किटकनाशकांची काळजी

😷 *किटकनाशकांसंदर्भात घ्यावयाची काळजी*

 Agri*

🐛 पिकांवर पडणारे विविध रोग व किड रोखण्यासाठी विविध प्रकारच्या फवारण्या कराव्या लागतात. आज आपण किटकनाशके फवारणी करताना काय काळजी घ्यावी हे जाणून घेऊयात

💁‍♂ *किटकनाशके खरेदीवेळी घ्यावयाची काळजी :*
▪ किटकनाशके अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावेत.
▪ नोंदणी क्रमांक, बॅच क्रमांक, उत्पादनाची तारीख, अंतिम तारीख इ. गोष्टी काळजीपूर्वक तपासावे
▪ किटकनाशकांवरील लेबल नीट तपासा, डब्यातून किंवा पॅकेटमधून गळती होत असेलेली किटकनाशकं घेऊ नका

📍 *किटकनाशकांची साठवणूक :* किटकनाशके कुलूपबंद ठिकाणी व लहान मुलांच्या हाती लागणार नाहीत अश्या ठिकाणी ठेवावीत. भाजीपाला तसेच फळांच्या सोबत किंवा खाद्यपदार्थांसोबत किटकनाशके ठेऊ नयेत किंवा त्यांची वाहतूक करू नये.

👉 *किटकनाशकांचे मिश्रण :* औषध बनवण्याची पद्धत, किटकनाशकाची मात्रा, लेबल क्लेम बघूनच द्रावण तयार करावे. फवारणीसाठी आवश्यकतेनुसार योग्य नोझलची निवड करावी. मिश्रण हाताने तयार न करता त्यासाठी काठीचा वापर करावा

🧐 *फवारणी करताना :*
▪ फवारणीसाठीचे द्रावण पंपात भरताना नरसाळे वापरावे, गळक्या पंपाचा वापर करू नये
▪ किटकनाशक व तणनाशक यांच्या फवारणीसाठी एकाच पंपाचा वापर करू नये
▪ फवारणी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करावी, वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फवारणी करू नये
▪ मिश्रण तसेच फवारणी करताना व्यक्तिगत संरक्षणासाठी सुरक्षा किट वापरावी
▪ फवारणी झाल्यावर उरलेल्या द्रावणाची योग्य विल्हेवाट लावावी
▪ फवारणी झाल्यावर अंघोळ करावी तसेच सुरक्षा किटदेखील धुवावी

👀 *फवारणीदरम्यान विषबाधेची लक्षणे :* डोळे व त्वचेची जळजळ होणे, डोकेदुखी, डोळ्यांतून पाणी येणे, उलटी, मळमळ, धाप लागणे घाम फुटाणे इ.

⛑ *विषबाधेवर प्रथमोपचार :*
त्वचा किंवा डोळ्यांशी किटकनाशकांचा संपर्क आल्यास त्वचा व डोळे 15 मिनिटे स्वच्छ पाण्याने धुवावेत. तोंड किंवा नाकाद्वारे किटकनाशके शरीरात गेल्यास किटकनाशकांचे लेबल घेऊन त्वरित डॉक्टरांकडे जावे

🎯 

टिप्पण्या