💁♂ *'ओणम' आणि बरंच काही*
*| Special*
केरळातील सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा उत्सव म्हणजे ओणम. याच उत्सवाने केरळचे नवीन वर्ष सुरू होते. तब्बल 10 दिवस चालणाऱ्या या उत्सवातील 10 वा दिवस तिरुओणम सगळ्यात धुमधडाक्याने साजरा केला जातो.
दैत्यराज महाबली या प्रल्हादाच्या नातवाच्या न्यायीपणाची, पराक्रमाची आणि त्याच्याबद्दल असलेल्या प्रेमाची आठवण म्हणून साजरा केला जाणारा उत्सव आहे.
📍 *विशेष बाबी* :
● यावेळी पारंपरिक नाचगाणी, खेळ, नाटके वगैरे कार्यक्रमांचे आयोजन संपूर्ण केरळ राज्यात केले जाते.
● यावेळी नवीन कपड्यांची खरेदी केली जाते.
● केवळ या उत्सवासाठीचे खास पारंपरिक पद्धतीचे अनेक खाद्यपदार्थही तयार केले जातात.
● ओणम सणाचा पहिला दिवस म्हणून 'अथम' ओळखला जातो. या दिवशी सजलेले हत्ती, छोट्या-मोठ्या बोटी, संगीत, पारंपरिक लोकनृत्यू व वेगवगेळ्या कलेच्या सादरीकरणात हा सण पार पडतो.
● या सणामध्ये स्नेक बोटींची शर्यत म्हणजेच 'अर्नामुल्ला वल्लामकली'चे मोठं वैशिष्टय आहे.
● ओणमच्या पाचव्या दिवाशी या शर्यतीचे आयोजन केले जाते. वल्हेकरी गाणी म्हणत या शर्यतीचा आनंद लुटतात. या पारंपरिक गाण्यांना 'वंचिपट्टू' असं म्हणतात.
● या दिवशी चेंडूचा एक विशिष्ट खेळ खेळला जातो, त्याला "नाटन" असे म्हटले जाते. या दिवसात स्त्रिया व मुली रात्री एकत्र खेळ खेळतात त्याला "कैकोटीवकळी" म्हणतात.
👌 *रांगोळीचे आकर्षण* : ओणम सणाच्या या दिवशी प्रत्येकाच्या घराबाहेर अशी रांगोळी पाहायला मिळते. 'पुक्कलम्' म्हणजेच फुलांनी काढलेली रांगोळी हेही या सणाचे एक खास आकर्षण मानले जाते.
👨👩👧👦 *पारंपरिक पोशाख* : या दिवशी घरातील सदस्य पारंपरिक वेशात दिसतात. त्याला 'ओनाकोड्डी' असेही म्हणतात. यामध्ये स्रिया सफेद व गोल्डन रंगाची काठ असलेली साडी परिधान करतात, तर या दिवशी घरातील वयोवृद्ध व्यक्ती स्वतःच्या हाताने नवीन कपडे घरातील इतर सदस्यांना देतात.
😋 *विविध पदार्थांची मेजवानी* : तिरुओणम हा सणाचा शेवटचा दिवस असतो. यानिमित्ताने 11 वेगवेगळ्या पदार्थांची मेजवानी केली जाते. पारंपरिक असे चविष्ट पदार्थ घरातील महिला मोठ्या उत्साहाने बनवतात, तर खाद्यपदार्थांची ही मेजवानी केळीच्या पानांवर वाढली जाते.
🔎

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद 🙏