🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
*पारायण सात दिवसांचेच का?*
*पुष्कळ लोक असा प्रश्न विचारतात की, 'श्रीगुरुचरित्र' किंवा 'श्रीनवनाथ भक्तिसार' या ग्रंथांचे पारायण सात दिवसांतच का करावे?*
*आम्ही रोज थोड्या ओव्या वाचल्या तर चालणार नाही का?*
*या प्रश्नाचे उत्तर असे की, रोज थोड्या ओव्या वाचण्यात गैर काहीच नाही. 'अकरणात मंद करणं श्रेयाः' ही म्हण प्रसिद्धच आहे, परंतु सात दिवसांच्या पारायणाचे महत्व काही वेगळेच आहे. ते एक दिवसाच्या किंवा तीन दिवसांच्या पारायणाला येणे शक्य नाही.*
*या संदर्भात तासगावचे (कै.) रा. वि. कुलकर्णी ऊर्फ आनंदघनराम यांनी दिलेले उत्तर लक्षात ठेवण्यासारखे आहे. ते लिहितात- नुसत्या पारायणापेक्षा सप्ताहाच्या अनुष्ठानात काही विशिष्य हेतू असतात.*
*१) संकल्प कर्मनिश्चयः याप्रमाणे कार्यपूर्तीला आपला मनोनिश्चय मदत करतो. हा इतका निश्चय नुसत्या पारायणात असत नाही.*
*२) सप्ताहात जो व्रतस्थपणा असतो, तो नित्याच्या पारायणात कोणी पाळीत नसतात. व्रतस्थपणे राहिल्याने एक प्रकारची शक्ती उत्पन्न होते.*
*३) सप्ताहात बहुधा दिवसाचा सर्व वेळ त्यातच खर्चीपडतो. तसा नित्याच्या पारायणात फारच थोडावेळ त्या कार्यात व बाकीचा आपल्या संसारात जातो.*
*श्रीआनंदघनराम यांनी केलेला हा खुलासा कुणालाही पटण्यासारखाच आहे. यासाठीच एक किंवा तीन दिवसांचे पारायण केवळ नाइलाज किंवा वेळेअभावी करण्यास हरकत नाही.*
*तथापि अशा पारायणात खरे तर मनाची एकाग्रता नीट सांभाळता येत नाही. कारण शरीराला तशी सवय नसते. त्यामुळे एक दिवसाचे पारायण करताना शरीराला ताण येतो व केव्हा हे पारायण संपते असाच विचार मनात येऊन जातो!*
*यासाठीच सप्ताह पद्धतीने वाचन करणे हाच उत्तममार्ग होय.*

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद 🙏