गुरूवारची ॐ श्रीम नमः ची आरती



!! ॐ श्रीम नमः !!
जय देवी जय ॐ श्री महालक्ष्मी माते !
 प्रसन्न होऊनी आजि वरदे भक्ता  ते !!धृ!!
जय अंबे हे भक्तांच्या श्री महालक्ष्मी आई !
लक्ष्मीव्रता आचारी भक्तां ऐश्वर्य देई !!१!!
विश्वव्यापक जननी  तुझं ऐसी नाही!
धावे भक्ता लागी पावसी लवलाही!!२!!
तुझिया प्रसादे भक्तां लाभे सुख शांती !
आपत्ती चिंता क्लेश सर्वही ते पळती!!३!!
संकटी तुज वांचोनी कोण रक्षी माते !
 प्रार्थितो हा भक्त पाव आतां जगदंबे !!४!!
हा  मालती दत्तात्रेय आरती ओवाळी !
 प्रेमे भक्तांसवे लोटांगण घाली!!५!!
 जय देवी जय ॐ श्री महालक्ष्मी माते! प्रसन्न होऊनी आजिं वर दे भक्तां ते !!धु!!
🙏🙏🙏👏👏👏

टिप्पण्या