वास्तु शास्त्र टिप्स

*‼    वास्तु शास्त्र  टिप्स .‼*

घरामध्ये कोठेही लाल ,मरून ,काळ्या रंगाचे पडदे वापरू नयेत .

घराच्या मुख्य दरवाजावरती भयानक चित्रे  लिंबु, , मिरची ,राक्षसाची तोंडे असे चित्र लावू नयेत .

घरामध्ये अश्रु  ढाळणारया स्त्रियांची ,पुरुषांची किंवा मुलांची चित्रे लावु नयेत.

घराच्या मुख्य दरवाजावरती सुकलेली फुले , वाळलेली पाने यांची तोरणे जास्त दिवस ठेवु नयेत .

घराचा मुख्य दरवाजा पुर्ण उघडणे महत्वाचे आहे  म्हणजेच  मुख्य दरवाजाच्या आत आणि बाहेर कोणताही अडथळा ठेऊ नये .

घरामध्ये सुख -समृद्धी मिळावी यासाठी सकाळ-संध्याकाळ धुप, अगरबत्ती, निरंजन लावणे महत्वाचे आहे .

घरामध्ये सुख -समृद्धी मिळावी यासाठी घरामध्ये नकारात्मक बोलणे , भांडणे टाळावीत .

मुलांच्या उत्तम प्रगतीसाठी त्यांची बेडरूम ईशान्य, उत्तर किंवा वायव्येला   असावी.

मुलांचे स्टडी टेबल पुर्व आणि ईशान्य दिशेमध्ये असावेत .

मुलांच्या उत्तम शैक्षणिक प्रगतीसाठी स्टडी टेबलचा आकार आयताकृती चौकोनी असावा गोलाकार नसावा .

मुलांच्या बेडवरती किंवा स्टडी टेबलवरती कपाट असु नये .

आपल्या घराचे पार्कींग कोणत्याही दिशेस असो परंतु पार्कींगमध्ये गाडी लावताना उत्तर किंवा पूर्वेला तोंड करून लावावी .

नवीन कार घेताना काळा व मरून कलर या रंगाची कार घेणे टाळावे .

नवीन कार घेताना कारच्या नंबर प्लेटसच्या अंकांमध्ये चार व आठ हे अंक येऊ देऊ नये .

नवीन कार घेताना कारच्या नंबर प्लेटमधील अंकांची बेरीज तीन ,सहा ,नऊ अशी असावी अंकांची टोटल चार व आठ नसावी .

कार प्रोटेक्शनसाठी कारच्या डिक्कीमध्ये खडे मीठ कापडी पिशवी मध्ये भरून ठेवावे .

घराच्या आग्नेय दिशेला टॉयलेट पाण्याचे बेसिंग येऊ देऊ नये .

घर बांधताना ईशान्य दिशेला जिना येऊ देऊ नये .

घराची उत्तर दिशा बंद असेल तर हेल्थ आणि वेल्थ प्रोब्लेम येऊ शकतात .

घरामध्ये देवांचे फोटो भिंतींवर टांगुन ठेऊ नये त्यांचे पावित्र्य भंग होते .

घरातल्या कर्त्या व्यक्तिने वायव्य दिशेला झोपु नये .

घरामध्ये कोठेही फॉल सिलिंग करु नये घराची उंची कमी होते त्यामुळे घरातील अडचणी वाढु शकतात.

इन्वरटर , यु . पी . एस बॅटरी घराच्या आग्नेय दिशेला असावा .

ऑफिस मधले टेबल आयताकृती किंवा चौकोनी असावेत गोलाकार नसावेत .

ऑफिस विकत घेताना ऑफिसचा दरवाजा उत्तर , पूर्व किंवा ईशान्येचा असावा .

टिप्पण्या