शंख पूजा कशी व का करावी.

शंख पूजा कशी व का करावी
शंखाचा निमुळता चोचीसारखा / पन्हळीसारखा भाग उत्तर दिशेला करावा. 
शंख अर्थातच पोकळ बाजू वर करुन ठेवावा म्हणजे त्यात पाणी राहील. 
वाजण्याकरता तोंड फोडलेला शंख पाणी भरुन ठेवुनच्या देवपुजेकरता घेऊ नये. तो निव्वळ "शंखध्वनी" करताच वापरावा. 
त्याची पूजा करणे झाल्यास स्वतंत्र करावी. शंखाला हळदकुंकू वहात नाहीत, तसेच गंधाक्षतफूल न वाहता, निव्वळ गंधफुल वहावे, शक्यतो पांढरे फूल वहावे.

पूर्वी गंध म्हणल्यावर, चंदनाचे उगाळून केलेले गंधच असायचे, हल्ली नसते. (वेळ अन ताकद कुणालाय उगाळत बसायची? शिवाय चंदनही किति महाग आहे?) तर हल्ली निरनिराळ्या रंगांची /मातीची गंधे मिळतात. त्यातिल शक्यतो पांढरे/वा पिवळट गंध वापरावे. कुंकू कालवून केलेले गंध शंखासाठी वापरू नये.

शंख पूजा चे फळ
साक्षात लक्ष्मीचा सहोदर असणार्‍या दक्षिणावर्ती शंखाची पूजा ज्या घरात होते, तेथे कायम मंगलमय वातावरण राहते.

देवपूजेपूर्वी शंखाची पूजा करण्याचा प्रघात आहे. देवपूजेकरिता लागणारे सर्व साहित्य शुद्ध करण्यासाठीदेखील शंखातील पाणी सिंचन केले जाते. दीर्घकाळ शंखात राहिलेले पाणी पूजेच्या समाप्तीनंतर विष्णूवर शिंपडल्यास त्या पाण्याच्या स्पर्शाने पूजकाच्या अंगाला चिकटलेली ब्रह्महत्येसारखी घोर पातकेसुद्धा नाहीशी होतात.

पांढाराशुभ्र, कांतिमान, गुळगुळीत असा दक्षिणावर्ती शंख ‘अष्टमी’ किंवा ‘चतुर्दशीस’ विधिवत पूजनाने आपल्या देव्हार्‍यात किंवा तिजोरीत स्थापन करावा. 
राज्य, धन, कीर्ती, आयुष्य, शत्रूवर जय, कोर्टकचेर्‍यांमध्ये यश, पती-पत्नी नातेसंबंध यापैकी अपेक्षित फलप्राप्तीकरिता दिवसाच्या विशिष्ट नियोजित प्रहरामध्ये शंखपूजन करण्यास सांगितले आहे.
‘ॐ सर्वतोभद्राय सर्वाभीष्टफलप्रदाय सर्वारिष्ट-दुष्ट-कष्ट-विषारथ कामितार्थप्रदाय शंखाय स्वाधिष्ठायकाय भास्करा क्ली श्रीं ?? क्रौं नम: स्वाहा।’
या प्रतिष्ठा मंत्राने शंखाची स्थापना करून पुढीलपैकी एका मंत्राचा १०८ वेळा स्फटिकाच्या माळेवर जप करावा. 
ॐ श्री लक्ष्मीसहोदराय नम:।, ॐ श्रीं पयोनिधी जाताय नम:।, ॐ श्रीं दक्षिणावर्तशंखाय नम:। 
शंखोदकाने अनेक व्याधी नाहीशा होतात, आयुर्वेदात अनेक व्याधींवर शंखभस्माचा उपयोग सांगितला आहे.
दक्षिणावर्ती शंख धान्य भांडारमध्ये ठेवल्याने धान्य, धन भांडारमध्ये ठेवल्याने धन, वस्त्र भांडारमध्ये ठेवल्याने वस्त्रांची कमतरता भासत नाही. 
शयन कक्षामध्ये (झोपण्याच्या खोलीत) ठेवल्यास शांततेचा अनुभव होतो.
यामध्ये शुद्ध, पवित्र पाणी भरून व्यक्ती, वस्तूवर शिंपडल्याने दुर्भाग्य, अभिशाप, तंत्र-मंत्र इत्यादींचा प्रभाव समाप्त होतो. कोणत्याही प्रकारचे वाईट तांत्रिक प्रयोग या शंखाच्या प्रभावासमोर निष्फळ होतात.
दक्षिणावर्ती शंख असेलेल्या ठिकाणी धनाची कमतरता राहत नाही. 
दक्षिणावर्ती शंख घरामध्ये ठेवल्याने सर्व प्रकारची नकारात्मक उर्जा स्वतः नष्ट होते आणि सकारात्मक उर्जा वाढते.

टिप्पण्या