लघवीचे इतर रोग
🙏जय श्री माताजी 🙏
1. मेथी दाणे ६ ग्राम वाटून चूर्ण करून घ्यावे. १ ग्राम मधात कालवून रात्री चाटल्याने थेंब थेंब पडणारी लघवी बंद होते. ३ -४ दिवस प्रयोग करावा.
2. २० ग्राम वडाची पाने पाव लिटर पाण्यात वाटून गाळून घ्यावे. सकाळ संध्याकाळ हे पाणी घेतल्याने थेंब थेंब लघवी होणे, लघवीतून रक्त येणे थांबते.
3. एरंडीची पाने ४ ग्राम बारीक वाटून सकाळ संध्याकाळ पाण्याबरोबर नियमित घेतल्याने बहुमुत्र व रात्री आपोआप लघवी येणे या सारखे विकार बरे होतात.
लघवीत जळजळणे
1. थंड पाण्यात जाड कापड भिजवुन पिळून घ्यावा हे कापड पोटावर बेंबीच्या खालच्या भागावर ठेऊन झोपून राहावे.या प्रयोगाने लगेच आराम पडतो.
२. सकाळी दुध व पाणी समप्रमाणात घेऊन एका ग्लासात दोन चमचे साखर टाकून चांगले हलवावे व पिउन टाकावे. चहा घेऊ नये. दुपारी एक पेला थंड पाण्यात लिंबू पिळून दोन चमचे साखर मिसळून प्यावे.
3. एक ग्लास पाण्यात गुलाबाच्या १ – २ फुलाच्या पाकळ्या टाकून रात्र भर झाकून ठेवावे सकाळी कुचकरून गाळून घ्यावे. त्यात एक चमचा दळलेली खडीसाखर टाकून प्यायल्याने जळजळ थांबते. एक आठवडा सेवन करावे.
4. एक मध्यम आकाराचा कांदा कुचकारून २५ ग्राम पाण्यात उकलावा. पाणी अर्ध उरल्यावर पाजावे. दोन दिवस प्रयोग लघवीची जळजळ थांबते.
5. कष्टाने थोडी लघवी होणे, लघवीला आग होणे, जळजळणे यावर द्राक्षे किंवा मनुका पाण्यात भिजवून घ्याव्यात.
सारखे लघवीला होणे
1. बेलाच्या ताज्या पानांचा रस ५ ग्राम दिवसातून तीन वेळा घ्यावा.
2. डाळीम्बाच्या साली वाटून त्याचे चूर्ण करावे. ५ – ५ ग्राम दिवसात २ वेळा घ्यावे.
🙏🇧🇴 जय भारत 🇧🇴🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद 🙏