पालकत्व

💁‍♀ *पालकत्वात हवा मैत्रीचा संवाद*

* | Parenting*

पालकांना आणि मुलांना एक गोष्ट सोबत धरून ठेवते आणि ती म्हणजे संवाद. जेव्हा तो व्यवस्थित असतो तेव्हा त्या नात्याला योग्य दिशा मिळते. कधी होतो असा निखळ संवाद? जेव्हा त्या नात्यात मैत्री, मोकळेपणा, विश्वास असतो. संवाद व्यवस्थित होण्यासाठी काय करावे? त्याबाबत जाणून घेऊ...

🎯 तुम्ही मुलाला जन्म दिला म्हणजे तुम्ही त्यांच्यावर अधिकार गाजवू शकता हा विचार चुकीचा आहे. तुम्ही माध्यम होता त्यांच्या जन्माचं! मात्र त्यांना त्यांचं अस्तित्व आणि विचार आहेत ही बाब नक्की लक्षात घ्यायला हवी.

👉 आज बऱ्याच घरांमध्ये जेथे उत्साही आजी-आजोबा असतात, तेथे घरात व घराच्या बाहेरसुद्धा मुलांची वृत्ती, वागणूक अधिक मनमोकळी व आनंददायी असते. यातील वेगळेपण बघितले, तर आईबाबांसारखेच आजी-आजोबासुद्धा प्रेमाने हवे-नको बघत असतात, इतरही काळजी घेत असतात. हा सुद्धा संवादाचा एक भाग आहे, हे समजून घ्या.

📌 तुम्ही पालक आहात म्हणजे तुम्ही केवळ मुलांना चुका दाखवणे किंवा त्यांना उपदेश करणे अपेक्षित नसते. त्यांना समजून घेणे, वेळप्रसंगी त्यांच्या विश्वात रममाण होणे देखील तुम्हाला जमायला हवे. मुलांचे भावविश्व तुमच्याभोवती फिरत असते, हे लक्षात ठेवून त्यांना प्रेमळपणे वागवणे महत्वाचे आहे. त्यांचे मित्र बनून राहा. त्यांना तुमच्याशी बोलताना कोणत्याही प्रकारची अडचण वाटणार नाही, याची काळजी तुम्हीच घ्यायला हावी़.

टिप्पण्या