..तर शरीर गंज पकडेल

📍 *...तर शरीर गंज पकडेल!*

*LetsUp | Health*

आपले शरीर यंत्राप्रमाणे आहे, असे गृहीत धरल्यास ते सतत वापरात राहिल्यास ते नीट राहू शकते. वापरात नसलेले यंत्र गंजून जाते. त्याचप्रमाणे शरीराला हालचालींची किंवा व्यायामाची सवय पाहिजे. नाहीतर अनेक आजाराने शरीर ग्रासून जाते. व्यायाम मागील कारणे आणि फायदे...

🎯 व्यायाम म्हणजे एखाद्या अवयवाला/स्नायुगटाला विशिष्ट काम जास्त काळ देत राहणे. बहुतेक व्यायाम प्रकारांत शरीराच्या थोडया-थोडया भागाला व्यायाम होतो. म्हणूनच सर्वांगीण व्यायामाची गरज असते.

ℹ हृदयाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी व्यायाम गरजेचा असतो. श्वसनाचा वेग व खोली हे दोन्हीही अशा व्यायामात वाढतात. ज्या व्यायामात हृदय व फुप्फुसांचा वेग वाढतो. त्याला एरोबिक व्यायाम (हवा-हवासा) म्हणतात.

👉 लहानपणी अवयव लवचिक असतात. मात्र वयानुरूप ते ताठर होऊ लागतात. अवयवातली लवचिकता व्यायामाने राखली जाते. व्यायामाने स्नायू भरदार होतात. त्यांची तंतुसंख्या वाढते, आणि प्रत्येक तंतू जास्त जाडजूड होतो. त्यामुळे एकूण बळ वाढते.

👀 व्यायामाने शारीरिक आरोग्य तर राखले जातेच मात्र मानसिक प्रसन्नता देखील लाभते, आणि निरोगी मन असले कि शरीर आपोआपच निरोगी राहते.

टिप्पण्या