वट पौर्णिमा


🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
  
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
  


        🌹  *"आज वट पौर्णिमा "* 🌹
  


प्रामुख्‍याने महाराष्ट्रात *"वट पौर्णिमा"* मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. ज्‍येष्‍ठ महिन्‍यात येणारी पौर्णिमा ही वट पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. 
   हे व्रत विवाहित स्‍त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात.  यासाठी  वटवृक्षाची, वडाच्‍या झाडाची पूजा व प्रार्थना करतात. 

वडाच्या झाडाचीच पूजा का करतात... ?
पुराणकथेप्रमाणे भगवान शंकराचे लक्ष संसारात नाही म्हणून रागावलेल्या पार्वतीने त्याला तू वृक्ष होशील असा शाप दिला आणि तो वटवृक्ष झाला! महाप्रलय झाल्यावर सगळे चराचर नष्ट झाले तेव्हादेखील फक्त वटवृक्ष पृथ्वीवर घट्ट पाय रोवून उभा राहिला! त्याच्या प्रत्येक फांदी, पारंबी व पानातून सुद्धा नवीन वटवृक्ष जन्म घेतो. म्हणून त्याला अक्षयवट म्हटले गेले आहे. त्याच्या ह्या कालातीत अस्तित्वामुळे स्त्रिया त्याला अखंड सौभाग्याचे साकडे घालतात. गीता जन्माचा एकमेव साक्षीदार म्हणून देखील वटवृक्ष पूजनीय मानतात.  नैसर्गिक गुणाप्रमाणे आपल्या पतीला आणि कुटुंबीयांना आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभावे हा त्यामागचा हेतू आहे. म्हणून वट पौर्णिमेला वडाच्‍या झाडाची पूजा करतात. 

            व्रताची देवता

सावित्रीसह ब्रह्मा ही या व्रताची मुख्य देवता आहे. सत्यवान, नारद आणि यमधर्म या उपांग (गौण) देवता आहेत.

               वटवृक्षाचे महत्त्व

यमधर्माने सत्यवानाचे प्राण हरण केल्यावर सावित्रीने यमधर्माशी तीन दिवस शास्त्रचर्चा केली. त्यावर प्रसन्न होऊन यमधर्माने सत्यवानाला पुन्हा जिवंत केले. शास्त्रचर्चा वटवृक्षाखाली झाली; म्हणून वटवृक्षाशी सावित्रीचे नाव जोडले गेले. ‘या दिवशी प्रकट स्वरूपात शिवतत्त्वस्वरूपी शक्ती ब्रह्मांडात वास करत असते. शक्तिरूपी जाणिवेतून शिवरूपी धारणेशी एकरूप होण्याच्या भावातून हे व्रत केले असता जीव-शिव एकरूपतेची अनुभूती येऊ शकते.

वटपौर्णिमेला स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करण्याचे खरे महत्त्व काय.

वटवृक्ष हा शिवरूपी आहे. शिवरूपी वटवृक्षाची पूजा करणे, म्हणजे वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एकप्रकारे स्मरून, त्याचे आयुष्य वाढून त्याची आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी, यासाठी (पतीरूपी) ईश्वराची पूजा करणे होय. 

कर्माला शिवाची जोड असेल, तर शक्ती व शिव यांच्या संयुक्त क्रियेने व्यवहारातील कर्म साधना बनून त्याचा जिवाला फायदा होतो.

      वटवृक्षाला सूत गुंडाळण्याचे महत्त्व काय

वटवृक्षाच्या खोडाच्या उभ्या छेदावर असणार्‍या सुप्‍त लहरी शिवतत्त्व आकृष्ट करून वायुमंडलात प्रक्षेपित करतात. ज्या वेळी वटवृक्षाच्या खोडाला सुती धाग्याने गुंडाळले जाते, त्या वेळी जिवाच्या भावाप्रमाणे खोडातील शिवतत्त्वाशी संबंधित लहरी कार्यरत होऊन आकार धारण करतात. सुती धाग्यातील पृथ्वी व आप या तत्त्वांच्या संयोगामुळे या लहरी जिवाला ग्रहण करण्यास सुलभ होतात.

   वडाच्या पूजनामध्ये फळे अर्पण करण्याचे नक्की कारण काय.

फळे ही मधुररसाची असल्याने फळांच्या समुच्चयाकडे आकृष्ट व प्रक्षेपित होणार्‍या देवतांच्या लहरी कमी कालावधीत जिवाच्या देहातील कोशापर्यंत झिरपतात.

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
     🍁🍁 *रामकृष्णहरी* 🍁🍁
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
🌹👣🌹👣🌹👣🌹👣🌹
    🌹 *आज वटपौर्णिमा* 🌹
🌹👣🌹👣🌹👣🌹👣🌹

 हे वट सावित्रीचे व्रत पूर्वी पासुन सुवासिनी अतिशय श्रद्धेने व निष्ठने करत आहेत, व्रत म्हणले कि उपवास हि आलाच, तोही तितक्याच श्रद्धेने  करीत असत. वट पौर्णिमेच्या दिवशी मोठ्या प्रसन्नतेने पूजा साहित्य घेऊन वडाला पुजण्यास जाणाऱ्या स्त्रिया आजही दिसतात, ते दृश्य पाहताना मोठा आनंद होतो, पण सध्या काळ हा पुरोगामित्वाचा ,समान हक्काचा व सुधारनेचा आहे. या दृष्टीने वट सावित्री व्रतावर सध्याच्या काही युवती खूपच टीकेचा भडीमार करतात  ,त्यांनी व्रत व उपवास यापासून काय फायदे आहेत याचा कधी विचारच केला नाही, सावित्रीची कथा तरी वाचली का नाही यात शंका येते, कारण सावित्रीच्या गळ्यात सत्यवान बांधला नव्हता उलट सत्यवान हा दरिद्री व अल्पायुषी आहे , असे नारदानि तिच्या लग्नापूर्वी सांगितले होते . म्हणून कुटुंबातील सर्वांची इच्छा तिने सत्यवानाशी लग्न करू नये ,अशीच होती. शिवाय सत्यवान काही राजा किंवा धनवान हि नव्हता. उलट सावित्री हि अश्वपती  राजाची मुलगी म्हणजे राजकन्या होती, असे असूनही '' मनाने मी सत्यवानाला वरले आहे व मी त्याच्याशीच विवाह करणार'' असे तिने स्पष्ट सांगितले. (यावरून पूर्वीच्या काळी स्त्रियांना पतीची निवड करण्याचे स्वातंत्र्य होते असे दिसते.) स्वेच्छेनीच तिने सत्यवानाशी विवाह करण्याचे ठरवले होते.                

*वट सावित्रीच्या व्रताचा बोध--*

   महान पतीव्रतेत सावित्रीची गणना आहे, ती प्रातःस्मरनिय आहे , तिला यमजेत्री असे म्हणले आहे. असे असताना हे व्रत गुलामीचे निदर्शक कसे होते?  सत्यवानाशी विवाह केल्याने जी सुख दुःखे पदरी येतील ती सोसण्याची तिचीतयारी आहे , सावित्री हि एखादी विलासलोलुप , ब्रमर वृत्तीची युवती नव्हती. ती तेजस्वी आणि निश्चयी होती . प्रसंगी ठामपणे व योग्य निर्णय घेण्याचा गुण आपल्या अंगी यावा , हा बोध यातून घेतला पाहिजे.
                                     
 *व्रता विषयीचे गैरसमज -*

सात जन्म हाच पती मिळवा म्हणून हे व्रत करायचे असते , असा समज अनेकांचा आहे, पण तो गैरसमज आहे. पती आळशी , व्यसनि, बाहेरख्याली, कसाही असला तरी हाच पती सात जन्म मिळवा असे कोणत्या स्त्रीला वाटेल का? मग तोच मिळावा म्हणून व्रत करण्या पेक्षा न केलेलं बरे असे वाटून अनेक सुशिक्षित स्त्रिया हे व्रत करीत नाहीत, व्रताच्या आरंभी संकल्प केला जातो . हे व्रत मी का करीत आहे, याचा उद्देश व हेतू काय आहे याचे प्रकटीकरण संकल्पात होत असते. संकल्प म्हणजे हेतूचे प्रकटीकरण आहे.
           
   *संकल्प--* 

*' मम इहजन्मनी अखंड  सौभाग्य पुत्रपौत्र धनधान्य ऐश्वर्य अभिवृध्यर्थम वट मुले ब्रम्हा सावित्री प्रीत्यर्थं '*

असा संकल्प आहे, यात सात जन्म हाच पती मिळावा असा उल्लेख नसतांना तसा हेतू आहे असे गृहीत धरून या व्रताला झोडपले जाते. हे योग्य आहे का? हल्ली कोणताही विषय समजून न घेता , त्याचा अभ्यास न करता आपले मत प्रतिपादन करण्याची वृत्ती फार वाढली आहे. अर्थात ती अयोग्य आहे.  हे जाणून प्रत्येक गोष्ट करताना , आपण कारणांचा विचार करतो. पण कुठेतरी निष्ठा ठेवावी लागते व म्हणूनच वट पूजनासारखी व्रत वैकल्ये डोळसपणे एकविसाव्या शतकातही चालू राहिली पाहिजेत. कोणतेही कर्म ज्ञानपूर्वक करावे , असे  ऋषींनी सांगितले आहे, *' यदेव विद्यया करोति तदेव वीर्यवत्तरम भवति '* ज्ञानपूर्वक केलेलं कर्म हे प्रभावी व बलवान होते. असे शास्त्र सांगते. जाणून घेण्याचे काम बुद्धी करत असते, हि बुद्धी जितकी प्रगल्भ असेल तितके ज्ञान अधिक होईल व त्याची कारणमीमांसा हि समजेल .      उपवासाच्या दिवशी हलके , पचनाला सोपे असे पदार्थ म्हणजे फळ दूध घेण्यास सांगितले आहे, म्हणून त्याला फलाहार असे म्हणटले आहे. याचाच अपभ्रंश फराळ असा झाला आहे .
कमी आहराने शरीर हलके राहते . जास्त खाण्याने अपचनाचे विकार वाढतात , प्रकृती बिघडण्यास मूळ कारण हे अपचनच आहे.
 हे जाणून प्रत्येक व्रतात उपोषण सांगितले आहे. हल्ली उपोषण म्हंटले कि शाबूदान्याची खिचडी खाणे असा अर्थ झाला आहे. पण खिचडी पचनास हलकी नसून जडच आहे.
म्हणून साबुदाणा खाणे टाळले पाहीजे, १९७१ साली दिल्ली येथे झालेल्या डॉक्टरांच्या परिषदेत ,' उपोषण हे अनेक प्रकारच्या शारीरिक  आणि मानसिक व्याधींवर उपयुक्त आहे हे रशियन डॉक्टर श्री वाय. यस. निकोलायेव यांनी मान्य केले. ते मास्को येथील मेडिकल सायन्स या संस्थेचे प्राध्यापक आहेत . ते म्हणाले आम्ही उपोषणा चा उपचार सुमारे पाच हजार रोग्यांवर करून पहिला , त्याचा चांगला गुण येतो असे आढळून आले आहे .
भूकेने जवढे लोक मारतात त्यापेक्षा अती खाण्याने जास्त मारतात असा अनेक डॉक्टरांचा अनुभव आहे , हे सर्व जाणूनंच प्रत्येक व्रतात ऋषिनी उपोषण करण्यास सांगितले असावे. केवळ आहार बदल म्हणून उपोषण कारन्यापेक्षा व्रताचे ते अंग आहे म्हणून केले तर शारीरिक, मानसिक, लाभ होऊन पुण्यासंचय हि गाठी पडेल, लठ्ठपणा कमी करण्या करिता लिक्विड डाइट करण्यापेक्षा उपोषण करणे चांगले नाही का?? उपोषनाणे बुद्धी हि तल्लख राहते, असा अनेकांचा अनुभव आहे..☺              

*वट पूजन--*

वड , पिंपळ, औदुंबर, शमी, हे पवित्र वृक्ष म्हणून सांगितले आहेत. यांच्या पूजनाने आपण निसर्गाच्या जवळ जात असतो, झाड लावणे जितके महत्वाचं आहे तितकंच त्याची जोपासना करणे महत्वाचे आहे, झाड लावण्याचे महत्व आपल्या पुराण ग्रंथात खूप सुंदर सांगितलं आहे .

संदर्भ  
*अश्वत्थमेकं पिचुन्मंदमेकं न्यग्रोधमेकं दशचिंचिणीकम्!* 
   *कपित्थबिल्वामलकीत्रयं च पंचाम्ररोपी नरकं न पश्येत्!!*
 
जो माणुस एक पिंपळ, एक निंब, एक वड, दहा चिंचवृक्ष, तीन कवठ, तीन बेल, तीन आवळीची व पाच आंब्याची झाडे लावतो, तो नरक कधीही पाहात नाही. भविष्योत्तरपुराण, १२८/२/१०  झाडे लावणे व त्याची जोपासना करणे हा सध्याच्या काळाच्या दृष्टीने  संदेश या व्रतातून  मिळतो.सौभाग्य नको असे म्हणणारी स्त्री भूतकाळात झाली नाही व भविष्यातही होणार नाही. उलट आहेव (सौभाग्यपणी) मरण यावे ,हीच स्त्रियांची इच्छा असते.

       *गुलामी नव्हे समर्पण---* 

जीवनातील खऱ्या यशासाठी आवश्यक असलेल्या अनेक गुणांचा तेजस्वी आदर्श सावित्री आपल्यापुढे ठेवते. स्वेच्छेनीच जाणीवपूर्वक निवडलेल्या पतीच्या सुख दुःखात भागीदारी होणे , त्याला संकटातून वाचविण्यासाठी काळालाहि आव्हान देण्याची तयारी ठेवणे, त्याची साथ न सोडणे आणि उभयतांनी जीवने श्रेयोन्मुख करणे हे स्त्रीचे फार मोठे सद्गुण आहेत, यात स्त्रीची लाचारी नाही.

                  वट सावित्रीचा नुसता उपहास करण्यापेक्षा श्रद्धेने व निष्ठेने ते व्रत आचरण करून काय आत्मिक समाधान लाभते ते पहावे, सर्व वृक्षात वट वृक्षाचे आयुष्य जास्त आहे , परंब्यांनी त्याचा विस्तार हि खूप होतो. 

हे करण्यात बावळट पणा काय आहे? 
   आता आपण व्रताचे विधान थोडक्यात समजून घेऊयात  *" वट पौर्णिमा"*   वास्तविक हे व्रत तीन दिवसांचे आहे, तीन दिवस करणे होत नाही म्हणून स्त्रिया हे व्रत एक दिवस करतात . ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमेच्या वेळी हे व्रत करायचे असते . या व्रता करीता चतुर्दशी युक्त पौर्णिमा घ्यावी . चतुर्दशीस सूर्यास्तापूर्वी 3 मुहूर्त ( सुमारे 1तास 36 मिनिटं)  पौर्णिमा सुरु होत असेल तर ती दिवस योग्य आहे, तसे नसेल तर दुसऱ्या दिवशी हे व्रत करावे . याप्रमाणे चतुर्दशीस पौर्णिमा आली तर ती दुपारी केव्हातरी सुरु होते व पोर्णिमा सुरु झाल्याशिवाय पूजा कशी करावी आशी शंका येते. काही स्त्रिया तर पोर्णिमा सुरु झाल्या नंतर ( दुपारी2 नंतरही ) पूजा करतात. तसे करणे योग्य नाही . सूर्योदयापासून मध्यान पर्यंत हाच पूजा काळ सांगितला असल्याने , त्या काळी पोर्णिमा नसली तरी पूजा करणे सशास्त्र आहे , म्हणून अशा वेळी पोर्णिमा सुरु होण्याची वाट न पाहता सकाळी वट पूजन करावे .

*।। ब्रह्मानं सह सावित्रि सवित्रीम सत्यवतप्रियाम । धर्मराजं मुनिइंद्रच ध्यायामीच महातारुम ।।* 
    *वट मूले ब्रह्मसवित्रे नमः।।*
        *या नाम मंत्राने पूजा करावी ।*

लेखात सांगितलेल्या संकल्पा प्रमाणे  प्रपंचात आवश्यक असणारे सौभाग्य , मुले , नातवंड , धनधान्य ,आणि उभयतांना उत्तम आरोग्य मिळावे  हा या व्रताचा हेतू आहे , व्रत वैकल्ये केल्यामुळे आत्मिक आनंद व संयम निर्माण होतो,  तरी मन इप्सित सर्व कामना पूर्ण होण्यासाठी धर्म शास्त्रावर डोळस श्रद्धा ठेऊन या व्रताचे आचरण सर्व स्त्रियांनी करावे 

🌹👣🌹👣🌹👣🌹👣🌹👣
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
   *🌹🍀🔥शास्त्र असे सांगते 🔥🍀🌹*

------------------------------------------------------

-----------------------------------------------------

*🏵 वटसावित्री व्रतामागील शास्त्रीय भूमिका कोणती.*

           *वटसावित्री व्रतावरील साहित्य संकलित केले, तर एक ग्रंथ तयार होईल. वटसावित्री व्रतातील महत्त्वाचे कथासूत्र म्हणजे, "सत्यवानाचे प्राण यमधर्माने हरण केले तेव्हा सावित्रीने यमधर्माशी शास्त्रचर्चा करून आपल्या पतीचे प्राण परत मिळविले. हा प्रसंग वटवृक्षाखाली तब्बल तीन दिवस चाललेला होता." कथेचे सूत्र अनुसरून व्रताचे स्वरूप तयार केले गेले. तीन दिवस उपवास, रात्री जागरण, वटवृक्षाची पूजा व सूत्रवेष्टन आणि शेवटी दानधर्म, उपवास म्हणजे नेहमीप्रमाणे खिचडी, वरी, फळफळावळ, दुधाचे पदार्थ भरपूर खाणे.*

           *वडाखाली जाणे होत नसल्यास वडाची फांदी बाजारात तयार असतेच. हे सर्व विडंबन पाहिले म्हणजे एखाद्या आधुनिक विचारवंत स्त्रीला वाटू लागते की, असले विकृत वटसावित्री व्रत करण्यापेक्षा न केलेले बरे. या व्रताच्या अगोदर दोन-तीन दिवस चाललेला वटसंहार पाहून विचारी मनास ग्लानी आल्याशिवाय राहणार नाही. अशाने या व्रताचा उद्देश सफल होणे दूरच, पण वनसंहार थांबवण्यासाठी वनरक्षणखात्यास एक ना एक दिवस कायद्याने वटसंहार थांबवावा लागेल.*

           *वटसावित्री व्रत खऱ्या अर्थाने करायचे असेल तर स्त्रियांनी प्रथम पतिविषयीचे सर्व गैरसमज साफ दूर करावेत. त्याच्या एवढ्यातेवढ्या विधानाची सत्यासत्यता पटवून घेण्याचा आटापिटा सोडावा. त्याच्या बारीकसारीक वर्तनास आवाहन देणे सोडावे. तो काय म्हणतो, हे आपल्याला कितपत कळते, हे पहावे. कळल्यावर ते पटते किंवा नाही हे समजून घ्यावे. एवढे केले, तरी वटसावित्री व्रताचे निम्मे फळ मिळेल. उरलेले निम्मे फळ मिळण्यासाठी वटसावित्री व्रतापूर्वी तीन, दोन किंवा निदान एक दिवस कमीतकमी खाऊन उपवास करावा. व्रताच्या दिवशी जास्तीत जास्त काळ वटवृक्षाखाली व्यतीत करावा, पूजा करावी, जास्तीतजास्त प्रदक्षिणा कराव्यात. प्रदक्षिणा करताना हातात दोरा असलाच पाहिजे असे नाही. वटवृक्षाला पूजेच्या वेळी "वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासवस्त्रं " म्हणून एक, तीन, पाच वेढे घालावेत.*

           *वटसावित्रीव्रतामध्ये असणाऱ्या सर्व भूमिका नैसर्गिक व आध्यात्मिक दृष्ट्या प्रतिकात्मक आहेत. वड हा चिरंजीव वृक्षांपैकी एक आहे. वडाची साल जुनाट व्याधी निवारक व आयुष्यवर्धक आहे, हे आयुर्वेदिक सत्य आहे. वटवृक्षाच्या सहवासात अधिकाधिक काळ घालविल्यास निरोगी दिर्घायुष्य लाभते. यमधर्म हे पात्र ही प्रतिकात्मक आहे. नीतिनियमाविषयी तयार केलेल्या संहितेस "यम" ही संज्ञा आहे. सत्यवान म्हणजे सत्याची कास धरून वागणारा. त्यालाही नीतिनियम चुकले नाहीत. पण वटवृक्षाचे सेवन केल्यास नेहमीचे नियतीचे नियम देखील अपवाद निर्माण करू शकतात.*

           *अशाप्रकारे व्रताचा खरा अर्थ व उद्देश समजून व्रत केल्यास निश्चित फळ मिळेल. पण हे व्रत विडंबनात्मक रित्या साजरे करण्यापासून नेहमी परावृत्त व्हावे. वटवृक्षाच्या सान्निध्यात जाणे सर्वथैव अशक्य असल्यास एखाद्या पाटावर चंदनगंधाने वटवृक्ष काढून पूजाप्रदक्षिणा कराव्यात. पण वडाच्या संहारास उत्तेजन देऊ नये. ज्याची पूजा करायची त्याचेच अवयव तोडणे यापेक्षा दुष्कृत्य ते कोणते ?*

*संदर्भ : वेदवाणी प्रकाशन.*
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄
     *🔸वटपौर्णिमेचे धार्मिक महत्त्व.🔸*

*------------------------------------------
*---------------------------------------------*

*हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.*

*निसर्गतःच दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी. एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही.*

*वटसावित्री धार्मिक व्रत.*
*ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून पौर्णिमेपर्यंत हे त्रिरात्र व्रत करावे असे सांगितले आहे. तीन दिवस उपवास करणे अशक्य असेल त्यांनी फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा. सावित्रीसह ब्रह्मदेवही या व्रताची मुख्य देवता असून सत्यवान-सावित्री, नारद व यमधर्म या उपांग देवता आहेत. या व्रताचा विधी असा,*

*नदीकाठची वाळू आणून पात्रात भरावी. तिच्यावर सत्यवान आणि सावित्री यांच्या मूर्ती ठेवाव्यात. मग त्यांची षोडशोपचारे पूजा करावी. त्यानंतर पाच अर्घ्ये द्यावीत. मग सवित्राची प्रार्थना करावी. पूजा झाल्यावर संध्याकाळी सुवासिनीसह सावित्रीची कथा ऐकावी. या व्रतात सावित्रीच्या मूर्तीची पूजा सांगितलेली असली तरी रूढी मात्र वेगळी आहे.*

*सावित्रीचे आदर्श व्यक्तिमत्त्व.*
*सावित्रीने आंतरिक गुणांची पारख करून निवडलेल्या वरास आई-बाप आणि देवगुरू यांच्या विरोधाला डावलून माळ घातली, व पतीचे प्राण वाचवण्याचे अवघड काम चिकाटीने, दुर्दम्य इच्छाशक्तीने आणि चातुर्याने करून दाखविले.*

*वटपौर्णिमेला स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करण्याचे महत्त्व.*
*वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने वडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा ही पूजेचा एक हेतू आहे.*

*वडाचे झाड.*
*सर्व पवित्र वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया `मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे', अशी प्रार्थना करतात.*

*सावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रिय भाषिणी |*
*तेन सत्येन मां पाहि दुःख-संसार- सागरात्|*
*अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते |*
*अवियोगो तथास्माकं भूयात् जन्मनि जन्मनि ||*

*वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन:। वटाग्रे तु शिवो देव: सावित्री वटसंश्रिता ।। अशीही प्रार्थना केली जाते.*

*पारंपरिक कथा.*
*अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली.*

*सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला.*

*पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला. व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली.*

*सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला. यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले. पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासूसासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले. तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री व्रत आचरतात.*

*स्त्रोत: विकिपीडिया.*
❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄

टिप्पण्या