❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄
*🔸संकष्ट चतुर्थी.🔸*
*---------------------------------------------*
*---------------------------------------------*
*हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणार्या चतुर्थीस संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी म्हणतात. एका वर्षात १२ आणि त्यावर्षी अधिकमास आल्यास १३ संकष्टी चतुर्थी येतात.*
*प्रत्येक गणपतीच्या ठिकाणी हा दिवस विशेष भक्तिभावाने साजरा होतो. गणेशाच्या उपासनेत या दिवसाचे महत्व विशेष आहे. चंद्रदर्शन हा या व्रताचा महत्वाचा भाग आहे.*
*संकष्टीचे व्रत.*
*संकष्ट चतुर्थी हे एक व्रत आहे. ते पुरुष व स्त्रिया दोघांनी करायचे असते.*
*हे व्रत दोन प्रकारांनी करतात.*
*१. मिठाची संकष्ट चतुर्थी व*
*२. पंचामृती चतुर्थी.*
*दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला महानैवेद्य दाखवावा. यासाठी मोदक करण्याची पद्धती आहे. त्यानंतर भोजन करावे. या व्रताचा काल आमरण, एकवीस वर्षे किंवा एक वर्ष असा आहे. व्रतराज या ग्रंथात हे व्रत सांगितले आहे.*
*अंगारकी.*
*जी संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते तिला अंगारकी असे म्हटले जाते. अधिक मासातील अंगारकी चतुर्थी अत्यंत महत्त्वाची मानली जाते कारण ती एकवीस वर्षातून एकदाच येते.*
*३ वर्षात ३७ महिने म्हणून ३७ संकष्ट्या; एकूण सात वार, म्हणून तीन वर्षांत अंगारकी येण्याची शक्यता ३७ भागिले ७ = ५. म्हणून साधारणपणे तीन कालदर्शिका वर्षांत पाचदा अंगारकी येते.*
*३३ महिन्यांत एक अधिक मास येतो, म्हणजे २१ वर्षात साधारणतः सात अधिक मास येतात; अधिक मासात मंगळवारी संकष्टी येण्याची शक्यता सातात एक, म्हणून साधारणपणे २१ वर्षात एकच अंगारकी अधिक मासात येते.*
❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद 🙏