यक्षाने धर्मराजाला विचारलेले प्रश्न

*- यक्षाने धर्मराजाला विचारलेले प्रश्न..*

👉 *1) देवपूजेपेक्षा श्रेष्ठ सेवा कोणती. ?*
*उत्तर : आईवडीलांची सेवा ही अधिक श्रेष्ठ.*
👉 *2) उघड शत्रूपेक्षा अधिक घातक कोण?* 
*उत्तर : नातेवाईक आणि कृतघ्न मित्र अधिक घातक.*
👉 *3 ) गृहस्थाश्रमाचे खरे वैभव कोणते?* 
*उत्तर : त्यागशील आणि सद्गुणांची पत्नी.*
👉 *4)सर्वात मोठे आश्चर्य कोणते?* 
*उत्तर : आपल्या डोळ्यांसमोर रोज अनेक माणसे मरताना दिसतात, पण आपण मात्र अमर आहोत असे अनेकांना वाटते, हे मोठे आश्चर्य.* 
👉 *5) मानवाचा सर्वात मोठा शत्रू कोणता?*
*उत्तर : क्रोध राग .*
👉 *6) पृथ्वीपेक्षा गौरवास्पद काय?* 
*उत्तर : आई.*
*👉 7) गवतापेक्षा अधिक गतीने कोण वाढते?* 
*उत्तर : चिंता  - काळजी.* 
👉 *8 ) एकाने काय करावे? दोघांनी काय करावे? तिघांनी काय करावे? चौघांनी काय करावे?* 
*उत्तर : एकाने तप करावे. दोघांनी अध्ययन करावे. तिघांनी चर्चा वा चौघांनी प्रवास.* 
👉 *9) माणसाचा खरा मित्र कोण ?* 
*उत्तर : पत्नी* 
👉 *10 ) मरणाराचा मित्र कोण ?* 
*उत्तर : सत्कृत्य.*
👉 *11 ) माणसाला अतिशय सुख देणारी वस्तू कोणती?*
*उत्तर : त्याचे शील, चारित्र्य वा वागणे.* 
👉 *12 ) सर्वात श्रेष्ठ धन कोणते.?*
*उत्तर : विद्याधन*
👉 *13) सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता?*
*उत्तर : कुणाला पीडा होईल असे न वागणे हा सर्व श्रेष्ठ धर्म आहे.* 
👉 *14 ) कुणाशी केलेली तडजोड टिकून राहाते ?* 
*उत्तर : सज्जनाशी.*
👉 *15) कशाचा त्याग केला असता मनुष्य प्रिय होतो?*
*उत्तर : अहंकाराचा .*
👉 *16) मेलेले राष्ट्र कोणते?* 
*उत्तर : ज्यात अराजकता आहे ते.*
👉 *17) श्रेष्ठ दिशा कोणती?*
*उत्तर : सत्पुरुष ज्या दिशेने जातात ती.*
👉 *18) जिंकायला कठिण असा शत्रू कोणता?*
*उत्तर : क्रोध.*
👉 *19) दुष्टता कोणती ?*
*उत्तर : सदोदित दुसऱ्या व्यक्तीचे दोष दाखविणे.* 
 
*संदर्भ. श्रीपांडवप्रताप ग्रंथ अध्याय..31*

टिप्पण्या