा आशीर्वाद घेतला व रावणाला दक्षिणा दिली. पूजा समाप्तीनंतर रावण ताबडतोब सीतासतीला घेऊन लंकेकडे निघून गेला.
श्रीराम पुढे वशिष्ट ऋषींना सांगू लागले, “मी अनन्यभावे हात जोडून शिवस्तवन केले. ‘इंद्रादी देव ज्यांना पूजतात, सिद्धसाधू जन सेवितात, असे तुझे नाव आहे महेशा. तू विश्वकर्ता आहेस, तू अनंत शक्ती आहेस. हे रामेश्वरा! गौरीपती! हे वामांगी पार्वती भूषविणाऱ्या निलकंठा! मी तुला शरण आलो आहे. हे त्रिलोचना! शुलधरा! शशीसूर्य नेत्रा! गौरीहरा! तु या रामेश्वर लिंगी सदा स्थित राहावे, हीच माझी प्रार्थना आहे. नमो नमो जगतकारणा | ज्योतीरूपा सनातना || अनंत रूप पंचांनना | नमो तुज पुढतपुढती ||’
अशी स्तुती ऐकल्यानंतर उमापती प्रसन्न झाले. शिवलिंगातून स्वयंभू प्रकट होऊन ‘रावणाशी युद्धात जिंकण्याचा’ आशीर्वाद त्यांनी दिला. वानरसेनेसह लंकापुरी जाऊन सीतेला प्राप्त करण्याचा वर त्या दयाळू भगवान महादेवांनी दिला. एवढे वर दिल्यानंतर श्रीहर त्वरित शिवलिंगी गुप्त झाले. त्यानंतर वानर सेनेसहित आम्ही लंकेकडे प्रस्थान केले. शिव आशीर्वादाने रावणाचा वध झाला व मैथिलीला घेऊन मी अयोध्येत परतलो.”
श्रीराम पुढे म्हणाले, “हे गुरुराया! हे सर्व आपल्या कृपेने झाले. लंकेच्या महायुद्धात किंवा समुद्र पार करते वेळी आपल्या पदांच्या स्मरणानेच मला तारीले आहे. आपल्या कृपेनेच वानरसेनेने युद्धात साह्य केले. सद्गुरु कृपेची महती अनुभवा विना कळत नाही. हे गुरुवर्य, आपल्याच कृपेमुळे मी पुन्हा अयोध्या पाहू शकलो, पुन्हा कौसल्या मातेला भेटू शकलो, सीतेला परत आणू शकलो.”
दशरथ पुत्र प्रभू श्रीरामचंद्राने अशा प्रकारे गुरुकृपेची महती सांगितली आहे. आत्मकल्याण करण्यासाठी अंत:करण शुद्ध करून गुरुकृपेस अनुभवल्याने आपण हरिभक्तीस पात्र होतो.
॥ इति श्री नर्मदापुराणे वशिष्ठश्रीरामचंद्र संवादे मंगलाचरणनाम प्रथमोध्याय: ॥
*श्री सद्गुरू धार्मिक यात्रा कंपनी*,
कर्वेनगर, पुणे
8983194154 / 9767118804
[02/11, 5:01 AM] Ganesh Puran: १.
०२/११/२०२०
*|| श्रीस्वामीसमर्थ ||*
*नर्मदे हर! नर्मदे हर! नर्मदे हर!*
*|| श्री नर्मदा माहात्म्य ||*
*अध्याय दुसरा (रामानुतापोनाम)*
*|| श्री गणेशाय नमः ||*
हे देवकी कुमारा! हे चक्रधरा! हे रमावरा! तुझ्या चरणी माझे नमन असो. हे देवा! तू माझे रक्षण कर!
शौनक ऋषी सुतांना पुढे म्हणतात, “हे ऋषीवर्य श्रीरामचंद्रांनी वशिष्ठांना विचारलेली नर्मदा माहात्म्याची पुढील पवित्र कथा आम्हाला सांगण्याची कृपा करावे.”
सूत पुढे सांगू लागले, “हे महामुनींनो! प्रभू रामचंद्रांनी कुलगुरू वशिष्टांस नमस्कार केला व पुढील वृत्तांत ते सांगू लागले. प्रभू श्रीराम म्हणाले, “गुरुवर्य, आपण सर्व शास्त्रांमध्ये विशारद आहात. माझ्या मनातील संशयाचे निवारण या जगात आपल्याविना अन्य कोणीच करू शकत नाही.”
प्रभू श्रीराम पुढे दु:खी स्वरात बोलू लागले, “महाशूर रावणाचा जन्म हा ब्राह्मण कुळात झाला. त्याच्याकडे अपार विद्ववत्ता होती. अशा या ब्रह्मपुत्र रावणाचा मी वध केला. ज्या रावणाने समस्त देवांना जिंकले होते, त्याने माझ्या सीतेचे अपहरण केले. सीतेला पुन्हा सोडवून आणण्यासाठी माझ्या पदरी हे ब्रह्महत्येचे पाप पडले आहे. एखाद्या गरीब, दरिद्री व्यक्तीचे अपार कष्टाने कमविलेले धन हरवावे, तसा शोक आज मला झाला आहे गुरुवर्य. आमच्या रघुकुलामध्ये आजपर्यंत अशी ब्राह्मणहत्या कोणाच्याच हातून घडली नाही. माझे सर्व पूर्वज हे धर्माचरणाने वागणारे, वेदवेदांत पारंगत असे होते.
माझे पिता दशरथ, त्यांचे पिता अज तसेच आमचे पूर्वज राजा रघु या सर्वांनीच सद्वर्तनाने आमच्या कुलाचा गौरव केला आहे. रघू राजाचे पिता दिलीप व राजा दिलीपांची पत्नी सुदक्षणा ही एक पतिव्रता स्त्री होती. माझ्या कुळाचा सर्व इतिहास तर आपण माझ्यापेक्षाही जास्त जाणता गुरुवर्य. मी तर तुमच्या पुढे एक अजान बालक आहे. सूर्यासमोर दिव्याचा प्रकाशाप्रमाणे माझे आपल्यासमोर अस्तित्व आहे.
सूर्यवंशातील राजा दिलीप यांची एक कथा तर तुम्हाला ज्ञात आहेच. रावण ब्राह्मण असल्याकारणाने राजा दिलीप हे त्याला अतिशय सन्मान देत होते. एकदा दिलीप राजा संध्याकर्मांमध्ये मग्न असताना तीन असूर रावणाच्या सांगण्यावरून कर गोळा करण्याकरिता त्यांच्याकडे आले. त्यावेळी राजा दिलीप शांतपणे डोळे मिटून मौन धारण करून ध्यानमग्न झाले होते. त्यांचे ते ध्यानातील तेज पाहून असूर दूत अगदी चकित झाले. एवढे भयानक असूर समोर पाहिले असता कोणाच्याही अंगाचा थरकाप उडेल, परंतु तरीही भूप दिलीप स्तब्ध राहून ध्यानमग्न झाले.
एवढ्यात नृपाने अचानक डोळे उघडले व दर्भ हाती घेऊन तो दक्षिण दिशेकडे फेकला आणि नृपनाथ पुन्हा ध्यानस्थ झाले. हे सर्व पाहून राक्षसांना आश्चर्य वाटले. या क्रियेचा काय अर्थ होतो हे त्यांना समजेना. त्यांनी खूप विचार केला, परंतु त्यांना कोणतेही समाधानकारक उत्तर सापडले नाही. न राहून काणा नामक राक्षसाने दिलीप राजास विचारले, “हे राजा, लंकाधिपती रावणाने आम्हाला वार्षिक कर गोळा करण्यासाठी इकडे पाठवले आहे. तु ध्यानस्थ होता म्हणून आम्ही येथे तुझी संध्याकर्म पूर्ण होण्याची वाट पाहत आहोत. संध्याकर्म करत असताना तू अचानक एक दर्भ घेऊन दक्षिण दिशेला का फेकलेस? ही संध्येची काही वेगळी रीत आहे का? आम्ही बराच वेळापासून हे कोडे उलघडण्याचा प्रयत्न करीत आहोत, परंतु आम्हाला ते उलघडले नाही. हे भूपती कृपया या क्रियेचा सविस्तर अर्थ सांगावा.”
*श्री सद्गुरू धार्मिक यात्रा कंपनी*,
कर्वेनगर, पुणे
8983194154/9767118804
[02/11, 5:02 AM] Ganesh Puran: २.
दिलीप राजा सांगू लागले, “ध्यानमग्न असताना सुवेलगिरीच्या पायथ्यास, लंकेच्या उत्तर भागास एका सिंहाने गोमातेवर हल्ला केला व तिला लपेटून घेतले. त्यावेळी त्या गरीब धेनूने माझ्याकडे प्राण रक्षणार्थ प्रार्थना केली. त्यावेळी गरिब गाईच्या रक्षणासाठी मी सिंहाच्या अंगावर दर्भ टाकला. दर्भ टाकताक्षणी मृगेंद्र गतप्राण झाला. आता ती धेनू सुरक्षितपणे जंगलात चरत आहे. आपणास हे खोटे वाटत असल्यास आपण समक्ष जाऊन बघावे.”
हे ऐकताच काणा नामक राक्षस वायुवेगाने त्या दिशेला गेला. तेथे जाऊन बघितले असता त्याला मृत सिंह दिसून आला. हे बघताच त्याला नृपाची शक्ती समजली. पुन्हा परत आल्यावर त्याने हात जोडून नृपास म्हणाला, “हे नृपती, गोमातेचे अशाप्रकारे रक्षण करून तू तुझ्या अतुल सामर्थ्याची प्रचिती दिली आहेस. तुझ्याकडे एवढी अफाट शक्ती असताना सुद्धा तू लंकाधिपती रावणाला अशाप्रकारे कर का देतो आहेस? त्याला तू विरोध का नाही करत?”
दुताचे बोलणे ऐकल्यावर नृपराज थोडा वेळ शांत झाले व हसून बोलले, “हे दूतांनो, मी रावणाला घाबरतो म्हणून त्याला वार्षिक कर देत नाही. परंतु ब्रह्मकुळाचे रक्षण हा क्षत्रियधर्म आहे. ब्राह्मणाला द्रव्य दिले असता पुण्यकर्म होते, असे शास्त्र सांगते. श्रद्धेने किंवा अंधश्रद्धेने ब्राह्मणांना दान करणे, द्रव्य देणे, त्यांचे रक्षण करणे हाच आमचा धर्म आहे.” एवढे बोलून राजाने नियमाप्रमाणे दूतांना वार्षिक कर दिला.
ही कथा सांगून श्रीराम पुढे म्हणाले, “हे मुनी, माझे पूर्वज असे धर्माचरणी होते. त्यांच्या कुळात मी जन्माला आलो आणि ब्रह्महत्यारा झालो. ब्राह्मणांच्या कृपाशीर्वादानेच हे राज्य चालत असते. तेथील भरभराट होत असते. हे सर्व माहीत असताना देखील माझ्याकडून सीतेसाठी एका ब्राह्मणाची हत्या झाली. माझ्या आयुष्याचा मला धिक्कार वाटत आहे. रावणाचा वध करून मी घोर पाप केले आहे. हे गुरुराज, आता यातून तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा.”
प्रभू श्रीराम डोळ्यात अश्रू आणून, दीनवाणीने गुरुवर्य वशिष्ठांसमोर हात जोडून त्यांना प्रार्थना करू लागले, “हे गुरुनाथा, मी तुमच्या पदी लीन झालो आहे. तुमच्याविना या पापातून माझी सुटका कोणीही करू शकत नाही. नरकवासाची भीती मला भेडसावत आहे. आता सद्गुरु कृपेची नौकाच मला या पापाच्या तुफानापासून वाचवून योग्य स्थळी पोहोचवू शकेल. हे गुरुमाऊली, आम्हावर तुमच्या कृपेची सावली आहे. मला ह्या पापांची क्षमा कशी मिळेल ते सांगा.”
शास्त्रांमध्ये अतिश्रेष्ठ असे मुनिवर्य वशिष्ठ हे पुढील अध्यायात रामचंद्रास त्यांचे स्पष्ट मत सांगतील. गुरूने केलेल्या उपदेशाप्रमाणे वागल्यास मानवाचे कल्याण होते व इह-परलोकीही त्याला सौख्य प्राप्त होते.
॥ इति श्री नर्मदापुराणे वशिष्ठश्रीरामचंद्र संवादे रामानुतापोनाम द्वितीयोध्याय: ॥
*श्री सद्गुरू धार्मिक यात्रा कंपनी*,
कर्वेनगर, पुणे
8983194154 / 9767118804
(या कथा नावसाहित फॉरवर्ड करण्यास आमची काहीच हरकत नाही)
[03/11, 5:01 AM] Ganesh Puran: ०३ /११/२०२०
*|| श्रीस्वामीसमर्थ ||*
*नर्मदे हर! नर्मदे हर! नर्मदे हर!*
*|| श्री नर्मदा माहात्म्य ||*
* अध्याय तिसरा (लोकसंग्रहनाम)*
*|| श्री गणेशाय नमः ||*
हे मनमोहना! हे अघशमना! हे श्रीकृष्णा! मला लवकर पाव. तुझा जयजयकार असो.
नैमिष्यारण्यात जमलेले सर्व ऋषीजन वशिष्ठ ऋषींनी दिलेले रामाच्या प्रश्नाचे उत्तर ऐकण्यासाठी अतिशय उत्सुक झाले होते. सूत म्हणाले, “मुनींनो, ही कथा ऐकण्यास अतिशय रुचकर आहे. गुरुवर्य वशिष्ठांनी रामास कसा बोध केला ते मी आता तुम्हाला सांगतो.
वशिष्ठ ऋषी म्हणाले, “हे महावीर श्रीराम, रावण हा दुष्ट आत्माच होता. त्याचे कृत्य हे ब्रह्मकर्मा विरुद्ध होते. श्रुतीस्मृतीच्या विधानानुसार आचारणानुरुप धर्माची चार वर्णांमध्ये विभागणी केली आहे. आपला मूळ धर्म हा सनातन धर्म आहे. धर्मच आपला पूर्ण भगवान आहे, जीवाचे जीवन आहे. तसेच आपल्या प्रत्येक कर्तव्याचा आधार धर्मच आहे. अधर्माने समूळ पराभव होणे निश्चित आहे. हे श्रीरामा, आता तू सावध होऊन ऐक.
मानवाच्या आचरणानुसार धर्माची चार वर्गात विभागणी केली आहे. शम, दम, तप, तितिक्षा, देवतार्चन, व्रतदीक्षा हे ब्राह्मणाचे लक्षण आहे. आस्तिक्य,पराक्रम तेज, सज्जनांचे रक्षण करणे, आपल्याजवळील ऐश्वर्याचे दान करणे हा क्षत्रिय धर्म. अर्थ संचय करणे, ईश्वराच्या सेवेकऱ्याची सेवा करणे, शेती, व्यापार करणे हे वैश्याचे लक्षण आहे. राजाची, राज्याची चाकरी करणे, तसेच मानवी जीवनास गरजेचे असे सर्व काम करणारे रजक, तेली, कुंभार, भिल्ल, धिवर, नट, अंत्यज वर्ग हा शुद्र धर्म.”
गुरुवर्य वशिष्ठ पुढे सांगू लागले, “हे रघुनंदना, रावण हा अतिशय दुराचारी होता. त्याने ब्राह्मण धर्माचे उल्लंघन केले. परंतु शिवआराधना करून त्याने सर्व ऐश्वर्य प्राप्त केले व त्या वैभवाने तो उन्मत्त झाला. ब्राह्मणांचा अवमान करू लागला. देवादिकांना बंदी बनवले. स्त्रियांचे जबरदस्तीने हरण केले व स्वतःची मर्जी चालवण्यासाठी अनेकांचा वध केला.
हे रामा, ब्रह्माच्या अनेक मानसपुत्रांपैकी सनत्कुमार हे एक होते. अतिशय दैदीप्यमान अशी त्यांची त्रैलोक्यात ख्याती होती. ते बाल ब्रह्मचारी होते. त्यांच्या तपाचे तेज अतिशय प्रबळ होते. एकदा रमेची हट्टवजा प्रार्थना ऐकून भगवान श्रीविष्णूंनी सर्व लोकांना पूजनीय असे वैकुंठलोक प्रस्थापित केले. जयंत, श्रुतदेव, नंदजय, प्रबल, प्रबलाक्ष, विजय, विक्श्सेन, पुष्पदंत, तार्क्ष्य, व्रत, सार्वभौम, सुनंदन, वामदेव, वृषा, दर्प, जय असे सोळा पार्श्वगण भगवान नारायणांनी वैकुंठाच्या सुरक्षेसाठी नेमले होते. अशा ह्या सुंदर वैकुंठलोकी चक्रपाणी लक्ष्मीसह सिंहासनावर विराजमान होते.
वैकुंठाची ख्याती ऐकून सनत्कुमार हरी दर्शनासाठी उत्सुक होऊन वैकुंठी आले. हरी भेटीच्या ओढीने इकडे तिकडे कोठेही लक्ष न देता त्यांनी वैकुंठाची सहा द्वारे ओलांडली. सातव्या द्वारी आले तेव्हा जय विजय यांनी त्यांना अडविले. हे सहन न झाल्याने मुनींनी त्यांना ‘तीन जन्म दैत्यकुळात जन्म घेण्याचा’ शाप दिला. हे ऐकून जय विजय यांनी मुनींचे पाय धरले. त्यामुळे त्यांचा राग शांत झाला. त्यावर त्यांनी, “तुम्ही दैत्याकुळी सर्व भोग भोगून शेवटी तुम्हाला भगवान विष्णूंच्या हातून मोक्ष मिळेल व तुम्ही दैत्यजन्म भोगून पुन्हा वैकुंठ लोकी परत याल” असा उ:शाप दिला.
या शापामुळे जय विजय हे कश्यपांच्या घरी हिरण्याक्ष व हिरण्यकशिपू या दैत्यरुपी जन्मले. हिरण्याक्षाच्या वधासाठी प्रभूंनी वराह अवतार घेतला तर हिरण्यकशिपुच्या वधासाठी नृसिंह अवतार घेतला. तेच जय विजय या युगी विश्रवापुत्र रावण व कुंभकर्ण रूपाने जन्माला आलेले आहेत. रावणाच्या ताकदीमुळे इतर दैत्यही अतिशय उन्मत्त झाले होते. तप, यज्ञ करणाऱ्या मुनींना ते आपले भक्ष बनवत होते. यज्ञयागादी कार्यात विघ्न आणत होते. देवकन्या, गंधर्वकन्या, यांचे जबरदस्तीने हरण करून त्यांना स्वतःच्या घरी घेऊन जात होते.
त्यांच्या भयामुळे पृथ्वीवर कोणीही सिद्धयोगी राहिला नव्हता. महाबली रावणाने देवांना कारागृहात बंदिस्त करून ठेवले होते. रावणाच्या धाकामुळे पवन नेहमी शितल वाहत असे. सूर्यही मंद तप्त होत होता. चंद्र हा नियमित पूर्णच उगवत असे. वरूण देवता हवे तेव्हां जल बरसवीत असे. रावणाने यमदंड आपल्या ताब्यात घेतल्याने कोणाचाही मृत्यू होत नव्हता. रावणाने कुबेराचेही सर्व धन आपल्या ताब्यात घेतले. इंद्रपदही स्वतःकडे घेतले.
रावणाच्या अशा अत्याचारांमुळे सर्व ठिकाणी एकच हा:हा:कार माजला होता. सर्व लहान-थोर दुःखी कष्टी झाले होते. यावर काहीतरी उपाय शोधून काढण्यासाठी सर्व देव ब्रह्मदेवांकडे गेले. ब्रह्मदेवांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. शिव वरामुळे रावण उन्मत्त झाला होता. यावर उपायही शिवांकडेच मिळेल, या हेतूने सर्व देवांसह ब्रह्मदेवाने महादेवांकडे प्रयाण केले. महादेवांकडे ही यावर उपाय नसल्याने सर्वजण क्षीरसागराच्या तीरावर आले.
वशिष्ठ ऋषी पुढे बोलू लागले, “हे श्रीरामा, तेथे भगवान विष्णू शेषशय्येवर विश्राम करीत होते. या राक्षसांचा संहार करण्यासाठी त्यांनीच तुझ्या रुपी रघुनंदन अवतार घेतला आहे. सीतेस निमित्तमात्र करून या दृष्टांचे तुम्ही निर्दाळण केले आहे. नाहीतर आदिशक्तीचे हरण करण्याची ताकद कोणाच्यात आहे? प्रभू मी धन्य झालो आहे. आपल्या ह्या अवतराच्या पराक्रमाचा मी साक्षीदार आहे. तुमचे स्मरण केले असता मानवाला मुक्ती मिळते. तुम्हीच पूर्ण सनातन ब्रह्म आहात. तुम्हांला ब्रह्महत्येचे दूषण कसे लागले? परंतु आपण एक राजा आहात, आणि प्रजा ही राजाचे अनुकरण करत असते. त्यामुळे राजाने आपले वर्तन धर्मयुक्त ठेवावे. यासाठी हे रघुनंदना लोकसंग्रहा कारणासाठी तुम्ही प्रायश्चिमत्त घ्या.
आपल्या हातून घडलेल्या पापांचा पश्चाताप वाटणे, हेच खरे प्रायश्वित असते. आपल्याला वाटणाऱ्या पश्चातापाचे प्रायश्चित्त करण्यासाठी मी एक उपाय सांगतो. दंडकारण्यांपासून रेवा नदीचा एक प्रवाह उत्पन्न होतो. तिच्याच तीरी बसून आपण तप करावे. नर्मदातीरी केलेले अल्प तपही खूप फळ देऊन जाते. नर्मदा सर्वांचे पाप हरते.
वशिष्ठ ऋषी पुढे म्हणू लागले, “हे अंबे, मी तुझे तान्हे बाळ आहे. मला पावन कर. आईला लेकराच्या मनात काय चालले आहे, हे सांगावे लागत नाही. ती त्याच्या हितासाठी सांगण्या आधिच सर्व करते. हे माते, मी तुला अनन्यभावे शरण आलो आहे. माझ्यावर कृपा कर.”
मुनीश्रेष्ट वशिष्ट पुढील अध्यायात रेवोत्पत्ती कशी झाली ते सांगतील. ती आपण श्रद्धेने व भावभक्तीने पठण, श्रवण करावे.
॥ इति श्री नर्मदापुराणे वशिष्ठश्रीरामचंद्र संवादे लोकसंग्रहनाम तृतीयोध्याय: ॥
*श्री सद्गुरू धार्मिक यात्रा कंपनी*,
कर्वेनगर, पुणे
8983194154/9767118804
(ही पोस्ट नावासकट कॉपी/फॉरवर्ड करायला आमची काहीच हरकत नाही)
[04/11, 5:01 AM] Ganesh Puran: १.
०४ /११/२०२०
*|| श्रीस्वामीसमर्थ ||*
*नर्मदे हर! नर्मदे हर! नर्मदे हर!*
*|| श्री नर्मदा माहात्म्य ||*
* अध्याय चौथा (शिवविजयोनाम)*
*|| श्री गणेशाय नमः || श्री विठ्ठलाय नमः || श्री पांडुरंगाय नमः || श्री रुक्मिणीकांताय नमः ||*
देवा, तु कटेवर हात ठेवून उभा आहेस. यातून जणू काही तु असे सांगत आहेस की भवसागराच्या पैलतीरी सावकाश उतरा, मी कटेवर हात ठेवून सज्ज आहे. भीमा तीरी उभा राहून मी तुम्हालाच पाहत आहे. अशी ही घनश्याम मूर्ती पाहून आमच्या मनाला धीर मिळतो. असा कैवारी, पतितपावन असताना आम्हाला कशाची भीती आहे?
मागच्या अध्यायात आपण पाहिले आहे. रामाने प्रायश्चित्त करण्यासाठी नर्मदातीरी गमन करावे असा उपदेश वशिष्ठ ऋषींनी केला. वसिष्ठ ऋषींचा उपदेश ऐकून रामचंद्रांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले. ते ऋषींना म्हणाले, “हे गुरूराजा, दयाळा! ही नर्मदा कशी उत्पन्न झाली? समुद्रात ती कोठे मिळाली? याची सर्व कथा कृपया आपण मला सांगावी.” वशिष्ठ ऋषी म्हणाले, “हे रामा, नर्मदा उत्पत्तीची कहाणी आता मी तुम्हांला सांगतो, ती आपण भक्तीभावाने श्रवण करावी.
फार पूर्वी अंधक नावाचा एक महाबली महादैत्य होऊन गेला. शिवजींच्या घामाच्या थेंबाच्या तेजापासून अंधकाचा जन्म झाला होता. अंधक हा जन्मतः अतिशय भयानक, कुरूप व अंध होता. कश्यपपूत्र हिरण्याक्षाने व त्याच्या पत्नीने संतान प्राप्तीसाठी फार कठोर तपश्चर्या केली. त्या तपश्चर्येच्या फलस्वरूप देवाधिदेव महादेवांनी आपला पुत्र अंधक याला हिरण्याक्षाला सुपूर्द केले. अंधकाला त्याची भावंडे खूप चिडवत असे. ही भावंडे आपले राज्य हिसकावून घेतील अशी अंधकाला भीती वाटू लागली. त्याने अफाट शक्तीच्या प्राप्तीसाठी घोर तपाचरण आरंभिले. त्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन ब्रह्मदेवांनी अंधकाला पाच शिरे व दहा हात तसेच दिव्यनेत्र प्रदान केले. त्याच बरोबर त्याला अफाट शक्ती व सामर्थ्याचेही वरदान दिले.
ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे अंधक फार उन्मत्त झाला. त्याने सर्वांचा छळ करण्यास सुरुवात केली. सर्व देवांना जिंकून त्यांना पदभ्रष्ट केले. अंधकाला त्रासून सर्व देव ब्रह्मदेवाला शरण गेले. ब्रह्मदेव सर्व देवांना घेऊन कैलासावर गेले. तेथे भगवान शिव ध्यानात मग्न होते. सर्व देवांनी हात जोडून शिवाला प्रार्थना केली, “हे देवा शांतमूर्ती, आम्ही तुला नमन करतो. हे देवा महादेवा, आमचे कल्याण आता तुमच्याच हाती आहे. हे वृषभध्वजा, चराचर जगताचे तुम्हीच अधिष्ठान आहात. हे ब्रम्हतेज, तुम्हीच सर्व वेद व त्या वेदांचा अर्थ आहात. तुम्हीच आपल्या आद्यशक्तीने नानाप्रकारच्या योनी निर्माण केल्या आहेत. हे पार्वतीरमणा, तुमचा जयजयकार असो. आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. अंधक दैत्याने आम्हांला पदभ्रष्ट करून स्वर्गातून हाकलले आहे. हे पंचानना, आमचे रक्षण करा.”
देवांची अशी दैना झालेली पाहून प्रभूला त्यांची दया आली. सर्व देवांना व गणांना सोबत घेऊन भगवान शंकर अंधकाशी युद्ध करण्यास निघाले. वृषभारुढ शिवाची स्वारी बघून अंधक देखील युद्धासाठी पुढे सरसावला. भगवान शंकर सर्व सैन्यासह अनेक शस्त्रांस्त्रानीशी कैलासावरून मगध रणांगणी आले. देव व दैत्यामध्ये भयंकर युद्ध सुरू झाले. अंधकासुर सांब सदाशिवा सोबत लढू लागला. इंद्र व वातापी यांचे द्वंद्व युद्ध सुरु झाले. षण्मातुर तारकाशी तर शुंभनिशुंभ भद्रकालीशी लढू लागले. देव असुरावर वेगवेगळे शक्तीप्रयोग करू लागले. तर असूरही देवांवर शस्त्रास्त्रांनी वार करू लागले.
असुरांचे अनेक वीर छिन्नविच्छिन्न होऊन धारातीर्थी पडले. रक्ताचे पाट वाहू लागले. असूरांच्या मृतदेहांचे ढिगारे पडू लागले. देव बाजी जिंकत आहेत हे बघून अंधक संतापला. देवांचे युद्ध कौशल्य पाहून असुरसेना पलायन करून लागली. अंधकाने सर्वांना थांबवले व युद्ध करण्यास प्रेरित केले. परंतु तरीही घाबरलेल्या असुरांना पाहून अंधकाने गर्जना केली. तो म्हणाला, “हे मंदभाग्य शंकरा, मी तुझे शीर तोडून टाकेल. तू अजून माझी अस्त्रकला पाहिली नाहीस. तुला मृत्यू येऊ नये असे वाटत असेल तर मला शरण ये, माझ्या दहा भूजा आहेत आणि तुझ्या दोनच आहेत. तू माझ्यापुढे शक्तीहीन आहेस.”
अंधकासुराने क्रोधाने शंकरांच्या दिशेने दिव्य बाण सोडला. शंकरानेही असुराच्या दिशेने शूल भिरकावला. अंधकासुरानेही भगवान शंकरांच्या दिशेने शूल भिरकावला. यावेळेस मात्र तो अचूक महादेवांच्या शिरावर आदळला. भगवान पिनाक मूर्च्छित झाले. अंधकाने त्वरित दुसऱ्या शुलाने नंदीलाही मूर्च्छित केले. त्या दोघांना मूर्च्छित झालेले पाहून अंधकासुराच्या मनाला आनंद झाला. परंतु सर्व देव भयभीत झाले. सर्व देव आपापसात पुटपूटु लागले. “महादेव कसे काय मूर्च्छित झाले? आता आपण कुठे जायचे? काय करावे?” अशा प्रकारे सर्व देव चिंतीत झाले.
त्याचवेळी मूर्च्छा सावरून भगवान शिवांनी लोचन उघडले आणि नंदीकडेही कृपादृष्टीने पाहिले, तसा नंदीही उभा राहिला. सर्व देवांना आनंद झाला. सर्व देवांनी महादेवांवर पुष्पवर्षाव करून त्यांचा जयजयकार केला. त्यानंतर महादेवांनी अंधकाप्रमाणे दशभुज रूप घेऊन हातात नाना आयुधे धारण केली. आपल्या प्रमाणे शंकराचे रूप पाहून अंधक चकित झाला. तो तिरस्काराने हसून म्हणाला, “हे शंभो, तू जरी माझ्याप्रमाणे पाच शिरे व दहा हातांचे रूप घेतले असले, तरी मी तुझे पाचही शिरे तोडून टाकतो आणि त्रैलोक्यात माझी कीर्ती करतो.”
*श्री सद्गुरू धार्मिक यात्रा कंपनी*
कर्वे नगर,पुणे
8983194154 / 9767118804
[04/11, 5:01 AM] Ganesh Puran: २ .
शिव आणि अंधकासुरातील युद्धाची वार्ता वैकुंठात पोहोचली. ती ऐकता क्षणी शामसुंदर गरुडावर आरूढ होऊन आपल्या सोळा सहस्त्र पार्श्व गणांसहित युद्धस्थानी आले. दैदिप्यमान विष्णूची हाती नानाशस्त्रे घेतलेली, मकरकुंडले घातलेली मूर्ती समोर पाहून शिव मनाला आनंद झाला. सांब सदाशिवाने आनंदून डंका वाजविला. सर्व देव पुन्हा उत्साहाने असुरांशी युद्ध करू लागले.
भगवान पशुपती हातात तेजस्वी शूल घेऊन असुरांवर वार करू लागले. किरीट कुंडलासह अनेक असुरांची मस्तके तुटून धरतीवर पडू लागली. युद्धभूमीवर दुंदूभी नाद घनानू लागले. देव, ऋषी, गंधर्व मिळून आनंदाने पुष्पवर्षाव करू लागले, अप्सरा नृत्य करू लागल्या. शंकराने एक-एक करून अंधकाची सर्व मस्तके छाटून टाकली.
वशिष्ठ ऋषी रामास पुढे सांगू लागले, “हे रामा, छिन्नविच्छिन्न पडलेली अंधकाची मस्तके शिवाला म्हणाली, “हे कैलासपती महादेवा, तुझ्या हातून मृत्यूचा दुर्लभ योग तर योगी जनांच्याही नशिबी नसतो. हे पंचानना, माझ्या अपराधाला तुम्ही क्षमा करा. हे निळकंठा, तू दयाळू माऊली आहेस. मला आता तुमच्या पदकमली जागा द्या. हे कैलासविहारी महादेवा, तुमचा जय जयकार असो. हे योगीश्रेष्ठ जटाधारी आता तूच माझा तारणहार आहेस. मी तुला अनन्य भावाने शरण आलो आहे.” अंधकासुराने प्रेमाने केलेली अशी स्तुती ऐकून भोलेनाथ अति प्रसन्न झाले. अंधकाची विनंती ऐकून उमापतीने अंधकासुराची शिरे कैलास शिखरी नेण्याची आपल्या दूतांना आज्ञा केली. त्यानुसार दूत कैलासावर शिरे घेऊन गेले.
त्यानंतर भगवान शंकर, विष्णू, इंद्र व सर्व देवांना घेऊन मगधावरून मेकलक्षेत्री आले. युद्धानंतर महादेव दृढ समाधी अवस्थेत गेले. समाधी अवस्थेत असताना शंकरांच्या डोळ्यातून आनंदाने अश्रूबिंदू स्त्रवले. त्यापासून एक कन्या उत्पन्न झाली. हे दशरथनंदन, हीच ती रेवा. त्या कन्येस पाहून सर्व देवांना आश्चर्य वाटले व आनंदही झाला. देवांनी त्यावेळी उद्गार काढले की जगातील पापांचा नाश्यासाठी हीच शिवकन्या माध्यम बनेल.”
ही नर्मदा उत्पत्तीची कथा जो कोणी मनोभावे श्रवण किंवा पठण करेल, त्याला पुण्य लाभून परमपदाची प्राप्ती होईल. हे शिवात्मजे भगवती अंबे, माता तू माझ्यावर प्रसन्न हो. तुझ्या तीरीच मला मृत्यू येवो, हेच माझे मागणे आहे. तुला मी पुन्हा पुन्हा साष्टांग दंडवत करते. हे देवी माझ्यावर प्रसन्न हो. नर्मदे हर!!!
॥ इति श्री नर्मदापुराणे वशिष्ठश्रीरामचंद्र संवादे शिवविजयोनाम चतुर्थोध्याय: ॥
*श्री सद्गुरू धार्मिक यात्रा कंपनी*
कर्वे नगर,पुणे
8983194154 / 9767118804
(ही पोस्ट नावासकट कॉपी/फॉरवर्ड करायला आमची काहीच हरकत नाही)
[05/11, 5:05 AM] Ganesh Puran: १.
०४ /११/२०२०
*|| श्रीस्वामीसमर्थ ||*
*नर्मदे हर! नर्मदे हर! नर्मदे हर!*
*|| श्री नर्मदा माहात्म्य ||*
* अध्याय चौथा (शिवविजयोनाम)*
*|| श्री गणेशाय नमः || श्री विठ्ठलाय नमः || श्री पांडुरंगाय नमः || श्री रुक्मिणीकांताय नमः ||*
देवा, तु कटेवर हात ठेवून उभा आहेस. यातून जणू काही तु असे सांगत आहेस की भवसागराच्या पैलतीरी सावकाश उतरा, मी कटेवर हात ठेवून सज्ज आहे. भीमा तीरी उभा राहून मी तुम्हालाच पाहत आहे. अशी ही घनश्याम मूर्ती पाहून आमच्या मनाला धीर मिळतो. असा कैवारी, पतितपावन असताना आम्हाला कशाची भीती आहे?
मागच्या अध्यायात आपण पाहिले आहे. रामाने प्रायश्चित्त करण्यासाठी नर्मदातीरी गमन करावे असा उपदेश वशिष्ठ ऋषींनी केला. वसिष्ठ ऋषींचा उपदेश ऐकून रामचंद्रांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले. ते ऋषींना म्हणाले, “हे गुरूराजा, दयाळा! ही नर्मदा कशी उत्पन्न झाली? समुद्रात ती कोठे मिळाली? याची सर्व कथा कृपया आपण मला सांगावी.” वशिष्ठ ऋषी म्हणाले, “हे रामा, नर्मदा उत्पत्तीची कहाणी आता मी तुम्हांला सांगतो, ती आपण भक्तीभावाने श्रवण करावी.
फार पूर्वी अंधक नावाचा एक महाबली महादैत्य होऊन गेला. शिवजींच्या घामाच्या थेंबाच्या तेजापासून अंधकाचा जन्म झाला होता. अंधक हा जन्मतः अतिशय भयानक, कुरूप व अंध होता. कश्यपपूत्र हिरण्याक्षाने व त्याच्या पत्नीने संतान प्राप्तीसाठी फार कठोर तपश्चर्या केली. त्या तपश्चर्येच्या फलस्वरूप देवाधिदेव महादेवांनी आपला पुत्र अंधक याला हिरण्याक्षाला सुपूर्द केले. अंधकाला त्याची भावंडे खूप चिडवत असे. ही भावंडे आपले राज्य हिसकावून घेतील अशी अंधकाला भीती वाटू लागली. त्याने अफाट शक्तीच्या प्राप्तीसाठी घोर तपाचरण आरंभिले. त्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन ब्रह्मदेवांनी अंधकाला पाच शिरे व दहा हात तसेच दिव्यनेत्र प्रदान केले. त्याच बरोबर त्याला अफाट शक्ती व सामर्थ्याचेही वरदान दिले.
ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे अंधक फार उन्मत्त झाला. त्याने सर्वांचा छळ करण्यास सुरुवात केली. सर्व देवांना जिंकून त्यांना पदभ्रष्ट केले. अंधकाला त्रासून सर्व देव ब्रह्मदेवाला शरण गेले. ब्रह्मदेव सर्व देवांना घेऊन कैलासावर गेले. तेथे भगवान शिव ध्यानात मग्न होते. सर्व देवांनी हात जोडून शिवाला प्रार्थना केली, “हे देवा शांतमूर्ती, आम्ही तुला नमन करतो. हे देवा महादेवा, आमचे कल्याण आता तुमच्याच हाती आहे. हे वृषभध्वजा, चराचर जगताचे तुम्हीच अधिष्ठान आहात. हे ब्रम्हतेज, तुम्हीच सर्व वेद व त्या वेदांचा अर्थ आहात. तुम्हीच आपल्या आद्यशक्तीने नानाप्रकारच्या योनी निर्माण केल्या आहेत. हे पार्वतीरमणा, तुमचा जयजयकार असो. आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. अंधक दैत्याने आम्हांला पदभ्रष्ट करून स्वर्गातून हाकलले आहे. हे पंचानना, आमचे रक्षण करा.”
देवांची अशी दैना झालेली पाहून प्रभूला त्यांची दया आली. सर्व देवांना व गणांना सोबत घेऊन भगवान शंकर अंधकाशी युद्ध करण्यास निघाले. वृषभारुढ शिवाची स्वारी बघून अंधक देखील युद्धासाठी पुढे सरसावला. भगवान शंकर सर्व सैन्यासह अनेक शस्त्रांस्त्रानीशी कैलासावरून मगध रणांगणी आले. देव व दैत्यामध्ये भयंकर युद्ध सुरू झाले. अंधकासुर सांब सदाशिवा सोबत लढू लागला. इंद्र व वातापी यांचे द्वंद्व युद्ध सुरु झाले. षण्मातुर तारकाशी तर शुंभनिशुंभ भद्रकालीशी लढू लागले. देव असुरावर वेगवेगळे शक्तीप्रयोग करू लागले. तर असूरही देवांवर शस्त्रास्त्रांनी वार करू लागले.
असुरांचे अनेक वीर छिन्नविच्छिन्न होऊन धारातीर्थी पडले. रक्ताचे पाट वाहू लागले. असूरांच्या मृतदेहांचे ढिगारे पडू लागले. देव बाजी जिंकत आहेत हे बघून अंधक संतापला. देवांचे युद्ध कौशल्य पाहून असुरसेना पलायन करून लागली. अंधकाने सर्वांना थांबवले व युद्ध करण्यास प्रेरित केले. परंतु तरीही घाबरलेल्या असुरांना पाहून अंधकाने गर्जना केली. तो म्हणाला, “हे मंदभाग्य शंकरा, मी तुझे शीर तोडून टाकेल. तू अजून माझी अस्त्रकला पाहिली नाहीस. तुला मृत्यू येऊ नये असे वाटत असेल तर मला शरण ये, माझ्या दहा भूजा आहेत आणि तुझ्या दोनच आहेत. तू माझ्यापुढे शक्तीहीन आहेस.”
अंधकासुराने क्रोधाने शंकरांच्या दिशेने दिव्य बाण सोडला. शंकरानेही असुराच्या दिशेने शूल भिरकावला. अंधकासुरानेही भगवान शंकरांच्या दिशेने शूल भिरकावला. यावेळेस मात्र तो अचूक महादेवांच्या शिरावर आदळला. भगवान पिनाक मूर्च्छित झाले. अंधकाने त्वरित दुसऱ्या शुलाने नंदीलाही मूर्च्छित केले. त्या दोघांना मूर्च्छित झालेले पाहून अंधकासुराच्या मनाला आनंद झाला. परंतु सर्व देव भयभीत झाले. सर्व देव आपापसात पुटपूटु लागले. “महादेव कसे काय मूर्च्छित झाले? आता आपण कुठे जायचे? काय करावे?” अशा प्रकारे सर्व देव चिंतीत झाले.
त्याचवेळी मूर्च्छा सावरून भगवान शिवांनी लोचन उघडले आणि नंदीकडेही कृपादृष्टीने पाहिले, तसा नंदीही उभा राहिला. सर्व देवांना आनंद झाला. सर्व देवांनी महादेवांवर पुष्पवर्षाव करून त्यांचा जयजयकार केला. त्यानंतर महादेवांनी अंधकाप्रमाणे दशभुज रूप घेऊन हातात नाना आयुधे धारण केली. आपल्या प्रमाणे शंकराचे रूप पाहून अंधक चकित झाला. तो तिरस्काराने हसून म्हणाला, “हे शंभो, तू जरी माझ्याप्रमाणे पाच शिरे व दहा हातांचे रूप घेतले असले, तरी मी तुझे पाचही शिरे तोडून टाकतो आणि त्रैलोक्यात माझी कीर्ती करतो.”
*श्री सद्गुरू धार्मिक यात्रा कंपनी*
कर्वे नगर,पुणे
8983194154 / 9767118804
[05/11, 5:05 AM] Ganesh Puran: २ .
शिव आणि अंधकासुरातील युद्धाची वार्ता वैकुंठात पोहोचली. ती ऐकता क्षणी शामसुंदर गरुडावर आरूढ होऊन आपल्या सोळा सहस्त्र पार्श्व गणांसहित युद्धस्थानी आले. दैदिप्यमान विष्णूची हाती नानाशस्त्रे घेतलेली, मकरकुंडले घातलेली मूर्ती समोर पाहून शिव मनाला आनंद झाला. सांब सदाशिवाने आनंदून डंका वाजविला. सर्व देव पुन्हा उत्साहाने असुरांशी युद्ध करू लागले.
भगवान पशुपती हातात तेजस्वी शूल घेऊन असुरांवर वार करू लागले. किरीट कुंडलासह अनेक असुरांची मस्तके तुटून धरतीवर पडू लागली. युद्धभूमीवर दुंदूभी नाद घनानू लागले. देव, ऋषी, गंधर्व मिळून आनंदाने पुष्पवर्षाव करू लागले, अप्सरा नृत्य करू लागल्या. शंकराने एक-एक करून अंधकाची सर्व मस्तके छाटून टाकली.
वशिष्ठ ऋषी रामास पुढे सांगू लागले, “हे रामा, छिन्नविच्छिन्न पडलेली अंधकाची मस्तके शिवाला म्हणाली, “हे कैलासपती महादेवा, तुझ्या हातून मृत्यूचा दुर्लभ योग तर योगी जनांच्याही नशिबी नसतो. हे पंचानना, माझ्या अपराधाला तुम्ही क्षमा करा. हे निळकंठा, तू दयाळू माऊली आहेस. मला आता तुमच्या पदकमली जागा द्या. हे कैलासविहारी महादेवा, तुमचा जय जयकार असो. हे योगीश्रेष्ठ जटाधारी आता तूच माझा तारणहार आहेस. मी तुला अनन्य भावाने शरण आलो आहे.” अंधकासुराने प्रेमाने केलेली अशी स्तुती ऐकून भोलेनाथ अति प्रसन्न झाले. अंधकाची विनंती ऐकून उमापतीने अंधकासुराची शिरे कैलास शिखरी नेण्याची आपल्या दूतांना आज्ञा केली. त्यानुसार दूत कैलासावर शिरे घेऊन गेले.
त्यानंतर भगवान शंकर, विष्णू, इंद्र व सर्व देवांना घेऊन मगधावरून मेकलक्षेत्री आले. युद्धानंतर महादेव दृढ समाधी अवस्थेत गेले. समाधी अवस्थेत असताना शंकरांच्या डोळ्यातून आनंदाने अश्रूबिंदू स्त्रवले. त्यापासून एक कन्या उत्पन्न झाली. हे दशरथनंदन, हीच ती रेवा. त्या कन्येस पाहून सर्व देवांना आश्चर्य वाटले व आनंदही झाला. देवांनी त्यावेळी उद्गार काढले की जगातील पापांचा नाश्यासाठी हीच शिवकन्या माध्यम बनेल.”
ही नर्मदा उत्पत्तीची कथा जो कोणी मनोभावे श्रवण किंवा पठण करेल, त्याला पुण्य लाभून परमपदाची प्राप्ती होईल. हे शिवात्मजे भगवती अंबे, माता तू माझ्यावर प्रसन्न हो. तुझ्या तीरीच मला मृत्यू येवो, हेच माझे मागणे आहे. तुला मी पुन्हा पुन्हा साष्टांग दंडवत करते. हे देवी माझ्यावर प्रसन्न हो. नर्मदे हर!!!
॥ इति श्री नर्मदापुराणे वशिष्ठश्रीरामचंद्र संवादे शिवविजयोनाम चतुर्थोध्याय: ॥
*श्री सद्गुरू धार्मिक यात्रा कंपनी*
कर्वे नगर,पुणे
8983194154 / 9767118804
(ही पोस्ट नावासकट कॉपी/फॉरवर्ड करायला आमची काहीच हरकत नाही)
[05/11, 6:46 AM] Ganesh Puran: १.
०५ /११/२०२०
*|| श्रीस्वामीसमर्थ ||*
*नर्मदे हर! नर्मदे हर! नर्मदे हर!*
*|| श्री नर्मदा माहात्म्य ||*
* अध्याय पाचवा (नर्मदोपक्रमनाम)*
*|| श्री गणेशाय नमः ||
हे माधवा! तुझा जयजयकार असो. हे केशवा! तू माझ्यावर रुसला आहेस का? या जन्मातच मला तुझे दर्शन घडू दे. हे मुरलीधरा! तु पावा वाजवून धेनूंचे मनोरंजन करतोस, धेनुंना सांभाळून तू स्वतःला गुराखी म्हणून घेतोस. हे अजपाला! मी ही एक हरवलेलं वासरु आहे, माझ्यावर कृपा करा व माझे रक्षण करा.
नर्मदेचे भुमीवरती अवतरण झाले. मेकल पर्वतावर सर्व देवांसह पशुपती उत्सव साजरा करत होते. पुढचा वृत्तांत ऐकण्यासाठी प्रभू रामचंद्रांचे कान आतुर झाले होते. त्यांनी वशिष्ठ ऋषींना विनंती केली की, “कृपया मला अंधकासुराच्या वधानंतर पुढे काय झाले हे सांगावे. नर्मदेच्या उत्पत्तीची कथा तर ऎकली. आता पुढेही काय झाले हे सविस्तर सांगावे.” रामाची नर्मदे बद्दलची जिज्ञासा बघून वशिष्ठांना आनंद झाला. ते पुढील कथा सांगू लागले.
“हे रामा, नर्मदेला पापशमन करणारी म्हणून मान्यता मिळाली आहे. त्याचा कथाभाग मी कथन करतो. आपण तो भक्तिभावाने श्रवण करावा. मेकल पर्वतावर महादेव सर्व देवतांसह उत्सव करीत होते. किरिट, कुंडले विभूषीत करुन, अंधकाचे चर्म धारण करून, जाज्वल्यमूर्ती पंचानन आनंदाने डोलत होते. अंधकांतकाची अशी मोहक मूर्ती पाहून सर्व देवी देवता, ब्रह्मा, विष्णू, गंधर्व, किन्नर, यक्ष अतिशय हर्षित झाले. शिव असे प्रसन्न वदन बसलेले असताना सर्व देवतांना आपल्या मनातील शंकांचे निरसन करावे असे वाटले. शिवशंकर हे जगद्गुरु आहेत. स्वतःच्या कल्याणस्तव सर्व देव महादेवांशी चर्चा करू लागले.”
“हे देवाधिदेव महादेव, आपण ह्या सृष्टी निर्मितीचे कार्य ब्रह्मदेवांकडे सोपवले व आम्हालाही सृष्टी संदर्भातील वेगवेगळी कार्य नेमून दिली. देवांचा राजा म्हणून इंद्राला गौरविले. सर्व महत्त्वाची कामगिरी देऊन आम्हा सर्वांना आपण देव बनविले. सर्वांच्या कल्याणार्थ अनेक कामे सांगितली. आम्हाला महान केले. असे असतानाही आमच्या हातून बरेच वेळेला अनावधानाने किंवा जाणतेपणी कुकर्मे घडली आहेत. अहिलेच्या सौंदर्यावर मोहीत होऊन इंद्राने कपटाने तिच्याशी समागम केला. चंद्रानेही गुरुपत्नीची अभिलाषा धरली. सूर्यही अनेकदा अतिशय प्रखर होऊन सामान्य जनांना त्रासदायक ठरतो. यम पाप-पूण्यानुसार अनेकांना नरक यातना देतो. विष्णूने सुद्धा अनेकदा फसवणुकीने राक्षसांना ठार केले आहे. ब्रह्मदेवानेही स्वतःच्या कन्येकडेच पाप दृष्टीने पाहिले. या कारणामुळे आपण ब्रह्मदेवांचे चौथे मस्तक तोडले. असे अनेक पापे आपल्या सर्वांच्याच हातून घडले आहेत. या सर्व पापांचे प्रायश्चित्त घेऊन सर्वांची शुद्धी व्हावी असा काहीतरी उपाय सांगावा, उमापती.”
देवांची की विनवणी भगवान विष्णूंनाही योग्य वाटली. महादेवांनी यावर काहीतरी मार्ग सांगावा, यासाठी श्रीहरींनी त्यांची स्तुती आरंभली. “हे महादेवा, तुम्ही खूप दयाळू आहात. आपण नेहमीच ध्यानमग्न असता. योग्यांचे सिद्धपीठ असणारे आपण हातात परशू, खड्ग, वज्र, शूल धारण करून भक्तांना अभय देता. एका हातात डमरू, गळ्यात नागपाश, एका हाती त्रिशूळ, डाव्या बाजूला पार्वती या सर्वांनी तुम्ही खूप शोभून दिसता. आता हे दयाळा, आपण आम्हाला योग्य धर्म सांगावा. जाणतेपणी किंवा नकळत आमच्या हातून अनेक पापे झाली आहेत. ती कशी लयाला जातील हे सांगावे. इहपर लोकीचे सुख हे आपण केलेल्या पाप-पुण्यावर अवलंबून असते. आमचे कल्याण कशात आहे? ते सांगण्याची कृपा करावी महादेवा. सर्व तीर्थात उत्तम असे तीर्थ कोणते आहे, की जेथे जाऊन आम्ही पाप क्षालन करू शकतो? हा गुह्यार्थ सविस्तर सांगावा भोलेनाथ.”
विष्णूंचा हा सुंदर प्रश्न ऐकून भगवान ईशान आनंदून गेले. प्रफुल्लित होऊन ते सांगू लागले, “हे लक्ष्मीपती आणि सर्व देवांनो, अंधकासुराच्या वधानंतर ध्यानमग्न असताना आनंदाने माझ्या नेत्रातून चंद्रामृत स्त्रवले. त्याचा भूमीस स्पर्श होताच त्यातून एक दिव्य, शोभिवंत कन्या प्रकट झाली. माघातील शुद्ध तिथीला, रथसप्तमीला, मध्यान्ह समयी अश्विनी नक्षत्र असताना, रवी जेव्हा मकर संक्रमण करीत होता, तिच ह्या कन्येची जन्म घटिका. त्या कन्येची कांती नीलकमलासम श्यामवर्णाची आहे. तिचे सर्व अवयव अतिशय सुबक आहेत. सर्व आभूषणाने नटलेली ती बालिका, अतिशय सुंदर दिसत आहे.” अशा या कमळासारखे नेत्र असलेल्या बालिकेला पाहून हरिहरासहित सर्व देवांनी तिच्यावर पुष्पवर्षाव केला. गंधर्व व किन्नर तिला बघून यशगान करू लागले. ऋषीमुनी हर्षून गेले. अप्सरा नृत्य करू लागल्या.
*श्री सद्गुरू धार्मिक यात्रा कंपनी*,
कर्वेनगर, पुणे
8983194154/9767118804
[05/11, 6:48 AM] Ganesh Puran: २.
मुनींच्या मुखातून स्तुतीपर श्लोक रचले गेले.
नमः शिवाय शांतायै । वरदायै नमो नमः।
नमस्त्रैलोक्य सारायै । देव्यै तुभ्यं नमो नम: ।
नमो शिवात्मजे शांतमूर्ती । वरदायके त्रैलोक्यशक्ती ।
भगवती देवी तुजप्रती । नमो नमो पुन: पुन:
“हे देवी, तूच हे जग निर्माण केलेस. तुच याचे दयेने पालन करतेस. पृथ्वीचाही भार शेषरुपाने तूच वाहत आहेस. तू हे अवघे विश्व व्यापिले आहेस. तुझ्याच ठायी सर्व चैतन्य सामावले आहे. अंबिका रूपाने तूच अवघे विश्व व्यापिले आहेस. सिद्धजांची तूच सिद्धी आहेस. तूच जगाची तेजप्रभा आहेस. तुझ्या कृपेची सावली आम्हा भक्तांवर कायम असू दे भगवती. हे महाभीमे, तुझ्या पराक्रमांना मी नमन करतो. भवभयतारके, भक्तवत्सले तुला मी साष्टांग प्रणिपात करतो. हे सुरवरांना मोहित करणारी, जगत्रय पावनी, कालमोह तपस्विनी, महारात्री तुला माझे नमन असो.”
“हे जीवनकर्ती, तुझी कांती बलाने शोभते. तुझ्या आशीर्वादाने शांती, पुष्टी, तुष्टी लाभते. हे देवी, जे तुला शरण येतात, त्यांचे दुःख तू प्रसन्न होऊन निवारण करते. तशिच कृपा तु आम्हांवरही कर.” आनंदाश्रू पासून जन्म झाल्यामुळे तू नर्मदा या नावाने प्रसिद्ध होऊन त्रिभुवनी विख्यात होशील. रे अव इति, रेवा म्हणजे सर्वांचे पालन करणारी म्हणून ही नर्मदा रेवा हे द्वितीय नाव धारण करेल.” अशा प्रकारे मुनींची स्तुती ऐकून देवी प्रसन्न झाली. ती शंकराला हात जोडून विनंती करू लागली, “हे तात विश्वेश्वर, या कन्येला त्वरित काहीतरी आज्ञा करा.”
ब्रह्मानंदी सदा मग्न असलेले अंधकांतक त्या बालिकेचे बोलणे ऐकून आनंदून गेले. ते म्हणाले. “हे भद्रे, तु त्वरित वारीरूप धारण करून पृथ्वीवर संचार कर आणि भूतलावरच्या मूढ जीवांचे पापक्षालन करून त्यांना पावन कर. तुझ्या जलामध्ये अस्थी जरी पडल्या तरी त्या शीलारूप होतील”. महादेवांची अशी आज्ञा ऐकली व नर्मदा म्हणाली, “आपल्या आज्ञेनुसार मी पृथ्वीवर जाण्यास तयार आहे. पण माझा वेग या पृथ्वीवर कोण सहन करू शकेल?” देवीच्या या प्रश्नाचे उत्तर कैलासराणा पुढील अध्यायात सांगत आहेत.
ही परमपवित्र कथा पठण व श्रवण केली असता नर्मदा माई त्या भक्ताला सदा पावन करते. नर्मदा माहात्म्य पठण, श्रवण करणाऱ्याला नर्मदा स्नानाचे पुण्य लाभते. नर्मदा माताच आमची रक्षणकर्ता आहे, असा विश्वास हृदयात ठाम केला असता त्या प्राण्याला जगात कश्यालाही घाबरण्याचे काहीच कारण नाही. या सासररुपी जगात नांदत असताना माझे दिवस फार कष्टप्रद होत आहेत. हे आई जगदंबे, मला मोक्ष देऊन माहेरी म्हणजे तुझ्या जवळ घेऊन जा.
॥ इति श्री नर्मदापुराणे वशिष्ठश्रीरामचंद्र संवादे नर्मदोपक्रमनाम पंचमोध्याय: ॥
*श्री सद्गुरू धार्मिक यात्रा कंपनी*,
कर्वेनगर, पुणे
8983194154/9767118804
(ही पोस्ट नावासकट कॉपी/फॉरवर्ड करायला आमची काहीच हरकत नाही)
[06/11, 5:00 AM] Ganesh Puran: १.
०६ /११/२०२०
*|| श्रीस्वामीसमर्थ ||*
*नर्मदे हर! नर्मदे हर! नर्मदे हर!*
*|| श्री नर्मदा माहात्म्य ||*
*अध्याय सहावा (नर्मदोत्पत्तीनाम)*
*|| श्री गणेशाय नमः ||*
हे वनमाली श्रीकृष्णा! माझ्या गोकुळरुपी हृदयात तू नित्य वास करावास.
मागच्या अध्यायात नर्मदा मातेने महादेवांना माझा वेग कोण सहन करेल, असा प्रश्न विचारला होता. याला उत्तर देताना भगवान शंकर हसून म्हणाले, “हे मुली, तू वेगाने वाहू नकोस. शांत आणि मंद प्रयान कर म्हणजे तुझ्या वेगाचे कोणाला भय वाटणार नाही.”
पार्वतीरमणाने विंध्याचलास सांगावा धाडला. तो मिळताक्षणी गिरीचर त्वरित महादेवांसमोर दोन्ही हात जोडून उभा राहिला. सुंदर अलंकाराने भुषित असा गिरीराज नररूपाने शिवजींसमोर उपस्थित होऊन त्यांची स्तुती करू लागला.
*नमो भगवते आद्यशक्ती ।*
*देहेंद्रिय रहित दिव्यमूर्ती ।*
*ज्योतीस्वरूपा तुज नमो ।*
“हे महादेवा, सूर आणि असूर सर्व जण तुमचे पूजन करतात. तुम्हीच त्रैलोक्याचे पालन करता. अवघे विश्वच तुम्ही व्यापले आहे. तुम्हांला माझा साष्टांग नमस्कार असो. हे भगवंता, आपण मला कोणत्या कार्याकरिता बोलवले आहे? कृपया आज्ञा करावी.”
अचलाचे असे स्तुतीपर बोलणे ऐकून महादेवांनी आनंदाने त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला. महादेव पुढे म्हणाले, “हे गिरींद्र मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऎक. तिन्ही लोकांतील जनांचे पाप हरण करण्यासाठी, माझ्या या दिव्य कन्येचे आगमन झाले आहे. तिला मी वारीरूपाने भूतलावावर जाऊन सर्व जनांचे हित करण्याची आज्ञा दिली आहे. परंतु तिचा एवढा प्रचंड वेग कोण सहन करू शकेल, असा तिला प्रश्न पडला आहे.
“हे शैला, या कार्यासाठी तुझ्यापेक्षा कोणी दुसरा सामर्थ्यवान नाही. तिचा वेग सहन करण्याची शक्ती फक्त तुझ्यातच आहे. तूच तिचा वेग सहन करावा. मी तुम्हा दोघांना वर देतो, तुमच्या प्रांतात जे कोणी वस्ती करतील, त्या सर्वांना धनधान्य, पुत्रपौत्र लाभेल. ते विविधभोग भोगून उत्तमगतीला पावतील. माझी कृपा सदैव त्यांच्यावर असेल. तुझ्या किनारी नेहमी आसनसिद्ध, शांत, तपस्वी योगी निवास करतील. नेहमी यज्ञादि कर्मे करणारे सुजन तेथे राहतील.”
शंकराची आज्ञा ऐकून विंध्याचलाने विनम्रभावाने महादेवास नमस्कार केला. विंध्याचल आणि त्याचा पुत्र पर्यंक हे दोघेही नर्मदेचा वेग सहन करण्याची जबाबदारी शिवांनी आपल्यावर सोपविल्यामुळे अतिशय हर्षित झाले. विंध्य दक्षिण बाजूस तर पर्यंक उत्तरेस झुकला. शिवआज्ञा शिरसावंद्य मानून दोघांनीही नम्रतेने ही जबाबदारी स्वीकारली.
भगवान पशुपती देखील अत्यंत आनंदित झाले. ते पुढे नर्मदेला म्हणाले, “हे देवी, भगवान विष्णू ह्या जगाचे पालनकर्ते आहेत. सर्व योगीजन त्यांच्याच पदकमलांचे ध्यान करत असतात. ह्या लक्ष्मीपतीच्या मात्र दर्शनाने सर्व चिंता हरतात. हे मुली, मी ह्यांचा महिमा कसा वर्णन करु? त्यांच्या चरणाच्या जलाने हे संपूर्ण जग पावन होते. त्यांचे चरणामृत म्हणजे निर्मळ गंगाच आहे. ज्यांचे पूजन सर्व देव करतात अशा श्री विष्णूंना तू नमन करूनच भूतली जा. त्यांना नमस्कार केला असता चहुकडे तुझा जय होणे निश्चित आहे.
*श्री सद्गुरू धार्मिक यात्रा कंपनी*,
कर्वेनगर, पुणे
8983194154 / 9767118804
[06/11, 5:01 AM] Ganesh Puran: २.
नर्मदादेवी हात जोडून नम्रपणे उभी राहिली. तिने अनन्यभावाने रमावराचे स्तवन आरंभिले. “सर्व दुरितांचे निवारण करणार्याी नारायणा, तुला माझे नमन असो. कमळात जसे भ्रमर लीन होते, तसे मी आपल्या चरणी लीन झाले आहे. तुम्ही योगीजनांचे अधिष्ठान आहात. तुम्हीच ब्रह्मांडांचे पालन-पोषण करता. वर्षाऋतूच्या मेघासारखा तुमचा रंग शामवर्णी आहे, तर तुमचे पितांबर हे विद्युलतेसारखे आहे. हातात सूत्रहार, मुकुटामध्ये किरीट, बोटांमध्ये नानाप्रकारच्या अंगठ्या अशा अनेक अलंकाराने आभूषित पद्मनाभा मी तुम्हाला शरण आले आहे.
हे घनश्यामा, माझ्या जलामध्ये जे कोणी स्नान करतील त्यांचे पापक्षालन करण्याची शक्ती, एक वेगळे सामर्थ्य प्राप्त व्हावे, असा मला वर द्यावा. मन, इंद्रिये, चैतन्य ही सर्व तुझीच रूपे आहेत गोविंदा. या जगात तुझी अनेक रूपे असतानाही तु एकच आहेस. सत्व, रज, तम ही प्रकृती देखील तुझीच रुपे आहेत, श्रीपती. कोणी तुला निर्गुण-निराकार म्हणतात, तर कोणी तुला सगुण-साकार म्हणतात. सगुण-निर्गुण सर्व काही तूच आहेस, केशवा. हे सचिदानंद चिद्धन! तुझ्या कृपाप्रसादाने पुत्रपौत्र, धनधान्य सर्व प्राप्त होते. हे परमदयाळू नारायणा! तुला शत शत नमन असो.
हे कृपाळू सदानंदा, पतितपावना, दिनदयाळा, जगाचा जसा तु प्रतिपाळ करतोस तसाच माझाही कर. शुभ योनीत जन्म घेतलेल्या सर्वांनी तुझीच भक्ती केली तर ते तुझ्याच चरणाशी येऊन परमगतीला प्राप्त होतात. हे जगन्नाथा! मी पण तुझ्याच चरण छायेत आले आहे. माझ्या जलाने संपूर्ण जग पावन व्हावे असा मला आशीर्वाद द्यावा. जे माझ्या जलात स्नान करतील आणि आदराने माझे जल ग्रहण करतील, अशा सर्व जीवांचे, अगदी कीटकांपासून ते मनुष्ययोनीतील सर्वांचा उद्धार होवो, असा मला वर द्यावा.”
नर्मदेची ही स्तुतीवचने ऐकून नारायण प्रसन्न झाले. ते म्हणाले, “हे नर्मदे, तू एक पवित्र गंगाच आहेस. तुझ्या जलात स्नान केल्याने, जलपान केल्याने, अखिल जगातील समस्त जीवांचे पापभंग होतील. तुझ्या जलातील सर्व शीला या शिवस्वरूप निर्मल असतील. अशा शिलांचे पूजन करणे म्हणजे साक्षात शिवांचे पूजन करण्यासारखे आहे. गंडकी नदीतील शाळीग्रामांची चक्रे म्हणजे स्वतः मी ( भगवान विष्णू) आहे. त्याचप्रमाणे तुझ्या नदीतील शीला हे स्वयं देवाधिदेव महादेव असतील. त्यांचे पूजन केल्याने मोक्ष मिळेल.”
श्री विष्णूंचे आर्शिवचन ऐकता क्षणी रेवाने हात जोडले व ती अंतर्धान पावली. सर्व देव विस्मित होऊन एकमेकांकडे बघू लागले. त्याच क्षणी रेवा जलप्रवाहाचे रुप घेऊन कोटीतीर्थला जाऊन मिळाली. ते पाहून सर्व देवांना अत्यानंद झाला. तेथे दुंदुभी च्या आवाजात सर्वजण रेवावर पुष्पवर्षाव करू लागले. जयघोषांनी सर्व अंबर दणाणून गेले. जलप्रवाहाची एक मंद धार कोटीतीर्थाला जाऊन मिळाली.
वशिष्ठ ऋषींच्या मुखातून नर्मदा उत्पत्तीचे सविस्तर वर्णन ऐकून प्रभू श्रीराम आनंदून गेले. ते पुढे ऋषींना विचारतात, “गुरुवर्य, गायत्री आणि सावित्री या रेवाला कशा मिळाल्या? कृपया याचे वर्णन सांगावे.” याचे उत्तर वसिष्ठ ऋषींच्या रसाळ वाणीतून पुढील अध्यायात वाचू.
॥ इति श्री नर्मदापुराणे वशिष्ठश्रीरामचंद्र संवादे नर्मदोत्पत्तीनाम षष्टोध्याय: ॥
*श्री सद्गुरू धार्मिक यात्रा कंपनी*,
कर्वेनगर, पुणे
8983194154 / 9767118804
(ही पोस्ट नावासकट कॉपी/फॉरवर्ड करायला आमची काहीच हरकत नाही)
[07/11, 5:01 AM] Ganesh Puran: १.
०७ /११/२०२०
*|| श्रीस्वामीसमर्थ ||*
*नर्मदे हर! नर्मदे हर! नर्मदे हर!*
*|| श्री नर्मदा माहात्म्य ||*
*अध्याय सातवा (कोटीतीर्थवर्णन)*
*|| श्री गणेशाय नमः ||*
“हे कमलावरा, हे शामसुंदरा तुझा जयजयकार असो. मला तुमच्याच पदांशी आसरा द्यावा.”
वशिष्ठ ऋषींसारख्या श्रेष्ठ वक्त्यांनी सांगितलेली व प्रभू श्रीरामांसारख्या श्रोत्यानी ऐकलेली गायत्री व सावित्री यांची नर्मदा संगमाची अत्युत्तम कथा आज आपण श्रवण, पठण करणार आहोत.
वशिष्ठ ऋषी रामाला पुढील कथा सांगू लागले, “हे श्रीरामा, आता मी तुम्हाला परमपावन कोटीतीर्थाची कथा सांगतो. फार पूर्वी ब्रह्मदेवाच्या त्वचेपासून एक कन्या जन्माला आली. ती महारुपवती मानिनी रक्तवर्ण कांतीची होती. रक्तालंकार ल्यायलेली ती चतुर्भुजा चतुराननी तेजाने झळकत होती. ती पद्मनयनी कन्या अक्षसूत्र कंठमणी घालून, अतिशय सुंदर दिसत होती. तिच्या हातात कमंडलू शोभत होता.
त्या कन्येला पाहून लोकेशाला अतिशय आनंद झाला. त्यांची काया आनंदाने रोमांचित झाली. तिच्या सुमधूर गायनामुळे तिला गायत्री असे नाव प्राप्त झाले. देवी गायत्री हात जोडून विधात्यास म्हणाली, “हे देवाधिदेव सनातन, तुम्हाला माझा नमस्कार असो. हे सृष्टीनिर्मात्या मला आपल्या इच्छेनुसार आज्ञा करावी. मी या जगात कोठे जाऊन वस्ती करावी, हे कृपया मला सांगावे.”
देवीचे बोलणे ऐकून ब्रह्मदेव म्हणाले, “हे देवी, तुला पाहून मी कृतार्थ झालो आहे. तु ब्राह्मणांना तोषविण्यासाठी भूतलावावर गमन करावे. प्रातःसमयी तू ब्राह्मणांच्या मानसस्थळी राहा, मध्यान्ह समयी हृत्कमळी वास कर. सायंकाळी तू गरुढावर संस्थित, शंखचक्राने सुशोभित अशी कृष्णरूपा सरस्वती रूप धारण कर. अशा तुझ्या त्रिविध रुपाचे जो ब्रह्मवर्ग पूजन करेल, त्यांना तू शुभदायक होशील.
जे ब्राह्मण तुझे ध्यान करतील, तुझी त्रिसंध्या पूजा करतील, त्यांचे पाप हरण करण्याची सिद्धी तुला प्राप्त होण्यासाठी तू मेकल पर्वती जा. तु तेथे तप करून सिद्धी प्राप्त कर. त्या सिद्दीने तुला निर्मलरूप प्राप्त होऊन, भूतलावरील ब्राह्मणांचे पाप हरण करण्याचे सामर्थ्य निःसंशयपणे प्राप्त होईल.” पितृवचन ऐकून ती पुण्यशिल गायत्री मेकल पर्वतावर जाऊन तप करू लागली. अशा या गायत्रीच्या नित्य पूजनाने खूप लाभ होतो. तिच्या कृपेने साधकाला गृहसौख्य व भुक्ती-मुक्ती लाभते. त्या तपोनिष्ठ पावनकर्तीच्या साधनेने शत्रूंवर जय प्राप्त होतो. भूतप्रेतांचे निवारण होते. क्रूर पशूंचा त्रास होत नाही. देवीच्या भक्तांना घनघोर संग्रामात विजय प्राप्त होतो. ब्रह्मात्मजा गायत्री ही साक्षात ब्रह्मविद्या आहे. तिच गायत्री पुढे वारीरूप धारण करून कोटीतीर्थ येथे नर्मदेच्या प्रवाहाला मिळाली.
गायत्री संगमाची कथा श्रीरामांना ऐकवल्यावर ऋषीश्रेष्ठ वशिष्ठ सावित्री संगमाची कथा सांगू लागले.
*श्री सद्गुरू धार्मिक यात्रा कंपनी*
कर्वे नगर,पुणे
8983194154 / 9767118804
[07/11, 5:01 AM] Ganesh Puran: २.
एकदा विधाता ब्रह्मदेवांनी पुष्कर क्षेत्री भव्य यज्ञ समारंभाचे आयोजन केले. त्या विधियुक्त वेदोक्त रीतीने आरंभिलेल्या यज्ञाला सर्व देवी-देवता, वेदशास्त्रात पारंगत असे तपोवृद्ध ब्राह्मण अशी सर्व मंडळी जमली होती. सिद्ध गंधर्वचरण, पितर, अग्निनारायण, आदित्य, रुद्रगण असे सर्वजण सपत्निक उपस्थित होते. यज्ञमंडप अतिशय सुशोभित करण्यात आला होता.
तेथे जवळच पत्नीशाळेत अनेक युवती विधीपत्नी सावित्री भोवती गोळा होऊन तिला अलंकाराने अभूषित करू लागल्या. मुहूर्त घटिका जवळ येऊ लागली. त्यावेळी ब्रह्मदेवांनी सावित्रीस निरोप पाठविला, “हे सावित्री, विधी आरंभ करण्याची वेळ समीप आली आहे, तरी तू आता उशीर न करता, त्वरित यज्ञमंडपात यावे.” त्यावर सावित्रीने आभूषणे, अलंकार धारण करता करताच “मी काही क्षणातच तयार होऊन येत आहे. मी यजमानांची पत्नी असून मला सर्वात सुंदर दिसले पाहिजे. अगदी क्षणभरातच मी येते” असा निरोप पाठविला.
विधात्याने पुन्हा निरोप पाठविला परंतु दरवेळेसच त्वरित येते, असा निरोप फक्त सावित्रीने पाठविला. पण सावित्री मात्र अलंकारित होण्यातच गर्क राहिली. काळ व्यतीत होत होता, शुभवेळ टळून जात होती, यासाठी शास्त्रांचा आधार घेऊन मार्ग काढण्याचे ठरले. शास्त्रानुसार यज्ञसमयी पत्नी उपस्थित नसेल तर त्यावेळी कुशाचा (दर्भाचा) आधार घ्यावा. कुशाच्या अग्रभागी शंकर, मध्यभागी जनार्दन तर कुशमुळी ब्रह्मदेव वसतात. जेथे पतीचा वास असतो, तेथे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरीत्या पत्नीचा वास असतोच. पत्नी अनुपस्थित असल्यास पत्नीच्या जागी कुश ग्रंथीचा उपयोग करावा.
मुहूर्त वेळ टळू नये यासाठी कुशग्रंथीला सावित्रीचा मान दिला. एवढ्यात नाना वस्त्रलंकारांनी आभूषित सावित्रीचे यज्ञमंडपी आगमन झाले. कुशग्रंथीचा प्रकार पाहून ब्रह्मपत्नी अतिशय संतप्त झाली. तिने ब्रह्मदेवांवर एक तीक्ष्ण कटाक्ष टाकला व आचमन करून तिने ब्रह्मदेवाला शाप दिला. ती म्हणाली, “हे प्राणनाथ, आपण माझ्याविना हे कार्य करत होतात. या अपराधाबद्दल मी तुम्हाला शाप देते की, या धरतीवर तुमची फक्त या पुष्करक्षेत्रीच पूजा होईल. अन्यत्र कोणी तुम्हाला पुजले तर तो नर माझ्या शापाने नरकात जाईल.” एवढे बोलून सावित्री तेथून निघून गेली. इकडे यज्ञसांगता झाली. पुष्कर क्षेत्राला तीर्थराज अशी संज्ञा दिली.
*श्री सद्गुरू धार्मिक यात्रा कंपनी*
कर्वे नगर,पुणे
8983194154 / 9767118804
[07/11, 5:02 AM] Ganesh Puran: ३.
यज्ञानंतर सर्व देवांनी सहकुटुंब आपापल्या धामाला प्रयाण केले. चतुराननही सत्यलोकी गेले. सावित्रीच्या शापामुळे भूतलावर कमलोद्भवाची फक्त पुष्करक्षेत्रीच पूजा होऊ लागली.
श्रीरामांनी गुरु वशिष्ठांना विचारले, “गुरुवर्य, ब्रह्मदेव हे सृष्टीचे निर्माणकर्ते. त्यांनी अनेकदा बोलावूनही सावित्री मातेने येण्यास विलंब केला. यामध्ये विधात्याची काहीच चूक नसताना, त्यांनी हा एवढा मोठा शाप का सहन केला? ते एवढे महान आहेत की या शापाचे ते सहज निवारण करू शकले असते. असे असताना त्यांनी ह्या शापाचा का स्वीकार केला?”
वशिष्ठ म्हणाले, “हे राम, यज्ञकर्मे करते समयी शांत राहणे अतिशय गरजेचे असते. आपल्या मनातील क्रोध, तिरस्कार या गोष्टी दूर ठेवून धीराने वागावे. तरच नराला पुण्यकर्म प्राप्त होऊन सिद्धी लाभते. यज्ञदीक्षा हाती घेतलेली असताना ब्रह्मदेवाने ज्या विवेकाने शापवाणी सहन केली, त्याची थोरवी अजूनही भूतलावर गायली जाते. जो दुसऱ्याला क्षमा करत नाही, त्याच्या अंतराला कधीही समाधान लाभत नाही. त्याचे हृदय नेहमी अस्थिर राहते व त्याला तीळभर ही शांतता लाभत नाही.”
काही दिवसाने सावित्रीच्या संतप्त मनाला पश्चाताप झाला. ती पती समीप जाऊन शोक व्यक्त करू लागली व पतीला शाप देण्याचच्याे पापातून मुक्ती मिळावी म्हणून विधात्याला प्रार्थना करू लागली. विधात्याने तिला मेकलक्षेत्री जाऊन तप करण्याची सूचना दिली. पतीच्या आज्ञेला अनुसरुन सावित्रीने तीव्र तपाचरण आरंभिले. ब्रह्मचार्यादी सर्व व्रतांचे पालन करून ती प्रक्षालती झाली. सावित्रीचे उग्र तप पाहून ब्रह्मदेव अती प्रसन्न झाले. त्यांनी तिला प्रेमाने आलिंगन दिले व म्हणाले, “देवी तू तुझ्या तपाने तुझ्या पापाचे निवारण केले आहेस.” त्याच वेळी सर्वदेवांसह भगवान विष्णु तेथे प्रकट झाले. सर्वांनी आनंदाने सावित्रीला अभिवंदन केले. त्याच क्षणी सावित्रीच्या पवित्र शरीराने जल रूप धारण केले व तेथेच तिचा नर्मदेशी संगम झाला.
ब्रह्मा, विष्णूसहित समस्त कोटी देवांनी त्या संगमात स्नान केले. त्यामुळे त्या तीर्थाला कोटीतीर्थ हे नाव देण्यात आले. त्या तीर्थामध्ये जो नर स्नान करतो, त्यास कोटीतीर्थाच्या स्नानाचे पुण्य मिळते. त्या नराला उत्तम गती प्राप्त होते. असा वर साक्षात ब्रह्मदेवांनी त्या तीर्थाला दिला आहे. त्या ठिकाणी सर्व देवांनी मिळून एक शिवलिंग स्थापन केले. त्या शिवलिंगाची षोडशोपचारे पूजा केली. अलंकाराने त्यास भुषित केले. त्या कोटेश्वर महादेवाची जे पूजा अर्चना करतात त्यांना उत्तम गती प्राप्त होते व कोटीतीर्थाचे पूण्य लाभते. विष्णू व विधात्यास या सर्व गोष्टींमुळे फार आनंद झाला. सर्व देव ब्रह्मा, विष्णू व कोटेश्वररुपी महेश्वराला नमस्कार करून स्वधामी परतले.
हे रघुनाथा, अशी ही कोटीतीर्थाची कथा.”
गुरु वाक्यावर नेहमी श्रद्धा ठेवावी. तेव्हाच आपल्याला शांततेची गोडी चाखता येते. नाहीतर आपली मनोवृत्ती अज्ञानाच्या ज्वाळेत नेहमीच होरपळत राहते. गुरु हे केवळ ब्रह्मानंद, परमसुखकंद आहेत. गुरूंचे नामस्मरण केले असता, त्वरित भवपाशाचा बंध तुटतो. अशा सद्गुरुंच्या चरणी माझे कोटी नमस्कार. कृष्णकृपेने ही कोटीतीर्थाची पर्वणी आपण वाचली.
॥ इति श्रीनर्मदापुराणे वशिष्ठश्रीरामचंद्रसंवादे कोटीतीर्थवर्णननाम सप्तमोध्याय: ॥
*श्री सद्गुरू धार्मिक यात्रा कंपनी*,
कर्वेनगर, पुणे
8983194154/9767118804
(ही पोस्ट नावासकट कॉपी/फॉरवर्ड करायला आमची काहीच हरकत नाही)
[08/11, 3:10 AM] Ganesh Puran: ०८ /११/२०२०
*|| श्रीस्वामीसमर्थ ||*
*नर्मदे हर! नर्मदे हर! नर्मबदे हर!*
*|| श्री नर्मदा माहात्म्य ||*
*अध्याय आठवा (कपीलासंगमोनाम)*
*|| श्री गणेशाय नमः ||*
हे परमानंदा, कृष्णा सुखकंदा, माझे भवबंध तोडण्यासाठी आता उशीर लावू नका. मी अपराधी, पापी, तापी तुला शरण आले आहे. तुझ्या वाचून माझा कोण कैवारी आहे, प्रभुराया?
प्रभू रामचंद्रांना नर्मदा माहात्म्य कथांची गोडी लागली. ते वशिष्ठ ऋषींना म्हणाले, “गुरुवर्य, मला आणखी तीर्थांची माहिती सांगावी.” वशिष्ठ ऋषी पुढे सांगू लागले, “हे श्रीरामा, आज मी तुम्हाला कपिलगंगेच्या संगम तीर्थाची कथा सांगतो. या परम पावन क्षेत्रावर तपाचरण करणे अतिशय फलदायी आहे.” हे ऐकून प्रभू म्हणाले, “गुरुराया, आपण या तीर्थाचे महात्म्य सांगावे. ते श्रवण करण्यासाठी माझे अंत:करण अतिशय उत्सुक झाले आहे.” वशिष्ठ ऋषी कपिल संगमाची कथा सांगू लागले.
एकदा ब्रह्मदेवांनी कर्दम नावाचा पुत्र उत्पन्न केला. तो पित्यासमोर नम्रपणे हात जोडून उभा राहिला. ब्रह्मदेवांनी त्यास तप करण्याची आज्ञा करून तपाचे महत्त्व सांगितले. ब्रह्मा म्हणाले, “हे कर्दमा, तपाचे फार महत्त्व आहे. मी नेहमी तपामध्ये मग्न असतो. तपानेच मला परमगती लाभते. या तपाच्या बळावरच मी जगात उत्पत्ती, लय करतो. तपाचरणाने गहन विद्या लाभते. हे कर्दमा, तू दारुण तप कर व आपल्या तप सामर्थ्याने सनातन ब्रह्माला प्रसन्न करून घे.”
कर्दमाने पितृवाक्य ऐकले व पित्यास नमस्कार करून ते तप करण्यास निघाले. कर्दम गुर्जर देशामध्ये सरस्वती तटी आले. तेथे शांत मन करून कर्दमाने तप आरंभिले. दहा हजार वर्षांनी कर्दमाच्या तपावर प्रसन्न होऊन भगवान मधुसूदनाने त्यास दर्शन दिले. घनशामाच्या दर्शनाने महात्मा कर्दम आनंदून गेला. कोटी सूर्यप्रभेसमान घननिळाची कांती होती. पितांबर ल्यायलेल्या केशवाच्या कानात कुंडले होती. मस्तकी किरीट, पायात नुपूर असा चतुर्भुज कमलाक्षाला समोर पाहून कर्दमाच्या आनंदाला पारावर राहिला नाही. शंख, चक्र, गदा, पद्म धारी वत्सलांच्छलाचे दात कुंदासारखे तर अधर बिंबासारखे दिसत होते. गरुडारूढ परब्रम्हास पाहून कर्दमाला कृतकृत्य झाल्यासारखे वाटले.
भगवान विष्णूंना पाहून कर्दमाचे मन प्रफुल्लित झाले. त्याला आपला जन्म सफल झाल्यासारखा वाटू लागले. तो हात जोडून विनयाने उभा राहिला व म्हणाला,
*“देव देव जगद्व्यापी| तव कृपालेशा ओपी||*
*शरणागत तुज मी पापी | विश्वकर्मा तुज नमो ||*
हे प्रभू, अनेक सिद्ध योगिजन कठीण तप करूनही त्यांना आपले दर्शन होत नाही. हा सुवर्णयोग या पामराला लाभला आहे. हे कमलापति, आपण माझ्या तपाचरणावर प्रसन्न असाल तर कृपया मला ‘समान वयाची गुणवती भार्या मिळावी व आपलाच अंश माझ्याकुळी जन्म घ्यावा’ असा वर द्यावा. हे जगन्नाथ, या भूतलावर तुझ्या मायेतून कोणाची सुटका झाली आहे? मी तुम्हाला शरण आलो आहे. हे जगदिशा, मला तारावे.”
कर्दमाचे बोलणे ऐकून श्यामसुंदर हसून बोलले, “हे कर्दमा, तुझ्या दशसहस्त्र वर्ष तपाचे फळ मी तुला नक्कीच देणार आहे. मी तुला वर देतो की, तुझा विवाह हा एका सुंदर कन्येशी होईल आणि मी तुमच्या पोटी जन्म घेईल.” हे ऐकताच कर्दमाने प्रभूला नमन केले. भगवान विष्णु त्याला वर देऊन गुप्त झाले. कर्दम ऋषी त्यानंतर आश्रमी परतले.
एकदा स्वायंभुवमनू फिरत फिरत जंगलात आला. त्याच्या सोबत त्याचा परिवार व सैन्यही होते. आश्रमामध्ये मुनींना पाहून त्याने नमस्कार केला. त्यांची विधीवत पूजा केली. त्यानंतर राजाने त्याची देवहुती नावाची कन्या मुनींना अर्पण केली. आपल्या तपाचे इच्छित फळ मिळाल्यामुळे मुनींच्या आनंदाला सीमा राहिली नाही. त्या कन्येपासून कर्दमाला नऊ कन्या व एक पुत्र असा पवित्र संततीचा लाभ झाला. त्या दाम्पत्यांना मनोमन फार आनंद झाला. कर्दमाच्या पोटी विष्णूने अवतार घेतल्यामुळे सर्व देवांनी बालकावर पुष्पवृष्टी केली. सर्वांनी आनंदाने दुंदुभी वाजविल्या. गंधर्व, किन्नर त्या बालकाचे यशोगान गाउ लागले.
त्या बालकाला बघण्यासाठी हंसावर बसून ब्रह्मदेव आले. गदा, पद्म धारी बालरूप प्रभूंना बघून ब्रह्मदेवांची खात्री पटली की खरंच साक्षात भगवान अवतरले आहेत. सर्व देवीदेवता बालकाला प्रणाम करून व शुभ आशीर्वाद देऊन स्वधामी जाऊ लागले. पुढे त्या बालकाचे कपिल असे नामकरण करण्यात आले. कपिल मोठा झाल्यावर कर्दम ऋषिंनी मरीचादी ऋषींना बोलावून आपल्या कन्यांचे कन्यादान केले व आपल्या पत्नीला पुत्राच्या स्वाधीन करून कर्दम वनामध्ये निघून गेले.
कर्दम ऋषी वनामध्ये परब्रह्माचे ध्यान करू लागले. ब्रह्मानंदी सदा मग्न होऊन बसू लागले. तिकडे कपिल देवहुती मातेस घेऊन स्वगृहीत नामस्मरण करू लागला. कर्दमाला ब्रह्मदेवाने वर दिला होता की, ‘तुझा पुत्र कपिल हा सांख्यशास्त्राचा आचार्य होईल. तो तत्त्ववेत्ता होऊन आपल्या प्रभावाने लोकांचे अज्ञान दूर करेल.” देवहुतिला तो वर आठवला. ती कपिलकडे गेली. कपिलमुनीने आपल्या मातेस अध्यात्मविद्या सांगितली. ते ऐकून देवहुतीच्या सर्व अज्ञानाचे निरसन झाले. तिला परमधाम प्राप्तीचा मार्ग सापडला.
नंतर कपिलमुनी बिंदुसरोवराला आले. तेथे स्वायंभुवमनूची राजधानी होती. तेथेच एका आश्रमात ते राहू लागले. कपिल मुनींनी नंतर आपल्या मातामहचे दर्शन घेऊन त्या ठिकाणी कपिलेश्वर नावाचे शिवलिंग स्थापन केले. कपिलमुनी तेथून मेकल क्षेत्री आले. रेवा नदीच्या उगमस्थानी त्यांनी शांत तप आरंभिले.
एका वर्षी तेथे खूप पर्जन्यवृष्टी झाली. रेवाने पुराचे भयंकर रूप धारण केले. पर्वतातून घो घो नाद करत ती तीव्र वेगाने वाहू लागली. तिच्या तीव्र प्रवाहाने तीरावरील सर्व वृक्ष उन्मळून पडले. मोठमोठ्या शीला गडबडून पडल्या. त्या पुरामध्ये मुनींचा दंडकमंडलू पण वाहून गेला. तिच्या प्रवाहाचा बिकट जोर कपिल मुनींनी आपल्या योगसामर्थ्याने स्तंभित केला. ते पाहून देव, गंधर्व, यक्ष, किन्नर, नवनाग, जलचर सर्वजण येऊन कपिल मुनींना ‘असे करू नका’ अशी प्रार्थना करू लागले.
सर्व देव त्यांना म्हणाले, “हे मुनी, आपण विष्णू अवतार आहात. तुम्ही योगियांचे शिरोमणी आहात, या रेवा नदीची उत्पत्ती पापांचा नाश करण्यासाठी झाली आहे. हे ईशा, तुम्ही तिला असे कुंठित केले असता आता आमची काय दशा होईल? कोण आमच्या पापांचा नाश करेल? ही काळजी आम्हाला उत्पन्न झाली आहे.”
देवांची प्रार्थना ऐकून महंताचे कोमल हृद्य द्रवण्यास वेळ लागला नाही. त्यांनी अग्निकुंड स्तंभीत करून हळूहळू जल सोडले. रेवानेही आदराने मुनींचे दंडकमंडलू परत केले. नर्मदा पुन्हा मंद प्रवाहाने वाहू लागली. तेव्हापासून त्या तीर्थाला कपिलगंगा हे नाव पडले. कपिल संगमी स्नान केले असता व सत्पात्री दान केले असता, मानवाला अक्षय फलाची प्राप्ती होते.
मनामध्ये श्रद्धा असल्यावर प्रत्येक प्राण्याला शांतीची प्राप्ती होते. त्यांची वृत्ती शांत होते व त्यांना ब्रह्मानंदी ध्यान लागते. हे पांडुरंगा, या ग्रीष्म ऋतूत मला खूप तृष्णा लागली आहे. मला तुम्ही ब्रह्मानंद रुपी थंड जल पाजा. कटेवर हात ठेवून देव म्हणत आहे की, तुमची तहान-भूक हरण्यासाठी मी तत्पर आहे. कित्येक युगे कटेवर हात ठेवून आमच्या कैवारासाठी सावळी मनोहर मूर्ती उभी आहे. त्या जगजेठीच्या चरणी माझे साष्टांग नमन!
॥ इति श्रीनर्मदापुराणे वशिष्ठश्रीरामचंद्रसंवादे कपिलासंगमोनाम अष्टमोध्याय: ॥
*श्री सद्गुरू धार्मिक यात्रा कंपनी*,
कर्वेनगर, पुणे
8983194154 / 9767118804
(ही पोस्ट नावासकट कॉपी/फॉरवर्ड करायला आमची काहीच हरकत नाही)
[09/11, 3:47 AM] Ganesh Puran: ०९ /११/२०२०
*|| श्रीस्वामीसमर्थ ||*
*नर्मदे हर! नर्मदे हर! नर्मदे हर!*
*|| श्री नर्मदा माहात्म्य ||*
*अध्याय नववा (तत्वनिरूपणनाम)*
|| श्री गणेशाय नमः ||
हे पुंडलिकवरदा, परमानंदा, बालमुकुंदा तुझा जयजयकार असो. मी तुला कोणत्या रीतीने आळवू. माझ्याकडे बुद्धी नाही, ज्ञान नाही, माझ्यावर मायेचे आवरण पडले आहे. मी एक गरीब बाळ तुझ्याकडे बघत आहे. आता माझे एवढेच मागणे आहे देवा, आता फार निष्ठुर होऊ नकोस. तुझ्या भरवशावरच काळ कंठीत आहे. माझे दुर्बल मन आता तूच स्थिर कर.
ऋषीश्रेष्ठ वशिष्ठ आणि प्रभू श्रीराम यांच्यात नर्मदा महात्म यावर चर्चा चालु होती. वशिष्ठ संहितेतील हा कथाभाग नैमिषारण्यात सूत पुरानिक शौनकादि ऋषीमुनींना ऐकवत आहेत. सर्व श्रोते पुढील कथाभाग ऐकण्याभसाठी आतुर होते.
श्रीरामांनी ऋषींना विचारले, “हे गुरुराया, कपिलमुनिंनी आपल्या मातेला अध्यात्मविद्येचा जो प्रकार सांगितला त्याचा कथाभाग कृपा करून मला सविस्तररीत्या सांगावा.” रामाची उत्सुकता बघून वशिष्ठ म्हणाले, “हे राम, या कथा ऐकताना तूला जसा आनंद होत आहे, तसाच आनंद मला या कथा तुला सांगताना होत आहे.” वशिष्ठ ऋषी रामाला कपिलमुनींनी आपल्या मातेस जे अध्यात्मज्ञान सांगितले, तो विद्याप्रकार सांगू लागले.
*(या अध्यायात पुरुष या शब्दाचा अर्थ शरीर घ्यावा, कोणत्याही प्राण्याचे शरीर)*
हे श्रीराम, आपले शरीर हे शब्द, रूप, रस, गंध, स्पर्श या पाच तन्मात्रांनी बनले आहे व हे प्रकृती व पुरुष या धर्तीवर चालते. हे रघुवीर, कर्मेंद्रिय व ज्ञानेन्द्रिय असे दोन्ही मिळून इंद्रियसंख्या ही दहा आहे. अकरावे इंद्रिय म्हणजे मन. या तन्मात्रा षोडश विकारांनी युक्त आहेत. पृथ्वी, आकाश, वायू, जल व तेज या पंचमहाभूतांनी हे जग व्यापले आहे, रघुराज. परंतु मन हे संकल्पनात्मक आहे. देह हा मनाने बांधला गेलेला असतो. त्याला प्रवृत्ती काही सुचू देत नाही. निवृत्ती हेच यातून मुक्तीचे साधन आहे.
फुलापासून सुगंधाला वेगळे करता येत नाही, त्याचप्रमाणे प्रकृती आणि पुरुष एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाही. प्रकृती ही सत्त्व, रज व तम या त्रिगुणांनी व्यापली आहे. हे रघुपति, या तीन गुणांची लक्षणे सावध मनाने ऐकावे. तितिक्षा, शम, दम, दया, तप, शांती, नित्य संतोष ही सत्त्वगुणांची लक्षणे आहेत. श्रद्धा, लज्जा, दया, तृष्णा, इच्छा, काम, सुखवासना, बल, उत्साह, यश, दास्यवीर्य, प्रीती, आसक्ती ही रजाची लक्षणे आहेत. क्रोध, प्रमाद, लोभ, अनृत, हिंसा, दंभ, कटकट करणे, शोक, मोह, विषाद, दुःख, अहंकार, मद, निद्रा, तंद्रा ही लक्षणे तमाची आहेत, हे जाणावे रघुनाथ.
या तीनही गुणांचे जो संतुलन ठेवेल व त्याचा अहंकार होऊ देणार नाही, तोच सिद्ध जाणावा. या जगात सर्व जगदीश्वराच्या मर्जीने चालते. तोच परमेश्वर सर्व कर्ताकरविता आहे, हे तत्त्व मनी बिंबवावे.
*अहं विष्णू, अहं शिव | अहं ब्रम्हा आदिदेव ||*
*अंतरी ठसता हा भाव | साक्षात ब्रम्ह प्राणी होई ||*
शौनक ऋषी विचारतात, “पुरुष आणि प्रकृती या दोन परस्परविरोधी गोष्टी असताना त्यांचे ऐक्य कसे साधावे? हे कृपया आम्हाला सांगावे.” हाच प्रश्न रामचंद्राने वशिष्ठ ऋषींना विचारला. यावर उत्तर देताना कुलगुरू म्हणाले, “पुरुष आणि प्रकृती हे दोघे एकमेकांना सोडू शकत नाही. ज्याप्रमाणे पृथ्वी तिचा जडपणा, सूर्य त्याचा तप्तपणा व चंद्र त्याची शीतलता सोडू शकत नाही, तसेच पुरुष ही प्रकृती सोडू शकत नाही. जसे मन, बुद्धी व पंचमहाभूतांचे अस्तित्व एकमेकांपासून वेगळे नाही, तसेच पुरुष आणि प्रकृतीचे आहे. देह जसा मनाप्रमाणे, मनाचे ऐकून वर्तन करतो तसेच पुरुष प्रकृतीप्रमाणे वर्तन करतो.
प्रकृतीस मिथ्या मानून जो भ्रमाचे निवारण करतो, तोच खरा सत्पुरुष जाणावा. त्याला वारंवार नमस्कार करावा. पुरुष हा निर्विकार निर्गुण तर प्रकृतीला मायावी, सगुण मानावे असे कपिलमुनी आपल्या मातेला सांगत होते. पुढे कपिलमुनी देवहुतीस अत्यंत महत्त्वाचा उपदेश करतात. आपले अंत:करण जर शुद्ध असेल तर चांगला बोध आपल्यामध्ये रुजण्यास वेळ लागत नाही. उथळ, खडकाळ भूमीत बीज पेरले तर त्याला फळ येत नाहीत, त्याचप्रमाणे अविचारी मन सदुपदेश जाळून टाकते.
कपिल मुनींच्या उपदेशाने देवहुती मध्ये अमुलाग्र बदल झाले. तिचे रूप, शुद्ध अंत:करणाची दैवीमूर्ती वाटू लागले. तिची योग्यता खूप मोठी होती, म्हणून तिच्या पोटी प्रभूंनी अवतार घेतला होता. तिच्या पूर्व जन्माच्या पुण्याईने तिला सुसंतती प्राप्त झाली होती. कपिलच्या बोधाने देवहुतीला सुगती मिळाली व ती ब्रम्हानंदी स्थिर झाली. जगात नाना प्रकारे आनंद उपभोगता येतात, परंतु ते सर्व अशाश्वत आहेत. खरा आनंद हा ब्रह्मानंदी मग्न होणे हा आहे. त्याच्या समोर बाकी सर्व आनंद तुच्छ आहेत.
ब्रम्हानंदाचा कोश हा विटेवर उभा राहिलेला पंढरीचा राणा आहे. त्याच्या चरणी माझा पुन्हा पुन्हा दंडवत आहे. नर्मदा किनाऱ्यावरील पुढील तीर्थाचा महिमा वशिष्ठ ऋषी पुढील भागात रामाला सांगताहेत. ते अध्याय सूतांनी शिष्यांना सांगून त्यांना पावन केले, तसेच तुम्ही आम्ही पावन होवो हीच मैया चरणी प्रार्थना!
*नर्मदे हर!*
॥ इति श्रीनर्मदापुराणे वशिष्ठश्रीरामचंद्रसंवादे तत्वनिरूपणनाम नवमोध्याय: ॥
*श्री सद्गुरू धार्मिक यात्रा कंपनी*
कर्वे नगर,पुणे
8983194154 / 9767118804
(ही पोस्ट नावासकट कॉपी/फॉरवर्ड करायला आमची काहीच हरकत नाही)
[10/11, 6:07 AM] Ganesh Puran: १.
१० /११/२०२०
*|| श्रीस्वामीसमर्थ ||*
*नर्मदे हर! नर्मदे हर! नर्मदे हर!*
*|| श्री नर्मदा माहात्म्य ||*
*अध्याय दहावा (नर्मदातटवासीदैत्यवधनाम)*
|| श्री गणेशाय नमः ||
हे कुंजविहारी, गोवर्धनधारी तुला मी नमन करते. मी पापी आहे, म्हणून मला सोडून देऊ नकोस. तूच माझा तारणहार आहेस. तू मनात द्वैत धरलेस तर माझी काय गत होईल रे, रमाकांता? तूच माझ्या मनाला नित्य अभय देतोस. तुझ्याच बळावर ही भवसिंधु पार करायची आहे. तुझ्यासारख्या कर्णधारालाच मी माझा गुरु केला आहे. आता माझ्या अंतराला स्वस्थता मिळाली आहे.
वशिष्ठ ऋषी भाविक जणांच्या मनाला सुखी करणारे पावन कथानकाचे वर्णन पुढे रामाला सांगत आहेत. वशिष्ठ ऋषी रामाला म्हणाले, “हे रामा, नर्मदाकाठी पावलापावलावर अनेक पवित्र तीर्थक्षेत्र आहेत. त्याची महतीसुद्धा अगाध आहे. माझ्या अल्पमतीने मी नर्मदेचा महिमा काय वर्णन करणार? तरीही त्यातील काही मुख्य तीर्थ आठवून मी त्याचे महत्त्व तुम्हाला सांगतो. हे रघुपती, आज तुम्हाला माहिष्मतीचा राजा सहस्त्रार्जुनाची कथा सांगतो.
कृतवीर्यचा प्रतापी पुत्र सहस्त्रअर्जुनाने नर्मदेच्या किनारी बसून घोर तपश्चर्या केली. दत्त आराधना करून दत्ताला प्रसन्न करून घेतले व जेथे हे तपाचरण केले तेथेच त्याने नगर वसविले. त्याच्या तपाने प्रसन्न होऊन दत्तांनी त्याला सहस्त्रबाहु प्राप्तीचा वर दिला. त्याच्या अफाट शक्तीच्या बळावर तो देव-दानव या सर्वांना धक्का ठेवत असे. त्याच्या नगरीत सर्व प्रजा कुशल मंगल होती. प्रजेने राजाचे स्मरण केले असता राजा कोणालाही तिष्ठत न ठेवता तात्काळ दर्शन देत असे. पंचतत्वे त्याच्या सेवेसाठी हजर असत. त्याच्या मर्जीच्या विरुद्ध झाडाचे पानही हलत नसे. या पृथ्वीवर त्याच्या प्रजेला त्रास देण्याचे, त्यांचे धन हडप करण्याचे धाडस कोणी करत नसे. राजाचे नुसते स्मरण केले असता हरवलेले द्रव्य सापडायचे, असा अनेकांचा अनुभव होता.
किरीट कुंडले घातलेल्या, रक्तांबर ल्यायलेल्या, हाती शरचाप घेतलेल्या कार्तवीर्याचे फक्त स्मरण केले असता चोरासारख्या दुष्ट शक्तींचा नाश होत असे. वशिष्ठ ऋषींनी केलेले वर्णन ऐकून श्रीरामांना पुढे काय कथा असेल, हे जाण्याची अगदी उत्कट इच्छा झाली. ते म्हणाले, “गुरुवर्य, या अशा नृपाची पूर्वकथा मला सांगावी. मला ती जाणण्याची उत्सुकता वाटत आहे.”
वसिष्ठ ऋषी सांगू लागले, “ब्रह्मदेवांनी जसे जग निर्माण केले, तसे अनेक मानसपुत्र ही निर्माण केले. मरीची, कर्दम अशी त्या मानसपुत्रांची नावे होती. कर्दम आणि त्याची भार्या देवहुती, यांची कन्या कला हिचा विवाह गुणसंपन्न अशा मरीची ऋषींची करण्यात आला. कलेला कश्यप व पूर्णिमा अशी दोन अपत्ये झाली. कश्यप यांच्या पर्णीनी या पत्नीकडून त्यांना हिरण्याक्ष व हिरण्यकशिपु असे दोन महाबली पुत्र झाले. भगवान विष्णू यांनी अवतार घेऊन दोघांचाही वध केला.
हिरण्याक्ष्याच्या भानुमती या पत्नीपासून त्याला वृक व शकुनी असे दोन पुत्र झाले. हे दोघेही अतिशय बलवान होते. त्यांच्या शक्तीच्या अहंकाराने उन्मत्त होऊन ते संपूर्ण जगाला त्रास देत होते. ही वार्ता हरीला समजल्यावर त्यांनी तात्काळ वृक या दैत्याचा वध केला. आपल्या भावाच्या वधाची वार्ता शकुनीला समजताच तो अतिशय संतप्त झाला. दहा हजार असुरांची सेना घेऊन तो नर्मदातटी आला.
विष्णूशी युद्ध करून त्यांना हरविण्यासाठी त्याने खडतर तप आरंभिले. माहिष्मतीपुरी हे सिद्ध स्थान त्याने तपासाठी निवडले. कित्येक वर्ष झाडाला उलटे लटकून, तर कित्येक वर्ष पायाच्या अंगठ्यावर उभे राहून त्याने तप केले. कित्येक वर्ष वायू भक्षण करून, तर कित्येक वर्ष शीर्षासनात त्याने तप केले. इंद्रिय दमन करून, मन शांत करून त्याने ध्यानधारणा आरंभिली.
त्याचे हे खडतर तप पाहून सर्व देवांना चिंता वाटू लागली. याच्या तपाच्या प्रभावाने आपण पदभ्रष्ट होऊ याची भीती त्यांना वाटू लागली. सर्वजण मिळून वैकुंठात गेले. तेथे भगवान शेषशैयेवर निद्रा करत होते. सर्व देवांनी प्रभूंना उठविण्यासाठी त्यांची स्तुती कळविण्यास सुरू केली.
*नमो अरुणाय अजिता | नमो निर्विकार जगन्नाथ ||*
*नमो नाना तनूभृता | विश्वंभरा तुज नमो ||*
*नमस्ते कालरुपाय | नमस्ते विश्व विश्वविश्र्वाय ||*
*नमस्ते आत्मस्वरूपाय | नमो नमस्ते भगवंता ||*
*श्री सद्गुरू धार्मिक यात्रा कंपनी*
कर्वे नगर,पुणे
8983194154 / 9767118804
[10/11, 6:07 AM] Ganesh Puran: २.
हे प्रभू, तुमच्या वाचून आम्हाला गत्यंतर नाही. तुम्हीच सर्व ब्रह्मांड व्यापले आहे. भास्करा पुढे दीपाचा प्रकाश जसा निस्तेज आहे तस ह्या दुष्टांचे तपाचरण आहे. हे श्रीकृष्णा, दुष्ट राक्षसांचा तुम्हीच बंदोबस्त करू शकता, हे आम्ही जाणतो. म्हणूनच आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. त्राही त्राही भगवंता!
हे प्रभू नर्मदाकाठी सहस्त्र दैत्य मिळून तप करत आहेत. परंतु तपाचरणामागील त्यांचा हेतू हा योग्य नाही. त्यांचे तप जर सफल झाले, तर होणाऱ्या परिणामांची कल्पनाही आम्हाला करवत नाही. ते सर्व जग जिंकतील, पृथ्वी चा लय करतील, काळालाही जिंकून घेतील. हे प्रभू! आमची आपणास विनंती आहे, आपण आपल्याला योग्य वाटेल तो निर्णय घ्यावा.
सर्व देवांची प्रार्थना ऐकून भगवानाने सर्वांना अभय दिले. गरुडावर आरूढ होऊन, हाती शंख, चक्र, गदा घेऊन, आपल्या सोळा गणांसह श्रीपती युद्धास निघाले. असुर जेथे तप करत होते, त्याठिकाणी चक्रधर आले. रणवाद्य वाजू लागली. सूर आणि असुरांमध्ये घनघोर युद्ध सुरू झाले. सर्व देव विमानामध्ये बसून युद्ध पाहू लागले.शक्तीचे माहेर असणाऱ्या त्या जगदात्मा पुढे कोणाचे काय चालणार? तप सामर्थ्याची शक्ती किंवा देवी-देवतांच्या वराची शक्ती, ही गरुडध्वजाच्या कृपाप्रसादाविना मिळवली असेल तर ती निष्फळ आहे. अतिशय कष्टाने तुम्ही कितीही खडतर तप केले, पण त्याचा हेतू जर वाईट असेल तर अशा तपाचा काय फायदा?
श्रीपती ने सुदर्शन चक्र सोडले. त्या युद्धभूमीत त्या चक्राने सर्व असुरांचे मस्तक छाटले. सहस्त्र असुरांपैकी एकही असुर तेथे उरला नाही. शकुनी चा वध होताच सर्व देवतांनी शंखनाद केला. सर्वांनी कमलापतीवर पुष्पवर्षाव केला. सर्वजण प्रार्थना वजा स्तुती करू लागले.
*नमन तुज भुवनेश्वरा | नमो आदि निर्विकारा ||*
*तुज वाचून रक्षणारा | आता अन्य ना भूतली ||*
*शरणागताचे तु छत्र | निष्कलंक अतिपवित्र ||*
*तूच एक शाश्वत | अखिल विश्र्वात जगन्नाथा ||*
हे प्रभू तुमच्या आसऱ्याशिवाय आम्हाला कोठेही थारा नाही. तुमच्याशिवाय या असुरांपासून आमची रक्षा कोण करेल? सर्व देव त्या माहिष्मतीपुरी येथे मुरारि ची स्तुती करू लागले. तीच माहिष्मतीपुरी नगरी आज महेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे.
भगवानांच्या हातून मृत्यू झाल्यामुळे सर्व असुरांचा उद्धार झाला. पुढच्या जन्मी ते सर्व थोर क्षत्रियकुळात जन्माला आले. या जन्मातही सहस्त्रार्जुनाचा वध हा विष्णूअवतारी परशुरामाच्या हातून झाला. हे रघुनंदन, अशी होती सहस्त्रअर्जुनाच्या पूर्वजन्माची कथा.”
*नर्मदे हर!*
॥ इति श्रीनर्मदापुराणे वशिष्ठश्रीरामचंद्रसंवादे नर्मदातटवासीदैत्यवधनाम दशमोध्याय: ॥
*श्री सद्गुरू धार्मिक यात्रा कंपनी*
कर्वे नगर,पुणे
8983194154 / 9767118804
(ही पोस्ट नावासकट कॉपी/फॉरवर्ड करायला आमची काहीच हरकत नाही)
[12/11, 5:05 AM] Ganesh Puran: १.
१२ /११/२०२०
*|| श्रीस्वामीसमर्थ ||*
*नर्मदे हर! नर्मदे हर! नर्मदे हर!*
*|| श्री नर्मदा माहात्म्य ||*
*अध्याय अकरावा (मंडलेश्वर कथननाम)*
|| श्री गणेशाय नमः ||
हे श्रीहरी! हे मुरारी! माझ्या सारख्या दीनाचा आता उद्धार करा, माधवा.
श्रीराम वरिष्ठांना पुढे म्हणाले, “गुरुनाथा कृपया कार्तविर्याची कथा सविस्तर सांगावी.” वशिष्ठ ऋषी रामाला पुढील कथा सांगू लागले.
पूर्वी चंद्रवंशामध्ये सहस्त्रार्जुनाचा जन्म झाला. पूर्वजन्मीचा हिरण्याक्षाचा पुत्र शकुनी, म्हणजेच या जन्मातील प्रतापवान सहस्त्रार्जून. पूर्व जन्मातील त्याच्या सोबत तप करणारे असूर देखील ह्या जन्मी क्षत्रिय कुळी जन्मले. सहस्त्रार्जुन अतिशय योग्य पद्धतीने शासन करीत असे. त्याचे सामर्थ्य अतुलनीय होते.
एकदा बलवान सहस्त्रार्जुन माहिष्मती नगरीतून त्रिवेणी संगमाजवळ आला. नर्मदा, गंगा व सरस्वती या तीन नद्यांचा संगम असणारे ते पवित्र स्थान बघून तो अतिशय संतोषला. तीन सरितांचा संगम असणारे हे स्थान प्रयागासम अत्युत्तम वाटू लागले. त्याने तेथेच तप करण्याचे ठरविले.
त्याने सर्व दिव्य अलंकार व वस्त्रांचा त्याग करून वल्कलांबर धारण केले. तो कंदमुळांचा आहार करू लागला. सर्व अंगाला भस्म लेपन करून गळ्यात रुद्राक्षमाळा घातल्या. शिवाच्या षडाक्षरी मंत्राचा तो नित्य जप करू लागला. शिवनामाचा त्याला ध्यास लागला. शिवाचेच तो ध्यान करू लागला. काही काळानंतर दक्षिणतीरी फिरत-फिरत साक्षात दत्त नारायण सहस्त्रार्जुनाच्या तपस्थानी आले.
उन्मलीत नेत्रांच्या परमशांत अवधूतांची, ती विमल तेजाने शोभणारी दैदीप्यमान मूर्ती, समोर पाहून सहस्त्रार्जुन कृतकृत्य झाला. पूर्वी नारदमुनींनी राजाला दत्तांचे वर्णन करून सांगितले होते. त्याप्रमाणे राजाच्या मनात दत्त महाराजांचे स्वरूप ठसले होते. ज्ञानरुप दत्त, हे माझ्या तुषार्थास्तव प्रकटले आहे; याची त्याला खात्री वाटू लागली. दत्तांना समोर पाहून राजाने आपले मस्तक त्यांच्या पदकमलांवर नमविले. कृतज्ञतेने हात जोडले व ‘माझ्यावर कृपा करावी’, म्हणून तो विनवू लागला.
प्रभू श्रीरामचंद्रांनी ऋषींना प्रश्न केला, “हे गुरुवर, हे दत्त म्हणजे कोण? ते कोणत्या कुळी जन्मले? कृपया मला दत्त कथा सांगावी.” वशिष्ठ ऋषी रामास दत्त कथा सांगू लागले.
“हे रामा, ब्रह्मदेवाच्या चक्षू पासून अत्री ऋषी यांचा जन्म झाला. ते एक महाश्रेष्ठ मुनिवर्य होते. कर्दमाची कन्या अनुसूया ही त्यांची पत्नी. तिच्या पातिव्रत्याची ख्याती संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. ब्रह्मदेवाच्या आज्ञेने अत्री मुनी आपल्या बायकोसह कुलाचलास आले. तेथे त्यांनी एका पायावर उभे राहून, वायू भक्षण करून तप आरंभिले. ते नित्य वेदमंत्र जपत असे, नियमव्रते पाळत असे, त्यांनी निद्रेलाही आपल्या अधीन ठेवले होते.”
सूर्याकडे हात पसरून अत्री नित्य प्रार्थना करीत असे, “हे नारायणा, मला तुझ्यासम पुत्र द्यावा ही प्रार्थना आहे. त्यांचे घोर तप बघून देवाच्या मनाला कळकळ आली. त्यांची प्रार्थना ऐकून तिन्ही देव मुनींकडे निघाले. ब्रह्मा हाती कमंडलू घेऊन, हंसावर आरूढ होऊन निघाले. चतुर्भुज विष्णू किरिट कुंडले लेवून, हाती शंख, चक्र, गदा, पद्म घेऊन, गरुडावर आरूढ होऊन निघाले. तर त्रिनेत्रधारी पंचमुखी शंकर हाती त्रिशूळ, डमरू घेऊन वृषभारूढ होऊन निघाले.”
आपापल्या वाहनावर आरूढ होऊन आलेल्या देवांना पाहून अत्रीऋषींना अत्यानंद झाला. अत्री ऋषी म्हणाले, “हे विश्वव्यापी सनातना, माझे तुम्हाला वारंवार नमन असो. आज तुमच्या दर्शनाने मी अनुग्रहित झालो आहे. एका देवाच्या दर्शनासाठी नराला किती कठोर तप करावे लागते, तरीही देवांचे दर्शन दुर्लभ असते. माझे भाग्य किती थोर आहे, की तुम्ही त्रैमूर्ती येथे आला आहात.”
मुनींची तपोनिष्ठा पाहून देवांना मनोमन अत्यंत आनंद झाला होता. आशिर्वाद वाणीने तिघेही जण अत्री मुनींना म्हणाले, “हे अत्री, तुझ्या तपाने आम्ही प्रसन्न झालो आहोत. आम्ही तुला आशिर्वाद देतो की, आम्ही अंशरूपाने तुझ्या पोटी पुत्र म्हणुन जन्म घेऊ.”
*श्री सद्गुरू धार्मिक यात्रा कंपनी*,
कर्वेनगर, पुणे
8983194154 / 9767118804
[12/11, 5:05 AM] Ganesh Puran: २.
ब्रह्मदेव म्हणाले, “माझ्या अंशापासून सोम नावाचा पुत्र जन्माला येईल, तो अमृताचा वर्षाव करून, औषधींचे जीवन होईल.” विष्णू म्हणाले, “माझ्या अंशापासून लोकांना पावन करणारा, ऋषिवर्यांचे संरक्षण करणारा, धर्मरुप असा दत्त नावाचा पुत्र जन्माला येईल.” शिव म्हणाले, “माझ्या अंशापासून तुला परम सुख देणारा दुर्वास नामक पुत्र जन्माला येईल.” असे सर्व इच्छित वर देवांनी अत्री मुनींना दिले. अत्रीमुनींनी देवांची आनंदाने षोडशोपचारे पूजा केली.
ब्रह्मदेवांच्या वराने सोम, शिवांच्या वराने महातेजस्वी दुर्वास, तर विष्णूच्या वराने दिगंबर अवधूत श्री दत्त अत्री अनुसयेच्या उदरी जन्माला आले. वशिष्ठ ऋषी रामास पुढे कथा सांगू लागले, “हे रामा, श्री दत्तांच्या दर्शनाने सहस्त्रार्जुन राजा पावन झाला. तो प्रेमाने दत्तांची सेवा करू लागला. भक्तीने त्यांची पूजा करू लागला. त्याची भक्ती बघून श्री दत्त प्रसन्न झाले. त्यांनी राजास इच्छित वर मागण्या स सांगितले. राजा म्हणाला, “हे देवा, मला अंतर्ध्यानगती द्यावी, तसेच मला सहस्त्र बाहु प्राप्त व्हावेत, असा वर द्यावा.” कार्तवीर्याची मागणी दत्तांनी ‘तथास्तु’ म्हणून पूर्ण केली. त्याला बल, तेज, यश, कीर्ती लाभेल असा आशिर्वाद त्यांनी दिला.
त्या महाबलवान राजाला दिगंबरांनी अधिकारी युक्त वाणीने मंडलेश्वर लिंग स्थापन करण्याची आज्ञा केली. शिवपार्वती सहित शिवलिंग स्थापले असता, ती जागा सिद्धीप्रद होईल असे दत्त म्हणाले. राजाने दत्त आज्ञा शिरसावंद्य मानून गिरीजेसह कैलासराणाची मंत्रयुक्त स्थापना केली. राजाने अव्हेरीले असता लिंगातुन महादेव प्रकट झाले.
*त्रिलोचन पूर्ण चंद्रशेखर । चतुर्भुज धनुर्धर ।*
*शोभती नानालंकार । स्कंधावरी पार्वती ।*
शक्ती सहित महादेवाला पाहून राजाला अतिशय संतोष वाटला. महादेवाच्या चरणी नतमस्तक होऊन कार्तवीर्याने शिवस्तुती आरंभली.
*नमो नमो जगत्पती । ज्ञानकला प्रविण अती । विश्वेश्वर जगदीशा ।*
*भस्मलेपने विभूषितांग । उमेसी देसी अर्धांग ।*
*मंडलेश्वरा कॄपाभंग । कदा न करी दयाळा ।*
*नमोकारण विग्रहाय । जगदव्यापक आद्यरुपाय ।*
*धरितो गिरीजेसहित पाय । त्रैलोक्यनाथा तुज नमो ।*
तुझ्या तेजाने दृष्टांचाही नाश होतो. हे मंडलेश्वरा, मी तुला शरण आलो आहे. तू सर्वांचा आदिदेव आहेस, म्हणून तुला महादेव असे म्हणतात. हे सर्वव्यापी उमापती मंडलेश्वरा तुला माझे नमन असो. हे ज्ञानघन ज्योतिर्मया, तुझी दिव्यकाया म्हणजे प्रशांत आहे. भक्तांना वंदनीय अशा भक्तप्रिया मंडलेश्वरा, मी तुला शरण आलो आहे.
राजाने केलेली अशी स्तुती ऐकून वेदवेत्ता तो भगवान म्हणाला, “राजा तु राजाधीराज महाराज अशा दत्त महाराजांची सेवा केली आहेस. त्यामुळे तू आज कृतार्थ झाला आहेस. मी तुला आशिर्वाद देतो, ‘तू भरपूर ऐश्वर्य भोगून, तुला परमपदाची प्राप्ती होईल. ह्या ज्या जागी तु तप केलेस, ती जागा सिद्धीदायक होईल. तिला सिद्धपीठ म्हटले जाईल.’ असा वर देऊन शंकर अंतर्धान पावले व दिगंबर तेथून अमरकंठास गेले.
दत्त प्रसादाची सिद्धी घेऊन राजा पुन्हा माहिष्मती नगरात आला. दत्तप्रसादाने त्याला सहस्त्रबाहु प्राप्त झाले होते. दत्त व महादेवांच्या आशिर्वादाने तो ऐश्वर्य व भोग भोगीत राज्यविस्तार करू लागला.
हे रामा, असा आहे सिद्धपीठ मंडलेश्वराचा तीर्थमहिमा. जो मंडळेश्वराचे दर्शन घेईल, तेथे स्नान, दान करेल, त्याला शिवआशिर्वादाने अक्षयफळ मिळेल हे निश्चित.”
हा कथाभाग जो श्रवण, पठण करतो त्यास पुण्यफल प्राप्त होते. नर्मदा किनाऱ्यावरील एक एक तीर्थ महिमा ऐकून रघुनंदन पुढील कथा ऐकण्यासाठी अतिशय उत्सुक झाले. नैमिषारण्यात सर्व ऋषी देखील सूतांच्या मुखातून रोज एक कथाभाग ऐकण्यासाठी चातकासारखे तिष्ठत होते. हे श्रीकृष्णा पुढील कथा कथन करून श्रोतृवर्गाची भक्तीरूपी तहान भागविण्याची मला शक्ती दे.
*नर्मदे हर!*
॥ इति श्रीनर्मदापुराणे वशिष्ठश्रीरामचंद्रसंवादे मंडलेश्वर कथननाम एकदशोध्याय: ॥
*श्री सद्गुरू धार्मिक यात्रा कंपनी*,
कर्वेनगर, पुणे
8983194154 / 9767118804
(ही पोस्ट नावासकट कॉपी/फॉरवर्ड करायला आमची काहीच हरकत नाही)
[13/11, 5:02 AM] Ganesh Puran: १३/११/२०२०
*|| श्रीस्वामीसमर्थ ||*
*नर्मदे हर! नर्मदे हर! नर्मदे हर!*
*|| श्री नर्मदा माहात्म्य ||*
*अध्याय बारावा (तीर्थमहिमानाम)*
|| श्री गणेशाय नमः ||
पुतनेचा वध करणाऱ्या मधुसूदना तुझा जयजयकार असो. हे दयाळा, तुझ्यावीण माझे रक्षण कोण करेल?
श्रीराम वशिष्ठ ऋषींना विनंती करू लागले, “हे गुरुवर्य, कृपा करून मला उत्तर तटावरील तीर्थांचा महिमा विस्ताराने सांगावा.” वशिष्ठ ऋषी रामाला नंदितीर्थाचा महिमा सांगू लागले.
“हे महाभाग रामा, प्रथम मध्यंतरी कलीने धर्माला लोपविले. धर्म नर्मदातीरी आला. त्याने दहा हजार वर्ष सनातन परमेश्वराचे अंतरात अनन्यभावे ध्यान केले. तो नित्य त्या जगदीशाकडे स्वसंरक्षणार्थ प्रार्थना करीत असे. ‘त्राही त्राही कृपाळा’ म्हणत तो सतत अचल दृढासनात ध्यानमग्न असे.”
तो परमेश्वराला विनवणी करू लागला, “हे विश्वंभरा, तुम्हीच मला (धर्माला) उत्पन्न केले, आता तुम्हीच माझे रक्षण करावे. माझे पालनपोषण करायला तूच समर्थ आहेस. जो धर्माचे आचरण करतो, तोच त्याची रक्षा करतो. चारीही वर्ग धर्माचे आनंदाने पालन करतात. हे प्रथमाधीप, तू स्वतः धर्मस्वरूप आहेस. धर्माचे रक्षण कर देवा, मी तुला शरण आलो आहे.
धर्माची अशी प्रार्थना ऐकून देवाधिदेव महादेव महाघोर अरण्यात, जेथे धर्म तप करत होता त्या ठिकाणी आले. खूप दीर्घकाळ तप केल्याने धर्माचे बळ क्षीण झाले होते. भगवान शंकरांना समोर बघून पिडीताला कल्पवृक्ष भेटल्यावर जसा आनंद होतो तसा आनंद धर्मास झाला. सर्वांगाला भस्म लावलेल्या, परम तेजस्वी, सुंदर मूर्तीला, उमेसहित आलेले पाहून धर्म मनोमन आनंदित झाला. महादेवांना पाहून धर्माने त्वरित उठून त्यांना उत्थापन दिले. त्याचा कंठ दाटून आला सद्गतित कंठाने तो शिवाची स्तुती करू लागला.
*नमस्ते ईश प्रभॄती । धर्माची करिशी जागृती ।*
*योग्यांची तू ध्येय मूर्ती । भक्तात्मना तुज नमो ॥*
*हे विकटाक्षा भवानीवरा । धर्माद्धारका उदारा ।*
*ओम नमोजी सर्वेश्वरा । नीलकंठा पंचवदना ।।*
*नमो तुज वेदविद्या । नमो तुज परमानंदा ।*
*जगत्रयाच्या सुखकंदा । शक्तीधरा तुझं नमो ॥*
“हे कैलासपती, तू विश्वप्रबोधक शक्ती आहेस. तुला लिला विग्रही म्हणतात. हे चंद्रशेखरा तुला माझे नमन असो. हे मृत्युंजया, तूच या अखिल ब्रह्मांडाचा सृष्टा आहेस आणि तूच संहारकर्ता आहेस, तूच तत्त्ववेत्ता अनादि पुरुष आहेस.
धर्माच्या स्तुतीने महादेव प्रसन्न झाले. ‘वरं ब्रुही, वरं ब्रुही’ म्हणत महादेव त्यास वर मागण्यास सांगू लागले. धर्म म्हणाला, “हे शुलधारी, तू जर माझ्यावर प्रसन्न असशील तर कृपाळू होऊन सदा माझे रक्षण करा. मला असे वाटते की मी वृषरुप घ्यावे आणि तुम्ही मला तुमचे वाहन म्हणून स्वीकारावे. माझा एवढा हट्ट तुम्ही पुरवावा देवा, तू माझ्या पाठीवर स्वार झाले असता, मला जगात कशालाही घाबरायचे काहीच कारण उरणार नाही.”
धर्माची विनवणी ऐकून ईशान हसले. त्यांनी पार्वतीकडे पाहिले व धर्माला आपले वाहन म्हणून स्वीकारावे का, अशी विचारणा केली. पार्वतीचे या बाबतीत मत विचारून भगवान शिव पुरुषांसमोर प्रपंचात भार्येचे विचार घेणे ही महत्त्वाचे असते, हा आदर्श घालून देत आहेत. संसार करत असताना स्त्री-पुरुषांनी एकमेकांचा सन्मान करावा, एकमेकांच्या मतांचा आदर करावा. हा मार्ग अवलंबिला असता सर्वांचेच हित होते. स्त्रीने कधीही पतीभक्ती सोडू नये व पुरुषानेही स्त्रीचा आदर करावा. एकमेकांना सहाय्य करावे आणि दोघांनी मिळून भगवंताची भक्ती करावी.
पार्वती मातेने धर्माच्या प्रस्तावास होकार दिला. उमेचे मत ऐकल्यानंतर महादेवांनी “तथास्तु!” म्हणून धर्माची इच्छा पूर्ण केली. ते ऐकून धर्माने त्वरित मनोहर असे वृषरूप घेतले. नंदी वाहन म्हणून स्वतःला जगद्गुरु व आदिशक्तीच्या स्वाधीन केले. प्रभूंनी धर्माचा केलेला गौरव बघण्यासाठी देवादिकांनी अवकाशात गर्दी केली. सूरसमुदाय विमानारुढ होऊन तो सोहळा पाहू लागले. सर्व देव पुष्पवर्षाव करू लागले. नाना वाद्यांचा गजर होऊ लागला. किन्नर, गंधर्व शिवाचे यशगान गाऊ लागले. शिवाच्या जयघोषाने संपूर्ण आसमंत दुमदुमून गेले.
महादेवाने धर्माच्या पालनाचे कर्तव्य स्वीकारल्यामुळे धर्माच्या चित्ताला अत्यानंद झाला. पार्वतीनाथ पंचाननाने धर्मांला आपल्या गणांमध्ये समाविष्ट करून नंदीरुपे त्याला आपले वाहन म्हणून स्वीकारले. इतर सर्व गणांना धर्माने आनंदाने नमस्कार केला. सदाशिवाला प्रणिपात करून धर्म आणखी एक प्रार्थना करू लागला, “हे देवा, ज्या रेवातटी मी कृतकृत्य झालो, त्या अति पवित्र स्थानास आपण वर द्यावा. हे मृत्युंजया, ह्या स्थानी जे नर स्नान करतील, पार्वतीसह तुमचे पूजन करतील, त्यांना मृत्यूनंतर शिवलोक प्राप्त होईल असा वर द्यावा.”
धर्माचे हे वचन ऐकून जटाधारी अतिशय संतोषित झाले. ते म्हणाले, “हे नंदिकेश्वरा, ह्या स्थानाची गणना तीर्थांमध्ये होईल. जो या ठिकाणी स्नान, दान आणि मनोभावे हर पूजन करील त्याला कैलासलोकी स्थान प्राप्त होईल. आजपासून उत्तर तीरावरील हे ठिकाण नंदीतीर्थ नावाने प्रसिद्ध होईल.”
पवित्र कर्मी नेहमी व्यस्त राहून, साधू महंत ह्या स्थानांचा महिमा वाढवतात आणि भारतभूमीला भूषित करतात. आपण पवित्र कर्म केले असता, माता संतुष्ट होते. धर्मरुपी सत्पुरुषांमुळे नर्मदातीरी अनेक तीर्थरुपी अलंकार घडविले गेले. ते अलंकार लेवून मैया अतिशय सुंदर दिसत आहे. “हे मैया, तुझ्या किनारी असेच सत्कर्म करणारे पुरुष निपजोत असा आम्हाला आशीर्वाद द्यावा.”
असो, नंदीतीर्थाला वर देऊन उमापती वृषारूढ होऊन कैलासास गेले. समस्त देवही आपापल्या धामी परतले. “मीच धर्माचा पाठीराखा आहे.” असे ह्या अध्यायातून प्रभूंना सुचवायचे आहे. प्रभूंची प्रसन्नता हवी असल्यास आपण धर्माची कास धरणेच योग्य आहे. “हे धर्मा, तुला आमचे एवढेच मागणे आहे की, सर्वजन तु दाखवलेल्या मार्गानेच चालो.”
पुढील तीर्थ वर्णन ऐकण्यासाठी रघुनंदन अतिशय उत्सुक होते.
*नर्मदे हर!*
॥ इति श्रीनर्मदापुराणे वशिष्ठश्रीरामचंद्रसंवादे तीर्थमहिमानाम द्वादशोध्याय: ॥
*श्री सद्गुरू धार्मिक यात्रा कंपनी*
कर्वे नगर,पुणे
8983194154 / 9767118804
(ही पोस्ट नावासकट कॉपी/फॉरवर्ड करायला आमची काहीच हरकत नाही)
[14/11, 5:02 AM] Ganesh Puran: १४/११/२०२०
*|| श्रीस्वामीसमर्थ ||*
*नर्मदे हर! नर्मदे हर! नर्मदे हर!*
*|| श्री नर्मदा माहात्म्य ||*
*अध्याय तेरावा (तीलभांडेश्र्वरकथननाम)*
|| श्री गणेशाय नमः ||
हे वनमाली, तुझा जयजयकार असो. हे मुरलिधरा, तुझी मंजुळ मुरली वाजव व माझ्यावर कृपा कर. तुझ्या वेणूच्या मंजूळ स्वरांनी माझ्या मनातील सर्व दुःखांचे हरण होते. हे श्रीहरी, माझ्या मनाच्या कुंजवनात तू विहार कर.
वशिष्ठ ऋषी रामाला पुढे नर्मदा माहात्म्य सांगू लागले. ऋषी म्हणाले, “हे दाशरथी रघुवीर, मी आता तुम्हाला तीलभांडेश्वर तीर्थाच्या स्थापनेची कहाणी सांगतो. एकदा सर्व मुनींनी मिळून नर्मदेची प्रदक्षिणा करण्याचे ठरविले. नर्मदा प्रदक्षिणेचा महिमा फार थोर आहे. तिच्या प्रदक्षिणेने सर्व पापांचा नाश होतो. हे रामा, प्रदक्षिणेला निघालेल्या ऋषींचे मी तुला नावे सांगतो. त्यांच्या स्मरणाने सर्व पापांची होळी होते.
*दुर्वास वामदेव अत्री | वाल्मिकी कृतवर्ण प्रभूती |*
*वशिष्ठ विश्वमित्र तो अती | तेजस्वी ब्रम्हासारखा ||*
*गौतम व सावर्णी | याज्ञवल्क जमदग्नी |*
*भारद्वाज कश्यपमुनी | प्रजापती हे समर्थ ||*
*मार्कंडमृकंड शौनक | लोहाक्षी अंगिराचरक |*
*द्वितत्रित शुनक | ऐक आणि बृहस्पति ||*
हे सर्व ऋषी विज्ञान निपुण आहेत. स्वकर्मा मध्ये सर्वजण व्यस्त राहून महाआनंद भोगत असतात. त्यापैकी कोणी शैव, तर कोणी वैष्णव आहेत. परंतु मनात कोणताही भेदभाव न आणता सर्वजण आत्मानंदी रंगलेले असतात. कोणी कर्मकांड करत असतात तर कोणी ज्ञान संपादनाचे किंवा ज्ञानार्जनाची काम करतात. कोणी उग्र तप आचारतात तर कोणी प्राणायामाने स्वतःवर नियंत्रण साधतात. कोणी वेदशास्त्रात पारंगत तर कोणी वेदार्थात. यांची निस्पृहता पाहून सर्व सिद्धी यांच्या पायी लोळण घालतात.
कोणी फक्त वायू भक्षण करून प्रदक्षिणा करीत होते, तर कोणी अध्यात्म निवेदन करून. कोणी मौन धारण केले होते. सर्वांनीच काही ना काही खडतर व्रते आचरले होते. कोणी प्रदक्षिणे दरम्यान पुराण कथा कथन करत होते, तर कोणी मनोभावे ते श्रवण करत होते. कोणी वेद छंदांचे पठण करत होते.
असा सर्व पवित्र ऋषींचा मेळा नर्मदा प्रदक्षिणा करीत होता. त्याच वेळी मकरसंक्रमणाचा पर्वकाळ आला. सर्व मुनींनी मिळून मकर संक्रमणाच्या पर्वकाळात नर्मदा स्नान केले. परंतु पर्वकाळात वाहण्यासाठी कोणाकडेच तीळ उपलब्ध नव्हते. या काळात तीळ दानाचे फार थोर महात्म आहे. एक तीळ वाहिला असता सोळासहस्त्र तीळ दानाचे प्राण्याला पुण्य लाभते. या पर्वकाळात वेदवेत्ता सत्पात्री ब्राह्मणास कृष्ण, श्वेत किंवा लाल कोणत्याही रंगाचे तीळ मनोभावे दान द्यावेत. सत्पात्री दानाचे अनन्य साधारण महत्व शास्त्रात सांगितले आहे.
समस्त ऋषीवर्ग तीळ न मिळाल्यामुळे असंतोषित झाला. नर्मदातटी सर्व ऋषी निद्राधीन झाले. तेव्हा भगवान शंकरांनी त्यांना स्वप्नदृष्टांत दिला. शिव म्हणाले, “बाणासुराने कैलासावरून जाताना शिवलिंग नर्मदा जलात ठेवले होते. त्या लिंगाची सर्व ऋषींनी मिळून स्थापना करावी. या लिंगाला जलातून बाहेर काढाल तेव्हा आपणा सर्वांना ते लिंग तीळाप्रमाणे भासेल. ते लिंग तीलभांडेश्वर या नावाने प्रसिद्ध होईल. तुम्ही हे लिंग जलाबाहेर काढून त्याची वेदमंत्राद्वारे विधिवत पूजा करून स्थापन केले असता आपल्याला तीळ दानाचे पुण्य लाभेल.”
शिवजींच्या स्वप्नदृष्टांतावर विश्वास ठेवून सर्व ऋषी समुदायाने प्रातःकाळी साग्रसंगीत पूजन करून शिवलिंग तेथे स्थापन केले. जो कोणी या शिवलिंगाचे मकरसंक्रमणाच्या दिवशी मनोभावे पूजन करेल त्याला अनश्वर फळ लाभते.”
ही कथा श्रीरामांना सांगून वशिष्ठ पुढे म्हणाले, “हे रघुवीरा, ह्या तीलभांडेश्वराचे अष्टभैरव नियमित पूजन करतात. रेवा तीरावरील हे क्षेत्र अतिशय पावन आहे. श्रीरामांनी त्वरित वशिष्ठ ऋषींना, ‘हे अष्टभैरव कोण?’ असा प्रश्न केला. त्याचे उत्तर ऋषी पुढील अध्यायात देतील.
*नर्मदे हर!*
॥ इति श्रीनर्मदापुराणे वशिष्ठश्रीरामचंद्रसंवादे तीलभांडेश्वरकथननाम त्रयोदशोध्याय: ॥
*श्री सद्गुरू धार्मिक यात्रा कंपनी*
कर्वे नगर,पुणे
8983194154 / 9767118804
(ही पोस्ट नावासकट कॉपी/फॉरवर्ड करायला आमची काहीच हरकत नाही)
[15/11, 5:00 AM] Ganesh Puran: १.
१५/११/२०२०
*|| श्रीस्वामीसमर्थ ||*
*नर्मदे हर! नर्मदे हर! नर्मदे हर!*
*|| श्री नर्मदा माहात्म्य ||*
*|| अध्याय चौदावा (त्रिपुरविजयोनाम) ||*
|| श्री गणेशाय नमः ||
हे दामोदरा, उदारा! तुला माझे नमन असो. हे देवा, मला तुझाच आसरा आहे.
श्रीराम वशीष्ठांना विचारतात, “गुरुवर्य वशिष्ठ, हे भैरव महादेवाची आज्ञा का मानतात? तीलभांडेश्वराचे पूजन का करतात? मला हा वृत्तांत सांगावा. हे गुरुनाथ, माझी नर्मदा महात्माबद्दलची उत्सुकता शुक्लचंद्राप्रमाणे वाढत आहे, कृपया मला ही कथा विस्ताराने सांगावी.”
वशिष्ठ ऋषी रामाला पुढील कथा सांगू लागले. “हे रामा, पुढील कथा सावधतेने ऐकावी. फार पूर्वी देव आणि दैत्य यांमध्ये दारुण युद्ध झाले होते. त्या युद्धात दैत्यांचा पराभव झाला. सर्व दैत्य छिन्नविच्छिन्न देह घेऊन रणांगणातून पळून गेले. दैत्यांची ही अवस्था बघून दैत्यराजाला खूप वाईट वाटले.
दैत्यपती मयाला शरण गेले. दैत्याने अनेक परीने काकुळतीला येऊन मयाला विनवणी केली. मयाला दैत्याची करुणा आली. मयाने तात्काळ एक अद्भुत विमान दैत्यराजाला आशीर्वादस्वरूप देऊ केले. त्या विमानात सुवर्ण, रौप्य आणि लोह यांची तीन पुरे होती. म्हणून त्याला त्रिपुर असे नाव देण्यात आले. ते विमान देव किंवा दानव कोणालाही अभेद्य असे होते. कोणतेही शस्त्र त्याला भेदू शकत नव्हते. आपल्या मनातील कामना ते तात्काळ पूर्ण करू शकेल असा त्याचा प्रभाव होता. पाण्याबाहेर, पाण्याच्या आत, आकाश, वायू किंवा जमीन अशा कोणत्याही ठिकाणी ते गमन करू शकेल असे त्याचे सामर्थ्य होते.
असे अद्भुत विमान पाहून सर्व दैत्यांना फार आनंद झाला. सर्व दैत्यांनी त्यात प्रवेश केला. आता त्यांच्या मनात देवाबद्दल कोणतीच भीती राहिली नव्हती. त्रिपुरामध्ये आमराई होती, अनेक अमूल्य रत्न होती, सुंदर जलाशय होती, त्यामध्ये चक्रवाक, हंस यांसारखे पक्षी जलक्रीडा करीत असे. श्यामनीळ, श्वेत कमळावर भ्रमर गुंजन करीत असे. अतिशय रमणीय अशा त्रिपुरामध्ये एक विस्तीर्ण शस्त्रागार होते. तेथे नाना प्रकारचे शस्त्र होते. मल्ल, शक्ती, शुंडी, मुद्गर, चक्र, परश्र्वद्य, परिघ, पाश, खड्डे, शरभाते, नाना कवचे अशी तर्हेतर्हेची शस्त्रे होती.
मयाने दिलेल्या या अद्भुत मायेच्या शक्तीने सर्व दैत्यांना आनंद झाला. ‘आम्ही बलवान झालो’ असा गर्व त्यांना झाला. दैत्यराजाने पुन्हा देवांवर स्वारी करून रणभेरी वाजविल्या. त्याच्या युद्धाच्या सिंहगर्जनेने संपूर्ण अवकाश दुमदुमून गेले. देवांचा नाश करण्यासाठी सर्व दैत्य अतिशय उत्सुक होते, हे पाहून दैत्यराजाच्या मनाला अतिशय संतोष वाटला.
त्रिपुराबद्दल माहित होताच दैत्यांच्या सामर्थ्याला सर्व देव घाबरले. देवांनी कैलासाकडे धाव घेतली. सर्व देव मिळून पंचाननाला प्रार्थना करू लागले. हे सांबा सदाशिवा, आमचे रक्षण करा. आम्ही तुम्हाला शरण आलो आहे. आम्हा शरणागतांचे रक्षण करा. हे पशुपती, दैत्यांना भिऊन आम्ही पलायन केले आहे, आता तुमच्या विना आम्हाला कोणताच आश्रय नाही.
वशिष्ठ रामाला पुढील कथाभाग सांगू लागले. सर्व देवांनी महादेवाला त्रिपुर विमानाची हकीकत सांगितली. ते ऐकून दीनवत्सल जगन्नाथ भयंकर संतापले. हे रघुनंदना, त्यावेळी आरक्त डोळ्यांनी महादेवांनी अष्टभैरव उत्पन्न केले. त्यांचे नावे मी तुला सांगतो, ती एकाग्र चित्ताने ऐकावे.
*रुद्र तीक्ष्ण घोर | गहना बटु उग्र |*
*वामभैरव व वज्र | अष्टभैरव हे प्रसिद्ध ||*
*जटेपासून रुद्रभैरव | नेत्रापासून तिक्ष्णभैरव |*
*जांभईपासून घोरभैरव | वामस्तनातुन बटू जाहला ||*
*वामहस्तापासून उग्रभैरव | वामपार्श्वपासून महानभैरव |*
*वामकटीपासून वज्रभैरव | वामपादी वामभैरव ||*
*श्री सद्गुरू धार्मिक यात्रा कंपनी*
कर्वे नगर,पुणे
8983194154 / 9767118804
[15/11, 5:00 AM] Ganesh Puran: २.
सर्वांच्या हातात त्रिशूळ दक्का होते. त्यांची वदने फार भयानक दिसत होती. त्यांचे डोळे अग्निसारखे आरक्त होते. त्यांच्या गळ्यातील रुंडमाळेतून रक्तस्त्राव होत होता. संपूर्ण छाती रक्ताने माखली होती. कटीवर घंटा शोभत होती. ‘मारा-तोडा’ असा एकच गजर करीत आठही जण शिवापुढे हात जोडून उभे राहिले. मद्य पिऊन धुंद असे ते अष्टभैरव सांबाच्या सेवेसाठी हसत उभे होते.
महाघोर रूप असलेल्या त्या बलशाली व सामर्थ्यवान भैरवांना पाहून शंकराच्या मनाला फार आनंद झाला. भुते, कुष्मांड, ब्रह्मराक्षस, वेताळ, डाकिनी, शाकिनी, नंदीकेश, सात मातृका यांची सेना घेऊन पंचानन दैत्यांवर चाल करायला निघाले. सर्व शिवगण युद्धडंका, रणभेरी वाद्य वाजवत युद्ध स्थानी पोहोचले.
महादेव त्रिपुरापाशी पोहोचल्यावर सर्व असूर खवळले. देवतांचा पाडाव करण्यासाठी दैत्य खूप उत्सुक झाले. तारकचक्र, नेमी, धूम्राक्ष, शुंभ, निशुंभ, लोहिताक्ष, चंडमुंड, दक्ष, आतापि, वातापि, शंबर, दुंदुभी, रक्ताक्ष, नरकासुर, गंभील, शरभ हे सर्व असूर युद्ध करण्यासाठी सज्ज झाले व देवांवर चाल करून गेले.
रुद्र, एकादश, त्रयोदशाग्रीव, पासव, द्वादश, सिद्धचारण, यक्ष, वायुविश्व असे अनेक देव सुद्धा आपल्या वाहनावर आरूढ होऊन दैत्यांशी दारूण युद्ध करू लागले. सर्वजण शस्त्रकला निपुण होते. कोणी परिधाने प्रहार करत होते तर कोणी भाल्याने शिर भेदत होते. कोणी धनुष्याचा टणत्कार करून बाणांचा वर्षाव करत होते. सर्वांच्याच अंगात विरश्री संचारली होती.
युद्धभूमीवर अनेक शिरे तुटून पडली होती. शरीर धुळीत लोटांगण घालत होते. रथ एकीकडे तर सारथी एकीकडे अशी गत झाली होती. हत्ती छिन्नभिन्न झाले, तर अश्व भिऊन पळाले. मस्तकरहित शरीरांचा ढीग लागला होता. गंधर्व, किन्नर एका जागी स्थिर होऊन युद्ध कुशलता पाहू लागले. देव आपल्या विमानात बसून युद्ध पाहू लागले.
कुष्माण्ड, ब्रह्मवेताळ, रुद्रगण हे दैत्यसेनेस काळानुरूप झाले होते. दैत्यांचे तुटलेले हात पाय घेऊन डाकिनी शाकिनी ते भक्षण करू लागल्या. दैत्यांचे उष्ण रक्त त्या पिऊ लागल्या. दैत्यांना पूर्ण दैन्यावस्था आली. रणांगणात शिवगणांनी धुमाकूळ घातला. पिशाच्च नाचू लागले. हे सर्व पाहून गंधर्व, किन्नर हे शिवजींचे गुणगाण, यशगाण गाऊ लागले.
भैरव हाती शूल शस्त्र घेऊन दैत्यांचे हनन करत आहे, हे पाहून सर्व असुर कोपले. सर्व दैत्यांनी मूर्च्छा सावरून आयुधे हातात घेतली व दात ओठ चावून सर्वजण शिवसैन्यावर धावून गेले. दैत्यराज सांबाला जाऊन भिडला. दुसऱ्या दैत्याने नंदीकेशाला विकल केले. आपला बचाव करण्यासाठी शिवगणांनी रणांगणाला पाठ दाखवली. दैत्यांनी निर्वाण मांडले, त्यामुळे देवसैन्याची दाणादाण झाली. युद्धभूमीवर हाहा:कार माजला. देवांनी मिळवलेली विजयश्री दैत्यांनी क्षणात जिंकली. असत्याची बाजू चढती झाली.
दैत्यराजाने त्रिपुरातुन एक अमृतकुप निर्माण केले. सर्व मृत दैत्यांना अमृत चाखवताच ते उठून बसले. दैत्यांचे बळ पुन्हा त्यांना परत मिळाले. सर्वजण पुन्हा युद्धासाठी तत्पर झाले. असुरांचा विजय होताना दिसतात शिव मनाला खिन्नता आली. पुढील युद्धाची योजना करण्यासाठी महादेव कैलासाला गेले.
युद्धाची पुढील हकीकत वशिष्ठ ऋषी पुढील अध्यायात सांगतील.
*नर्मदे हर!*
॥ इति श्रीनर्मदापुराणे वशिष्ठश्रीरामचंद्रसंवादे त्रिपुरविजयोनाम चतुर्दशोध्याय: ॥
*श्री सद्गुरू धार्मिक यात्रा कंपनी*
कर्वे नगर,पुणे
8983194154 / 9767118804
(ही पोस्ट नावासकट कॉपी/फॉरवर्ड करायला आमची काहीच हरकत नाही)
[16/11, 5:02 AM] Ganesh Puran: १.
१६/११/२०२०
*|| श्रीस्वामीसमर्थ ||*
*नर्मदे हर! नर्मदे हर! नर्मदे हर!*
*|| श्री नर्मदा माहात्म्य ||*
*||अध्याय पंधरावा (तीलभांडेश्वरक्षेत्र कथननाम)*
|| श्री गणेशाय नमः ||
हे विश्वस्वरूपा ! तुझा जयजयकार असो. हे हरी, माझ्या त्रिविधतापांचे हरण होऊन माझे मन तुझ्या चरणी स्थिर होवो. हे श्रीहरी! माझे अंत:करण शुद्ध व्हावे आणि मनात तुझेच सदैव ध्यान असावे, हेच माझे मागणे आहे.
वशिष्ठ ऋषी कथेचा पुढील भाग निवेदन करू लागले. “शिवशंभु युद्धभूमीतून कैलासाला गेले. दैत्यांच्या पराभवाचा काहीच उपाय न सापडल्याने त्यांनी ब्रह्मदेवांकडे धाव घेतली. युद्धवार्ता समजल्यावर ब्रह्मदेवांना ही खेद वाटला. ब्रह्मदेव म्हणाले, “हे महादेवा, आपण वैकुंठाला जाऊन नारायणाला युद्धवार्ता निवेदन करूत. राक्षसांचे निर्दाळण तो भगवंतच करू शकतो.”
वैकुंठात रमापतीला सर्व समाचार समजला. पार्षदगणांसह विष्णूची स्वारी महादेवांजवळ आली. भगवान विष्णू गरुडावर आरूढ झाले. त्यांनी सर्व आयुधे सज्ज केली. दैत्यांसोबत लढण्यासाठी तिन्ही देव निघाले. तिघेही युद्धभूमीत आले. प्रभूंनी पांचजन्य वाजविला. त्या आवाजाने सर्व दैत्य गोळा झाले. त्यांनीही आवेशाने रणभेरी वाजवल्या. भगवान विष्णू त्रिपुराचे अवलोकन करू लागले. दैत्यांचा म्होरक्या हा मय होता. त्याच्याकडे लढण्यासाठी अफाट युद्धसामग्री होती.
मायावी आणि बळयुक्त मय देवांना दटावीत होता. ते पाहून विष्णू संतापले. आता याला हरविल्या शिवाय सोडायचे नाही असा पन भगवानांनी केला. पण त्याला जिंकणे एवढ्या सहजासहजी शक्य नव्हते. त्रिपुरातील सामग्रीसारखी मजबूत युद्धसामग्री देवतांजवळ नव्हती. श्रीहरींनी दैत्यांवर विजय प्राप्त करण्यासाठी एक योजना आखली. त्यांनी महादेवांसाठी विश्वकर्मा कडून एक दिव्य रथ तयार करून घेतला.
श्रीहरीच्या आज्ञेने विश्वकर्म्याने सर्व देवमय असा पृथ्वीचा रथ निर्माण केला. त्रिपुराच्या वधास्तव विश्वकर्म्याने शिवजींसाठी जो रथ तयार केला होता, तो परम दिव्य होता आणि प्रयत्नपूर्वक बनवण्यात आला होता. तो सर्वसंमत, सर्व भूतमय आणि सुवर्णाचा होता. सूर्य त्याचे उजवे चाक होता आणि चंद्र डावे चाक होता. अंतरिक्ष रथाचे अग्रभाग आणि मंदराचल हा रथमध्य होता. उदयाचल आणि अस्ताचल हे त्याचे जू झाले होते. गिरीपर्वत या रथाचे अधिष्ठान होता आणि इतर पर्वत हे त्याला आश्रयभूत होते. संवत्सर हा त्या रथाचा वेग, दोन्ही अयने ही लोहधारक, मुहूर्त हा बंधन आणि कला हे त्याचे दोन खिळे बनले होते. अभ्रमू व कामधेनू जोखडाची अंतिम टोके होती व व्यक्त हा इशादंड, बुद्धी हा नडवल, अहंकार हा कोण आणि पंचमहाभूते हे रथाचे बल होते.
भगवान शिवजींसाठी बनवण्यात आलेला तो रथ अनेकांअनेक आश्चर्याने युक्त होता. त्या दिव्य रथाला वेदरुपी अश्व जोडून, ब्रह्माजींनी तो शंकरांना समर्पित केला. शिवजींनी दिव्य ऐश्वर्यासंपन्न व सर्व सामग्रीयुक्त अशा त्या रथाचे सारथ्य करण्यासाठी ब्रह्माजींचे अवलोकन केले. मग ते सुहास्य मुद्रेने त्यावर आरूढ झाले. शंकराने मेरू पर्वताचे धनुष्य केले. बाण म्हणून श्रीविष्णूची योजना केली. थोड्याच वेळात तो रथ आकाशात स्थित असलेल्या त्रिपुरा समोर आला. पशुत्वरुपी पाशातून मुक्त करणारे रूद्रदेव पशुपती बनले. तेव्हापासून शिवजी पशुपती या नावाने विख्यात झाले. हे नाम सर्व लोकांचे कल्याण करणारे आहे. शिवजी पशुपती झाले तेव्हा त्यांनी जे स्वरूप प्रकट केले, ते अत्यंत अद्भुत होते. त्यांचे वर्णन करण्यास कोणी समर्थ नाही. ते स्वरूप पाहून देव आणि ऋषी हर्ष मग्न होऊन त्यांचा जयजयकार करू लागले. ब्रह्मा, विष्णू आणि श्रेष्ठ देवही अति प्रसन्न झाले.
दैत्यांचे हनन करण्यासाठी अमृत कुंडातील अमृत संपविणे गरजेचे होते. त्याशिवाय दैत्यांचे मृत्युंतुन जिवंत होण्याचे सत्र थांबणार नव्हते. त्यासाठी गोपालाने गोमातेचे रूप घेतले व ब्रह्मदेवांनी वासराचे. गाय वासरू दोघे मिळून अमृत कुंडातील अमृत हळूहळू पिऊ लागले. दैत्यांनीही ‘गाय-वासरू असे किती अमृत प्राशन करणार आहेत’ असा विचार करून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. थोड्यावेळाने पाहतात तर काय अमृतकुंड कोरडा ठणठणीत झाला होता. गाईचे कपट ओळखून तिचे निवारण करण्यासाठी दैत्य गाईच्या मागे धावले. तो पर्यंत गाय-वासरू दोघेही गुप्त झाले. रिकामा झालेला अमृतकुंड पाहून दैत्य मनातून घाबरले.
*श्री सद्गुरू धार्मिक यात्रा कंपनी*
कर्वे नगर,पुणे
8983194154 / 9767118804
[16/11, 5:02 AM] Ganesh Puran: २.
मयाच्या मनात त्यावेळी विचार आला की, ‘देवच आपल्यावर कोपले आहेत. ज्यांच्या बोटाला धरून ही जीवनयात्रा करायची असते, त्यांच्याशीच आपण वैर करून मोठे अनिष्ट स्वतःवर ओढवून घेतले आहे. आता त्रिपुरांचा नाश पक्का आहे.’ याची त्याला खात्री पटली.
ईकडे विष्णू महादेवास म्हणाले, “हे महादेवा, आपल्याला या युद्धात शीघ्रगतीने विजय प्राप्त करायचा असेल तर आपण कृपया त्रिपुरसुंदरीचे स्मरण करावे. तिची अर्चना करून तिला आळवावे. तिच्या प्रसादानेच विजयप्राप्ति शक्य आहे. आपण तिची प्रार्थना करून तिला प्रसन्न करून घ्यावे. विष्णूची वचनोक्ती ऐकून महेश्वरांनी आदिशक्तीची स्तुती करण्यास प्रारंभ केला.
“हे आदिशक्ती! तूच हे विश्व चालवतेस. तू आता माझ्यावर प्रसन्न हो. तूच ही विश्वोत्पत्ति केलीस, तूच तिचे पालन करतेस आणि कालरात्री बनून तूच तिचा लय करतेस. हे नि:शेष स्वरूप ज्योती, तू आमच्यावर प्रसन्न होऊन आमच्या आपत्तीचे हरण कर. देव, दानव, यक्ष, किन्नर, राक्षस, निशाचर हे सर्वच जण अत्यंत आदराने तुझ्या चरणावर नतमस्तक होतात. तुझ्याकडे मी माझ्या विजयासाठी याचना करीत आहे. जगाच्या पापमोचनासाठी हे देवी, तु प्रकट हो. सूर्यापासून सर्व देव तुला नमन करतात. सर्वांमध्ये तूच श्रेष्ठ आहेस. तुझ्या प्रभावाची मला कल्पना आहे, म्हणूनच मी तुला विनंती करत आहे.
*हे कलिकला मालिनी | नमो माया हिमालिनी |*
*क्रिया मधुमती सनातनी | प्रसन्न हो लवलाही ||*
*जया-विजया वाग्देवी | माहेश्वरी भगवती वैष्णवी |*
*तिच्या निर्दाळी तू देवी | प्रार्थना माझी ऐकून ||*
*मातंगी कमला आत्मिका | सर्व दुःख विध्वंसिका |*
*राजेश्वरी लाव घाका | दैत्यास तू मजसाठी ||*
महादेवांनी केलेली अशी स्तुती ऐकून देवी प्रसन्न झाली. ती म्हणाली, “महादेवा, तुझी स्तुती ऐकून मी संतोषित झाले आहे. तु ज्या कार्यासाठी मला आळवले आहे, त्या कार्यात तु नि:संशय यशस्वी होशील. हे कैलासपती, तू रणसंग्रामात जाताच त्वरित शत्रूंना जिंकून घेशील. तुझे शत्रू रणांगणातून पळ काढतील.
देवीकडून असा वर मिळताच सर्व देवांना आनंद झाला. सर्वजण आपापली शस्त्रे सज्ज करून युद्धाला निघाले. श्रीहरींनी तयार करून घेतलेल्या रथातून महादेवांनी त्रिपुरांवर बाणांचा वर्षाव केला. क्षणार्धात त्रिपुर जळू लागले. सर्व दैत्य आपला जीव वाचविण्यासाठी पलायन करू लागले. कोणी पर्वतांच्या कपारीत लपले, तर कोणी भुयारात. सर्व जण आपला जीव वाचविण्यासाठी धडपडू लागले.
त्रिपुराच्या दहनाने सर्व ऋषी-मुनी आनंदून गेले. गंधर्व, किन्नर यशगान गाऊ लागले. सर्व देव पुष्पवर्षाव करू लागले. शक्ती कितीही थोर असली तरी, ती जर चुकीच्या कामासाठी वापरली गेली तर तिची होळी होणे निश्चित आहे. महादेवांचे अतुल सामर्थ्य पाहून मय त्यांना शरण गेला व आपले रक्षण करण्यासाठी त्यांना प्रार्थना करू लागला.
मय म्हणाला, “हे पिनाकी, तुझे स्मरण चित्ती केली असता, मला आता कोणालाही घाबरायची गरज नाही. हे देवा, तुम्ही सर्व देवांना वाचवले आहे. आता मी ही तुम्हाला शरण येऊन तुमचे चरण धरले आहे. आता माझी उपेक्षा करू नका, दयाळा.” मयाची शरणागतीची प्रार्थना ऐकून भोलेनाथाला दया आली. भोलेनाथांनी त्याला अभय देऊन, त्यावर षडाक्षरी मंत्राचा उपदेश केला. मयाचे भाग्य उजळले. स्वयं शिवाने त्याला मंत्र दिला व आपल्या शिष्यगणांत समाविष्ट करून घेतले.
यानंतर महेशाने अष्टभैरवांना नर्मदातीरी जाऊन खडतर तप आचरणाची आज्ञा केली. ते त्यांना म्हणाले, “या तपाने तुम्हाला बळ प्राप्त होईल, अष्टसिद्धी प्राप्त होतील. सर्व लोक तुमची सेवा करतील.” भैरवांना आज्ञा देऊन शिव कैलासास निघून गेले, विष्णू वैकुंठास गेले. सर्व देव आपापल्या स्थानी गेले. अष्टभैरव मिळून रेवातीरी येऊन तप करू लागले. तेथे त्यांनी तप केले तेच हे तीलभांडेश्वर तीर्थ. तेथे जे नर स्नान, दान करतात त्यांना बहुपुण्य लाभते. मृत्यूनंतरही तो नर शिवलोकात जातो.
अशी ही भैरव उत्पत्तीची आणि तिलेशाची महती वशिष्ठ ऋषींनी रामाला सांगितली.
*नर्मदे हर!*
॥ इति श्रीनर्मदापुराणे वशिष्ठश्रीरामचंद्रसंवादे तीलभांडेश्वरक्षेत्र कथननाम पंचदशोध्याय: ॥
*श्री सद्गुरू धार्मिक यात्रा कंपनी*
कर्वे नगर,पुणे
8983194154 / 9767118804
(ही पोस्ट नावासकट कॉपी/फॉरवर्ड करायला आमची काहीच हरकत नाही)
[17/11, 7:55 AM] Ganesh Puran: १.
१७/११/२०२०
*|| श्रीस्वामीसमर्थ ||*
*नर्मदे हर! नर्मदे हर! नर्मदे हर!*
*|| श्री नर्मदा माहात्म्य ||*
*|| अध्याय सोळावा (लिंगप्रादुर्भवोनाम) ||*
*|| श्री गणेशाय नमः ||*
हे रमावरा ! तुझा जयजयकार असो. हे विठ्ठला, तू दामाजीपंतांसाठी महार झालास. तुझे ब्रीद अति थोर आहे, हे मी अंतरात जाणते. तुझ्यावर विश्वास ठेवूनच मी स्वस्थ बसले आहे. तूच मला तारणारा आहेस यावर मला भरवसा आहे.
वशिष्ठ ऋषी रामास पुढील कथा वर्णन करून सांगू लागले, “हे श्रीरामा, आता मी तुम्हाला ब्रम्हांड तीर्थाचा महिमा वर्णन करून सांगतो. या ठिकाणी स्वयं ब्रह्मदेवांनी तप केले होते. ही गोष्ट त्यावेळेसची आहे, ज्यावेळी संपूर्ण सृष्टीत निर्माण ही झाली नव्हती. एकदा ब्रह्मदेव नारदांना सोबत घेऊन चतुर्दश लोकांचे अवलोकन करण्याला निघाले.
प्रथम त्यांनी पाताळापासून सुरुवात केली. अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल, पाताळ हे सप्तपाताळ लोक. पाताळ लोकांचे अवलोकन झाल्यावर ब्रह्मदेव व नारद अनुक्रमे भूलोकी व स्वर्गलोकी गेले. त्यानंतर नारदांनी क्षीराब्धीला जाण्याची इच्छा दर्शवली. त्या योगसाधनी महाभागाची इच्छा ब्रह्मदेवांनी त्वरित पूर्ण केली.
ब्रह्मदेव व नारदमुनी हळूहळू क्षिरसागराच्या तळाला गेले. तेथे त्यांनी सहस्त्र फण्यांचा महाशेष पाहिला. दोघांनाही त्या नागाला पाहून आश्चर्य वाटले. त्या नागाच्या नागमण्याचा दिव्य प्रकाश संपूर्ण सागरात पसरला होता. त्या महाशेषाच्या वेटोळ्यावर पद्मनाभ बसलेले होते. पद्मनाभाची शोभा काय वर्णन करावी?
*दीर्घ चतुर्बाहू युक्त | पाहिले शेषावर श्रीमंत |*
*कमल गर्भासम आरक्त | नेत्र ज्याचे शोभती ||*
*वर्षामेघासम सावळा | विद्युतवत पितांबर पिवळा |*
*कोठे सूर्य प्रकाशाला | मुख ज्याचे एकवटवी ||*
*नाना रत्नांनी जडित | मुगुट मस्तकी शोभत |*
*आरक्त ओष्ठी फाकत | कुंदासम दंतप्रभा ||*
*कौस्तुभ प्रभा फाकली | वैजयंती धारण केली |*
*किशोर वयाचा वनमाली | पादपद्म उज्वल ||*
*वामांगी लक्ष्मी स्थित | प्रभु तिजकडे पाहून हासत |*
*नंद सुनंद गण समस्त | पार्श्वभागी शोभले ||*
*सुरासुराने नमस्कृत | अष्टसिद्धी त्या सेवित |*
*सनकादिक ध्यान करीत | तीच ही आनंद मूर्ति ||*
*श्री सद्गुरू धार्मिक यात्रा कंपनी*
कर्वे नगर,पुणे
8983194154 / 9767118804
[17/11, 7:55 AM] Ganesh Puran: २.
नारद मुनींनी त्या तेजस्वी भगवान विष्णूकडे पाहून ब्रह्मदेवाला प्रश्न केला, “तात, हा दिव्य पुरुष कोण आहे? मला तर याच्या तेजाने हाच आद्य पुरुष असावा असे भासत आहे. हाच लोककर्ता, लोकभर्ता किंवा पालक, संहती असावा. मला अशी खात्री वाटत आहे, की हाच सृष्टीनिर्माता आहे.” नारदाचे बोलणे ऐकून ब्रह्मदेव मोठ्या गर्वाने म्हणाले, “न जाणे हा कोण पुरुष आहे? मीच सृष्टीनिर्माता आहे. याची माझ्यासमोर काय प्रतिष्ठा आहे?” ब्रह्मदेवाला त्या दिव्य पुरुषाकडे बघून राग अनावर झाला. ते क्रोधीत शब्दात म्हणाले, “अरे श्रीहरी, तुला जर वाटत असेल की तूच सृष्टीकर्ता आहेस, तर ये आणि माझ्याशी युद्ध करून ते सिद्ध कर. नाहीतर मला मला शरण ये, मी तुला माफ करेल.”
ब्रह्मदेवांचे ते उद्धट वचन ऐकले आणि प्रभू कमलेकडे बघून उपहासात्मक हसले. मग शंख, चक्र, गदा घेऊन कमलापती युद्धासाठी सज्ज झाले. दोघेही एकमेकांशी युद्ध करू लागले. पितापुत्रांमध्ये तुंबळ युद्ध सुरू झाले. एकमेकांना जिंकण्याच्या स्पर्धेत दोघेही लढू लागले. ब्रम्हास्त्र, वायव्यास्त्र, पार्वतास्त्र, वन्ह्यास्त्र, पर्जन्यस्त्र अशी दिव्य अस्त्रे एकमेकांवर सोडण्यात आली. खड्ग, परिध, शुल, भाले अशा शस्त्रांनी वार केले गेले.
त्यांच्या युद्धाची वार्ता ऐकून सर्व देव आपापल्या विमानात बसून युद्ध स्थानी आले. देव परस्परांशी चर्चा करू लागले, “ज्याच्यापासून उत्पत्ती झाली, त्याच्याशीच चतुरानन युद्ध करीत आहे. याचा आता काय परिणाम होईल? बहुधा विश्वाचा लय होईल की काय? यावर त्वरित काहीतरी तोड काढायला हवी.” सर्व देव उपाय शोधू लागले. युद्ध पाहून नारदांना खूप गंमत वाटली. पितापुत्रांमध्ये कलह निर्माण केल्याने नारदांना कृतकृत्य वाटू लागले. ते हसत हसत युद्धाची मजा पाहू लागले.
या संकटाचे हरण करण्यासाठी सर्व देव कैलासपती भगवान शिवाला शरण गेले. सर्व देवांनी महादेवास समस्त वृत्तांत कथन केला. देवांकडून युद्धवार्ता ऐकल्यावर शंकरांना दोघांचीही दया आली. दोघांमधील वैराचा नाश करण्यासाठी शिव त्वरित लिंगरूपाने त्या दोघांच्या मध्ये प्रगटले. तो दिवस होता माघ महिन्यातील कृष्णपक्षातील चतुर्दशीचा. शनिवारी मध्यरात्रीच्या समयास युद्धस्थानी भगवान शिव लिंगरूपाने प्रकट झाले.
तप्त सुवर्णासम कांती असलेल्या अतिभव्य स्तंभाकार लिंगाकडे पाहून ब्रह्मा आणि विष्णू आश्चर्यचकित झाले. आपापली शस्त्रे खाली टाकून दोघेही अनंत अशा त्या स्वयंभू शिवलिंगाकडे पाहू लागले. अकस्मात प्रकटलेल्या त्या लिंगाची सुरुवात किंवा अंत बघण्याची दोघांच्याही मनी खुप उत्सुकता निर्माण झाली. विष्णू वराह रूप धारण करून पाताळात त्या लिंगाचा अंत शोधण्यासाठी गेले, तर ब्रह्मदेव हंसरूपाने स्वर्गाच्या दिशेने ऊर्ध्वबाजूस त्या दिव्य शिवलिंगाचा उदय पाहण्यास गेले. विष्णूंनी सात पाताळ धुंडाळले आणि ब्रह्मदेवांनी चौदा स्वर्ग धुंडाळले. दोघांनाही त्या लिंगाचा उदय किंवा अंत समजला नाही.
माघ मासात ज्यादिवशी लिंगोत्पत्ती झाली, त्या तिथीलाच शिवरात्र असे म्हणतात. त्या दिवशी पशुपतीची मनोभावे पूजा करावी. महादेव फार भोळा आहे. भक्तिभावाने, शुद्ध अंतःकरणाने, अनन्यभावाने त्याची प्रार्थना केली असता, तो त्वरित प्रसन्न होतो.” एवढे सांगून वशिष्ठ ऋषींनी हा अध्याय येथेच संपविला. श्रीराम कुलगुरूंना प्रार्थना करू लागले, “गुरुवर्य, आम्ही भुकेली वासरे आहोत, आपल्या बोधरुपी पान्हाने आमची क्षुब्धा दूर करा.”
या पुढील कथा वशिष्ठ पुढील अध्यायात निवेदन करीत आहेत.
*नर्मदे हर!*
॥ इति श्रीनर्मदापुराणे वशिष्ठश्रीरामचंद्रसंवादे लिंगप्रादुर्भवोनाम षोडशोध्याय: ॥
*श्री सद्गुरू धार्मिक यात्रा कंपनी*
कर्वे नगर,पुणे
8983194154 / 9767118804
(ही पोस्ट नावासकट कॉपी/फॉरवर्ड करायला आमची काहीच हरकत नाही)
[18/11, 5:01 AM] Ganesh Puran: १८/११/२०२०
*|| श्रीस्वामीसमर्थ ||*
*नर्मदे हर! नर्मदे हर! नर्मदे हर!*
*|| श्री नर्मदा माहात्म्य ||*
*|| अध्याय सतरावा (विष्णूब्रह्मानाम) ||*
*|| श्री गणेशाय नमः ||*
*नमोनमोजी पांडुरंगा || पूर्णब्रम्हा आद्यलिंगा ||*
*करी माझ्या भवभयभंगा || कृपाळू गा दिनानाथा ||*
वशिष्ठ श्रीरामाला पुढील कथा सांगू लागले, “शिवलिंगाचा अंत आणि उदय न समजल्यामुळे ब्रह्मा आणि विष्णू दोघांनाही खूप दुःख झाले. दोघेही खिन्न होऊन बसले. दोघांनी लिंगाला नमस्कार करून स्तुती आरंभिली.
“हे देवा! तुमच्या अश्या अचानक प्रकट होण्याने आमच्या मनाला खूप आश्चर्य वाटत आहे. तुमचा उदय आणि अंत याचा पार लागत नाहीये. आपण कोण आहात, कोठून आलात हे आम्हाला माहीत नाही. पण, तुम्ही जे कोणी आहात तुम्हाला आमचे नमन असो. तुमचा उदय आणि अंत बघण्याच्या वेडात आम्ही फार थकून गेलो आहोत. आम्ही याचा शोध घेत कुठपर्यंत जाऊन आलो आम्हालाही माहीत नाही. आम्ही तुम्हाला ओळखत नाही, पण तुम्हाला आमचे नमन असो. लिंगाच्या आकारात आपण येथे प्रकट झालात, आमच्या मनात त्यामुळे एक चेतना निर्माण झाली. तुमच्याबद्दल आम्हाला काहीच माहित नाही, पण तुम्हाला आमचे नमन असो.”
ब्रम्हा विष्णूची स्तुती ऐकून गिरिजापती प्रसन्न झाले. लिंगातुन साक्षात मूर्ती रूपाने ते तिथे अविर्भूत झाले. शिवाची मूर्ती फारच विलोभनीय होती. जटाजूट बांधलेल्या मस्तकावर चंद्रकला शोभून दिसत होती. शिरावर मुकुट घातला होता. तिन्ही नेत्रातून दिव्य प्रकाश झळकत होता. सर्व अंगाला भस्म लेपन केले होते. एका हातात डमरू आणि एका हातात त्रिशूल शोभून दिसत होता. अंगाभोवती गजचर्म गुंडाळले होते. दिव्य अलंकाराने शोभित अशी हसतमुख मनोहर मूर्ती पाहून ब्रम्हा विष्णूचे भान हरपून गेले.
दोघेही नम्र होऊन शिवापुढे उभे राहिले. दोघांनीही हात जोडून सांब सदाशिवाचे दर्शन घेतले. त्या दिव्य मूर्तीकडे पाहून ब्रम्हा आणि विष्णू त्यांची स्तुती करू लागले.
*तेजस्वी बलात्मन | भगवंत तुज नमन |*
*धर्म प्रबोधा तू कारण | विश्वसाक्षी तुज नमो ||*
*नमो नमो अरुपाय | नमो नमो स्वरूपाय |*
*नमो नमो निर्विकल्पाय | ब्रम्हणे परमात्मने ||*
*नमो तुज विभूतीपती | तू सर्व जगाची शांती |*
*विश्वाचा तू चालक शक्ती | विश्वभर्त्या तुज नमो ||*
*तू जग संहारकर्ता | नमो तुज त्रिनेत्रा |*
*दर्प रहित आम्ही आता | कृपा करी आम्हावरी ||*
*देवा तुझा आदि अंत | आम्हा नाही माहित |*
*आम्ही दोघे तुज शरण येत | कृपा करी आम्हावरी ||*
दोघांची स्तुती ऐकून कृपाळू कैलासनाथ म्हणाले, “हे विधाता ! हे माधवा ! मी येथे तुमच्या मधील शत्रुत्व संपवण्यासाठी प्रगटलो आहे. ब्रह्मदेवा, तुम्ही विश्वनिर्माता आहात. विष्णू, तुम्ही या सृष्टीचे पालनकर्ता आहात आणि मी संहारकर्ता. आपण त्रयमूर्ती म्हणजे सत्व, रज, तम गुणांसारखे आहोत. आपल्या तिघांमध्ये तिळमात्रही भेद नाही. जलतरंगात जसा भेद नसतो, पुष्पाच्या सुगंध देण्यात जसा भेद नसतो, तसाच ब्रम्हा विष्णू आणि महेश यांत काडीमात्रही भेद नाही.
तुम्ही हे सर्व न जाणताच व्यर्थ एकमेकांशी युद्ध केले. तत्वसाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे मायेने तुमच्यावर पांघरूण घातले. जो कोणी आपल्या तिघांमध्ये भेद मानेल तो केवळ मूढ आणि शास्त्र न जाणनारा असेल. आपण तिघे एकच तत्व असून या जगाच्या उत्पत्तीचे आदीकारण आहोत.”
महादेवांचे महावाक्य श्रवण केले आणि विष्णू आणि ब्रम्हा यांचे अज्ञान दूर झाले. त्या तत्वज्ञानाने दोघांचेही समाधान झाले. पुढे महादेव ब्रह्मदेवाला म्हणाले, “हे ब्रह्मदेवा, तुम्ही एवढे श्रुतीवेत्ता असून एवढी मुढता कशी केलीत? आपल्या पित्यालाच युद्धासाठी आव्हान देणे, म्हणजे केवढा हा व्यामोह ! ज्यांच्या नाभीकमळापासून तुमचा जन्म झाला, त्यांचाच अनादर तुमच्याकडून झाला. आता तुम्ही या कृत्यासाठी प्रायश्चित्त घ्यावे. तेच तुमच्यासाठी योग्य असेल.”
विष्णूंशी विरुद्धता पत्करून त्यांच्याशी युद्ध केल्याबद्दल प्रायश्चित्त घेण्याच्या शिवाच्या वचनांना ऐकून ब्रह्मदेव स्तब्ध झाले. ब्रह्मदेवांना चिंतेने व्याकूळ झालेले बघून नारदांना खूप हसू आले. ब्रह्मदेवाचे गर्वहरण झाल्याने त्यांना आनंद झाला. प्रायश्चित्त घेण्याची आज्ञा करून भगवान शिव अंतर्धान पावले. भगवान विष्णूही वैकुंठाला गेले. सर्व देव स्वस्थानी परतले.
वशिष्ठ पुढे रामाला सांगू लागले, “हे श्रीरामा, अशी झाली लिंगाची समुत्पत्ती. पुढे ब्रम्हदेव शिवआज्ञेने प्रायश्चित्त करण्यासाठी गेले. ती कथाही अत्यंत रसाळ आहे.
*तत्व निर्गुण निराकार | तेथे कैचा अवतार |*
*परी जनहितास्तव साकार | होई प्रभू लीलेने ||*
*नानामीषे करून | अवतार चरित्र दावी गहन |*
*अनुसरती त्या जे सज्जन | तेच भवसागरा तरून जाती ||*
*प्रभू तुझा अगाध महिमा | नमन तुज श्रीरामा |*
*ब्रम्हांडाच्या कल्याण घामा | तुज माझे दंडवत ||*
*नर्मदे हर!*
॥ इति श्रीनर्मदापुराणे वशिष्ठश्रीरामचंद्रसंवादे विष्णूब्रह्मानाम सप्तदशोध्याय: ॥
*श्री सद्गुरू धार्मिक यात्रा कंपनी*
कर्वे नगर,पुणे
8983194154 / 9767
१९/११/२०२०
*|| श्रीस्वामीसमर्थ ||*
*नर्मदे हर! नर्मदे हर! नर्मदे हर!*
*|| श्री नर्मदा माहात्म्य ||*
*|| अध्याय अठरावा (ब्रह्मांडतीर्थनिरूपणनाम) ||*
*|| श्री गणेशाय नमः ||*
हे वनमाली, तुला माझे नमन असो. हे मुरलिधरा, तुझा वेणू हा भवभयहारक, परमआनंददायक आहे. तुझी मुरली साक्षात ब्रह्मानंदरुपी आहे.
श्रीराम वशिष्ठांना विचारतात, “हे कुलगुरू, ब्रह्मदेवाने कोणत्या रीतीने प्रायश्चित्त घेतले? कृपया मला विस्तारपूर्वक सांगावे.” नैमिषारण्यात ही कथा सूत पुराणिक शौनकादि ऋषींना सांगत आहेत. वशिष्ठ ऋषींनी रामाला सांगितलेला ब्रम्हांड तीर्थाचा महिमा सूत सर्वांना सांगत आहे. वशिष्ठ रामाला कथा सांगू लागले, “हे रामा, ही पावन कथा शांत चित्ताने ऐकावी. ही कथा आदराने ऐकली असता, मानवाचे पापहरण होते.
शिव व विष्णू अंतर्धान पावल्यावर विधाता ही सत्यलोकी आले. परंतु विष्णूशी युद्ध केल्याचा त्यांना फार पश्चाताप होत होता. युद्धाचा व्यामोह झाल्यामुळे ते स्वतःच्याच धिक्कार करीत होते.
ब्रम्हा स्वतःलाच पश्चातापाच्या स्वरात म्हणाले, “माझ्या पित्याचाच माझ्याकडून अवमान करण्यात आला. केवढे हे घोर पातक माझ्या माथी आले. आता माझी काय गती होईल? साक्षात लोकपालक रमानाथाशी मी युद्ध केले, आता सर्व लोक मला काय म्हणतील? मी आता काय करू? या पापाचे निवारण कसे करू? श्रेष्ठ लोक जसे आचरण करतात, त्याचेच अनुकरण बाकीचे लोक करतात. मी हे कसले उदाहरण लोकांसमोर ठेवले आहे? विष्णू आणि शिवाचा विरोधकर्ता होऊन मी माझ्या कीर्तीला कलंक लावला आहे. शिव विष्णूशी विद्रोह करून मी पापाधिकारी झालो आहे. आता मी कोठे जाऊ? पापहरण कसे करू?”
असे पुन्हा पुन्हा आपल्या मनाशीच बोलून ब्रह्मदेव स्वतःचा धिक्कार करत होते. बराच वेळ ते खिन्न होऊन बसले. बराच वेळ विचार केल्यानंतर त्यांनी खडतर तप करुन या पापाचे निवारण करण्याचे ठरविले. ह्या जगात तपच श्रेष्ठ आहे. तपानेच परमगती प्राप्त होते. तपानेच विश्व निर्मले जाते. तपानेच पापहरण होते. तपानेच अंत:करण शुद्ध होते. तपानेच विष्णू प्रसन्न होतात. तपानेच शिवही प्रसन्न होतात. या ब्रह्मांडात तपच श्रेष्ठ आहे. असा गहन विचार करून एकाग्र मनाने लोकेशाने तप करण्याचे योजले.
त्यानंतर ब्रह्मदेवाने विश्वकर्म्याला सत्यलोकी पाचारण केले. विश्वकर्मा बरोबरच पंचायतानालाही आव्हेरीले. ब्रह्मदेवांनी बोलल्यानंतर सर्व देव, पंचायतन, विश्वकर्मा हे सर्वजण तात्काळ सत्यलोकी आले. विधीने सर्वांचा आदरसत्कार केला. त्यानंतर सर्वांची स्तुती करून त्यांनी सर्वांना विनंतीपर प्रार्थना केली, “विष्णुशी युद्ध करून माझ्या हातून मोठा अपराध घडला आहे. स्वतःच्या पापांचे क्षालन करण्यासाठी मी तप करण्याचे ठरविले आहे. मला जोवर विष्णू दर्शन देत नाहीत, तोपर्यंत मी तप करणार आहे. माझे पापक्षालन होऊन तप जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत आपण सर्वांनी मिळून सृष्टी निर्मितीचे हे कार्य पुढे चालू ठेवावे. तुम्ही सर्वजण हुशार, बुद्धिमान आहात. आपल्या शुद्धबुद्धीने आपण हे जगकार्य चालवावे, अशी मी सर्वांना विनंती करतो.”
तपाचा ध्यास घेऊन ब्रह्मदेव रेवातीरी आले. तेथे विंध्याचलाचा पुत्र पर्यंक याला ब्रह्मदेव म्हणाले, “हे विंध्यपुत्र पर्यंका, मला तप करण्यासाठी त्वरित एक मनोरम्य असे स्थान निर्माण करून दे, ज्याच्या चारी बाजूने नर्मदा वाहत असावी. ब्रह्मदेवांच्या आज्ञेने पर्यंकाने त्वरित एक रम्य असे स्थान विधाताच्या तपासाठी निर्माण करून दिले. विधात्याने त्या ठिकाणी पवित्र दर्भ हाती घेतला व विष्णूचे ध्यान करून सात्विक तपास आरंभ केला. मनामध्ये पूर्ण अनुताप करून ब्रह्मदेव श्रीहरीचे दर्शन व्हावे म्हणून तप करू लागले. आपण ज्या प्रमाणे तप करतो, त्याप्रमाणेच आपल्याला त्याचे फळ मिळते.
ब्रह्मा तपामध्ये अत्यंत मग्न झाले. इकडे सत्यलोकात विश्वकर्मा आणि पंचायतन सृष्टीरचना करत होते. परंतु ज्याचे काम त्याने करावे, हीच जगाची रीत आहे. जरी सर्व जण परमश्रेष्ठ आणि बुद्धीने निपुण होते, तरीही सृष्टीरचनेचा कोणालाही अभ्यास नव्हता. त्यामुळे काही जन्मांध निर्मिले, काही षडांगुलयुक्त झाले. काही कर्णहीन जन्मले, काहींची शृंगे वाढली. काहींच्या कमरेला कुबड आले, तर काही मूकबधिर झाले. सृष्टीरचनेची अशी अवस्था पाहून लक्ष्मीपती खूप कळवळले. गरुडावर आरूढ होऊन श्रीहरी तात्काळ नर्मदातीरी आले.
श्रीहरी ब्रह्मदेवास म्हणाले, “हे विधाता, पुत्रा, मी प्रसन्न झालो आहे. मी तुझ्या अपराधाला क्षमा केली आहे. तुझ्या तपाची सार्थकता झाली आहे. तुझ्या ज्या ठिकाणी तप केले आहे, तिथे पार्वतीसह शूलपाणी महादेव लिंगाची स्थापना करावी. ते रम्य स्थान, जिथे चोहीकडून रेवाचा प्रवाह आहे, ते एक परम पावन तीर्थ होईल. विष्णूची आज्ञा ऐकून चतुराननाने नमन केले व तपस्थानी शिवलिंग स्थापन केले. त्याला ब्रह्मेश्वर असे नाव दिले. विधिवत शिवलिंगाचे पूजन करून, विष्णू आणि ऋषीं सहीत तेथे वेदमंत्रांचा पाठ करून, शिवाची अर्चना केली. मग एकाग्र मन करून, दोन्ही हात जोडून ब्रह्मदेवांनी उमारमणाची स्तुती आरंभली
*नित्य निराकार अनंत शक्ती | आनंद ज्योतिमूर्ती |*
*ज्ञान घन प्रशांत अती | अवयक्त आद्य जगाचे ||*
*अनंत बीज अनंत व्यक्ती | कर्ता हर्ता पशुपती |*
*ब्रह्ममयातून तरतो चित्ती | ब्रह्मेश्वर लिंगी त्रिनेत्रा ||*
“देवा तु ब्रह्ममय आहेस. तूच आपत्तीचे हरण करणारा आहेस. आता मला दर्शन द्यावे, एवढीच माझी मनोकामना आहे.”
हर्षयुक्त लोचनाने उमारमण तेथे प्रकट झाले. ते ब्रम्हदेवाला म्हणाले, “हे सृष्टीकर्ता, तुझ्या स्तुतीने मला अत्यानंद झाला आहे. आता तू सर्व लोकांना नमस्कृत्य अशा सत्यलोकात हर्षयुक्त मनाने त्वरित परत जावे. तुझी सर्व पापातून मुक्तता झाली आहे. आता तू तुझे सर्व अधिकार परत घे. हे लोकेश, तुझ्या तपाचरणावर मी अत्यंत प्रसन्न आहे. तू आज काहीही वर माग, मी तो पूर्ण करेल.”
ब्रह्मदेव म्हणाले, “प्रभू, तुम्हाला जर खरच काही वर द्यायचा असेल तर माझं हे तपस्थान प्रसिद्ध होवो. येथे स्नान, दान, जप, चिंतन केले असता आणि ब्रम्हेशलिंगाचे पूजन केले असता नरास उत्तम गती प्राप्त होवो, असा वर द्यावा. आपण असा वर दिला तरच मी सत्यलोकी जाऊन माझे अधिकार परत घेईल.” शंकरांनी प्रसन्न होऊन ‘तथास्तु!’ म्हणताच ब्रह्मदेवांनी शिव व विष्णू ला नमन केले. त्यानंतर ते सत्यलोकी परतले. शंकरही कैलासाला गेले. ब्रह्मदेव परतल्यामुळे सर्व देवांची सृष्टी निर्मितीच्या कार्यातून सुटका झाली. ब्रह्मदेवाने पूर्ववत आरंभक्रमाने सृष्टीरचना करण्यास सुरुवात केली.
*नर्मदा तीराची तीर्थ रचना | अति पवित्र रघुनंदना |*
*रेवा प्रकटली कल्याणा | भक्तजनांच्या गुरु म्हणती ||*
*नर्मदे हर!*
॥ इति श्रीनर्मदापुराणे वशिष्ठश्रीरामचंद्रसंवादे ब्रह्मांडतीर्थनिरूपणनाम अष्टदशोध्याय: ॥
*श्री सद्गुरू धार्मिक यात्रा कंपनी*
कर्वे नगर,पुणे
8983194154 / 9767118804
(ही पोस्ट नावासकट कॉपी/फॉरवर्ड करायला आमची काहीच हरकत नाही)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद 🙏