गणेशाची मुळ आरती

🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
*समर्थ रामदास स्वामींनी लिहलेली गणपतीची ७ कडव्यांची मूळ आरती.*

*समर्थ रामदास स्वामींनी लिहलेली गणपतीची प्रचलित आरती आपण म्हणतो, ती फ़क्त २ कड़वी म्हटली जातात. पण मूळ आरती ७ कडव्यांची आहे ती खालिलप्रमाणे आहे.*

*सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥ सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची । कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥*

*जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥*

*रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा । चंदनाची उटी कुंकुमकेशरा  । हिरेजडीत मुकुुट शोभतो बरा । रुणझुणती नूपरें चरणीं घागरिया ॥ जय० ॥२॥*

*माथा मुकुट मणी कानी कुंडले । सोंड दोंदावरी शेंदुर चर्चिले ।। नागबंद सोंड-दोंद मिराविले । विश्वरूप तया मोरयाचे देखिले ॥ जय० ॥३॥*

*चतुर्भुज गणराज बाही बाहुटे । खाजयाचे लाडू करुनी गोमटे ।। सुवर्णाचे ताटी शर्करा घृत । अर्पी तो गणराज विघ्ने वारीतो ॥ जय० ॥४॥*

*छत्रे चामरे तुजला मिरविती । उंदीराचे वाहन तुजला गणपती ।। ऐसा तु कलीयुगी सकळीक पाहसी । आनंदे भक्तासी प्रसन्न होसी ॥ जय० ॥५॥*

*ता ता धि मि किट धि मि किट नाचे गणपती । ईश्वर पार्वती कौतुक पाहती ।। ताल मृदंग वीणा घोर उमटती । त्यांचे छंदे करुनी नाचे गणपती ॥ जय० ॥६॥*

*लंबोदर पीतांबर फणिवरबंधना । सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ॥ दास रामाचा वाट पाहे सदना । संकटीं पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवर वंदना॥ जय ० ॥ ७ ॥*

*जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ।।*
*🌹स्वामीज्ञानामृत🌹*
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵

टिप्पण्या