*‼◆ महामृत्युंजय मंत्र ◆‼**ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।**उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥*

.     *‼     मंत्रशास्त्र    ‼*

*‼◆ महामृत्युंजय मंत्र ◆‼*

*ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।*
*उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥*

महामृत्युंजय मंत्र ऋग्वेदातला एक श्लोक आहे (७.५९.१२).

त्रयंबक = त्रिनेत्र असणारा, रुद्राचे विशेषण ज्याला नंतर भगवान शिवांशी जोडले गेले, या मंत्रामध्ये असे भगवान शिव रुद्र स्वरूपात संबोधित केले आहेत.

हाच श्लोक यजुर्वेदात देखील आला आहे (TS 1.8.6.i; VS 3.60).

मृत्युवर विजय मिळवणारा असा हा महा मृत्युंजय मंत्र आहे. या मंत्राचे बरेच नाम आणि रूपे आहेत. यालाच भगवान शिवाच्या उग्र रुपाकडे संकेत करून ‘रुद्र मंत्र’ म्हंटले आहे;
भगवान शिवाचे तीन डोळ्यांकडे इशारा करून ‘ त्र्यंबकम मंत्र ’ आणि याला कधी कधी ‘ मृत-संजीवनी ’ मंत्राच्या रूपात देखील जाणले जाते कारण की कठोर तपस्या पूर्ण केल्यानंतर राक्षसांचे गुरु शुक्राला हा मंत्र प्रदान केला होता. 
हाच तो ‘ संजीवनी मंत्र ’ ज्यामध्ये मृताला पुनर्जीवन देण्याचे सामर्थ्य होते. आणि ते मंत्रसामर्थ्य बृहस्पती पुत्र कच याने हिरावून घेतले .
ऋषि-मुनींनी या महा मृत्युंजय मंत्राला वेदाचे ह्रदय सांगितले आहे. 
चिंतन आणि ध्यान यासाठी वापर करणाऱ्या अनेक मंत्रांमध्ये गायत्री मंत्राच्या साथीला या मंत्राचे सर्वोच्च स्थान आहे.

*महामृत्युंजय मंत्राचा अर्थ असा:*

*त्रयंबकम्*= त्रि-नेत्र असणारा (कर्मकारक)
*यजामहे* = आम्ही पूजन, सम्मान करतो, आमचे श्रद्देय
*सुगंधिम्*= सुगंधित (कर्मकारक)
*पुष्टिः* = एक सुपोषित स्थिति, फाळणारी-फुलणारी, समृद्ध जीवनाची परिपूर्णता
*वर्धनम्*= जो पोषण करतो, जो शक्ति देतो, स्वास्थ्य, धन, सुख यांचा वृद्धिकारक; जो हर्षित करतो, आनन्दित करतो
*उर्वारुकम* = काकडी (कर्मकारक)
*इव*= जसे, अशा रीतीने
*बन्धनात्*= लौकीचे तण, उन्मोचन
*मृत्योः* = मृत्यु पासून
*मुक्षीय* = स्वतंत्रता दे, मुक्ति दें
*मा*= न
*अमृतात्*= अमरता, मोक्ष


*महामृत्युंजय मंत्राचा जप कसा आणि केव्हा करावा ?*


पहाटे लवकर उठून स्नान करून भगवान शंकरजीच्या मूर्तिसमोर , प्रतिमेसमोर  किंवा शिवलिंगा जवळ बसून महामृत्युंजय मंत्राचे एकशे आठ (१०८) वेळा जप किंवा उच्चारण केले पाहिजे. 
शिवलिंगावर बेलाची पाने, पांढरी फुले आणि दूधाने अभिषेक केला पाहिजे.

*महामृत्युंजय मंत्राचे जप करण्याचे लाभ.*

*१. मनातील नैराश्य आणि भय दूर होते*

महामृत्युंजय मंत्राचे नियमित स्मरण किंवा जप केल्यास जीवनातील कोणत्याही प्रकारचे भय किंवा तणाव दूर होण्यास मदत होते. जीवनात येणाऱ्या संकटांवर मात करण्याची शक्ति प्राप्त होते. 
महामृत्युंजय मंत्राचा नियमित जप केल्यास निरंतर चालणाऱ्या जीवन आणि मृत्युच्या कालचक्रातुन मानवी जीवनास मुक्ति मिळते.

*२ . आजार दूर होण्यास मदत होते*

जर कोणाला कसलाही आजार किंवा रोग झाला असल्यास त्याने महामृत्युंजय मंत्राचा दिवसभरात कमीत कमी एक हजार वेळा जप केला पाहिजे असे केल्यास निश्चितपणे लाभ प्राप्त होतो. 
महामृत्युंजय मंत्राचा नियमित जप केल्यास कोणत्याही आजाराचा सामना करण्याची मानसिक ताकत मिळते तसेच मनाला स्थिरता आणि एकाग्रता प्राप्त होते.

*३ . सुख आणि यश प्राप्त होते*

महामृत्युंजय मंत्राचा नियमितपणे जप केल्यास जीवनातील प्रत्येक टप्प्यात यश प्राप्ति सहज शक्य होते. जीवनात येणाऱ्या सगळ्या संकटाचा सामना करण्याचे मानसिक बळ प्राप्त होते. आपल्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा निष्क्रिय ठरते किंवा दूर होते याच बरोबर मनात सकारात्मक दृष्टिकोण निर्माण होतो.

*४ . अकालीमृत्यु आणि आजारापासून सुटका होते*

महामृत्युंजय मंत्राचा नियमित जप केल्यास अकाली मृत्यु आणि आजारापासून सुटका होते यासाठी आपण या मंत्राचा एक लाख वेळा जप किंवा उच्चारण केले पाहिजे यामुळे आपल्याला दीर्घायुत्व प्राप्त होण्यास मदत होते.

*महामृत्युंजय मंत्र किती वेळा जपावा*

शास्त्रांमध्ये भिन्न-भिन्न कार्यांसाठी भिन्न- भिन्न संख्यांमध्ये मंत्राचे जप करण्याचे विधान आहे.
तसेच कोणत्या कार्यांसाठी महामृत्युंजय मंत्र किती वेळा जपावे याचा उल्लेख करण्यात आला आहे.

१. भीतीपासून मुक्तीसाठी ११०० (अकराशे) वेळा जप केला जातो.

२ . रोगांपासून मुक्तीसाठी ११००० (अकरा हजार) वेळा जप केला जातो.

३. पुत्र प्राप्तीसाठी, प्रगतीसाठी, अकाली मृत्यू टाळण्यासाठी सव्वा लाख या संख्येत मंत्र जपणे अनिवार्य आहे.

*सर्व सामान्य पणे नित्य किमानपक्षी  ४ माळा जप श्रेयस्कर असेल .*

*मंत्रानुष्ठानासाठी शास्त्रांप्रमाणे नियम पाळणे आवश्यक आहे, अन्यथा लाभाऐवजी हानी होण्याची शक्यता अधिक असते. म्हणून प्रत्येक कार्य शास्त्रसम्मत केले पाहिजे. यासाठी एखाद्या योग्य आणि विद्वान व्यक्तीचे मार्गदर्शन घेतले पाहिजे. जर साधक पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने साधना करेल तर इच्छित फल प्राप्तीची शक्यता वाढते.*

टिप्पण्या