माळ परडी पोत घेणे म्हणजे काय त्याचा कुळाचार काय आहे?*

🚩💠 *माळ परडी पोत घेणे म्हणजे काय त्याचा कुळाचार काय आहे?* 💠🚩
चौदा भुवने समस्त ब्रम्हांडासह चराचर व्यापी भगवती सर्वेश्वरी जगदंबेच्या पुजा अर्चनेतील साधन म्हणजे माळ परडी पोत होय.
💠 बरेच जन मला विचारतात की माऊली देवीला माळ परडी पोत का आहे किंवा तो का घेतात?
आदिशक्ती भगवती सर्वेश्वरीच्या अष्टोत्तरशत शक्तीपीठापैकी काही मुळ पिठांना व उपपिठांना माळ परडी पोत हे साधन आहे.
मलाही असाच प्रश्न पडत असे त्यावर मी माझ्या गुरुमाईंना विचारयचो की आक्का देवीला माळ परडी पोत का आहे बर ? आणि हे सर्व गोलच का ? त्यावर त्या म्हणत जस ब्रम्हांडातले २७ नक्षत्र आहेत तसे परडीचे २७ कट , जशी पृथ्वी गोल तशी परडीची वेज गोल ,जसा चंद्र गोल तस पशुरामपात्र गोल , जसा सुर्य गोल तसा बाण पोत गोल. हे सर्व ऐकुन डोक्यावरुन पाणी जायच पण हे उत्तर अत्यंत गुढ रहस्यानी भरलेल होत ते म्हणजे ह्या सर्व गोष्टी प्रकृतिशी निगडीत होत्या आणि साक्षात भगवतीच प्रकृतिच स्वरुप आहे म्हणुन आजही काही लोक परडीला साक्षात भगवती स्वरुप माणुन पुजा अर्चा करतात.
💠 अध्यात्मिक दृष्टीकोनातुन विचार -
अनादी अंबिका भगवती बोध परडी घेवून हाती पोत ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती गोंधळा येई वो जगदंबे मूळपीठ तू अंबे....॥धृ॥
व्यास वशिष्ठ शूक गोंधळी नाचताती सोहं मेळी द्वेतभाव विसरूनी बळी खेळती अंबे तूझे गोंधळी....॥1॥
मुकूटमणी पुंडलिक तेहत्तीस कोटी देवनायक गोंधळ घालिती सकौतुक एका जनार्दनी नाचे देख....॥2॥
असे वर्णन आपल्या वैष्णव सांप्रदायिक ग्रंथात आढळते ज्यात संत श्रेष्ठींनी भगवतीच्या माळ परडीचे विश्लेषण करताना देवीच्या परडीला बोधाचे ,पोताला ज्ञानाचे , प्रतिक माणले आहे ज्यातुन भक्तीची सांगड घालण्याचा कुळाचारच जणु ते सांगतात हे स्पष्ट होते
💠 वैदिक दृष्टीकोनातून विचार -
ज्याप्रमाणे देवी पुजनात कृपाभिलाषा प्राप्तीसाठी साधन म्हणुन षोडशोपचार, मंत्रोच्चार , जपमाळ ,आसन प्राणायाम आदि साधनांचा उपयोग करुन वैराग्यादी आचरण करुन भगवतीचे कृपासाध्य सिध्द केले जाते तसे सर्वसामान्यांना (अशिक्षित भोळ्या भाबड्या आडानि लोकांना )शक्य होत नाही म्हणुन माळ परडी पोताचे साधन आणि जोगवा म्हणजे वैराग्य भावनेच प्रतिक बनवुन भगवतीकृपा साध्य करण्याच अमोघ साधन म्हणजेच माळ परडी पोत होय.
💠 माळ परडी पोत का घेतात किंवा त्याचा कुळाचार का करावा लागतो ?
१)पुर्वीच्या काळी घरातील एखाद्या व्यक्तीला दुर्धर रोगाने ग्रासले की नवसायासे घरातील जेष्ठ व्यक्ती कुलदेवीला साकडे घालत की हा दुर्धर रोग नष्ट करावा तुझी माळ परडी पोत वागवेन सेवा करेन,तसेच काही अभिस्पित सिध्द व्हावे या अर्थाने नवस केला जात असे. त्या नवसाची पुर्ती झाल्यावर घरात कुळाचार म्हणुन माळ परडी पोत आलेला असतो ती ज्याच्या हातावर असेल ती व्यक्ती गतप्राण झाल्यावर पुढील वारसाहक्काने तो कुळाचार कायम केला जातो अशा कुळाचाराला परंपरागत कुळाचार म्हटला जातो.
२)घरातील एखाद्या व्यक्तीस संचारादी योगिक क्रिया असतील (वारे येणे अथवा संचार भरणे त्या घरातील लोक देखिल योग्य गुरुमार्गदर्शनाने विधीपूर्वक माळ परडी पोत घेऊन कुळाचार आरंभ करतात.
३)भगवतीची सेवा करण्यासाठी म्हणुन काही लोक साधन हवे असा विचार करुन आनंदाने माळ परडी पोत आदिचा स्वीकार करुन कुळाचार करतात.
माळ परडी जर घ्यायची म्हटल तर बरेच लोक आजकाल छातीवर दडपण आल्यासारख चिंतेत पडतात आमच्याकडुन पाळवणुक होते की नाही आमच्या मागे कोण सांभाळणार तीला असे म्हणुन टाळाटाळ करतात किंतु कुळाचा कुळाचार चुकवला चुकत नाही भगवतीचा घाला सर्वसामान्यांच्या बुध्दीपलीकडे आहे ती तिचा कुळाचार कोणत्या ना कोणत्या प्रकारे करवुनच घेते. म्हणुन स्व ईच्छेने जमल तर उत्तम अन्यथा सर्वेश्वरी जगदंबेच्या चागल्या वाईट शासन पध्दतीने प्रचिती आल्यावर करणे अनिवार्य होते.
💠माझी विनंती आहे सर्वसामान्य जनांना की माळ परडी पोत आपल्या संस्कृतिचा हिस्सा आहे तो डावलु नका bypass करु नका. तसेच माळपरडी हाती असणाय्रा व्यक्तींना तिरस्कृत करणे किंवा त्यांच्याकडे घृणास्पद भावनेने पहाने कदापि योग्य नाही. ज्यांच्या हाती माळ परडी आहे असे लोक केवल पाच घरचा जोगवा मागुन उदरनिर्वाह करतात तर काही लोक कुळधर्म कुळाचार आपली संकृती जपण्यासाठी अट्टाहास करतात म्हणुन त्यांचा अनादर तुमच्याकडुन घडु नये (काही अपवाद आहेत मला मान्य आहे देव देवस्थानी अथवा अन्य ठीकानी पैसे मागणे किंवा हट्ट करने सारखे प्रकार परडी हाती घेऊन करण्यात येतात पण खर सांगायच तर ज्यांच्या हातावर परडी स्वरुप साक्षात जगदंबा असेल ते लोक कधीच तुमच्याकडे पैशासाठी अथवा अन्य कारणाने हट्ट करणार नाहीत.थोडक्यात सांगायच म्हणजे कुळाचार सांभाळणाय्रा लोकांना या अशा हट्टखोर शतमुर्खांच्या रांगेत मोजु नका. त्यांचा आदर करा आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करा.)
उपरोक्त माहीती माझ्या विचारसरणीचे बोल आहेत काही तृटी असल्यास सोडुन द्या आवश्यक ते संकलित करा. सर्वेश्वरी जगदंबा आपल्या धर्म संस्कृतीचे रक्षण करण्याची ज्ञान दृष्टी सर्वांना प्रदान करो.
⚜🌹 गुरुवर्य - तुषार (माऊली )जंजिरे🌹⚜
⚜🌹सर्वम सर्वेश्वरी नमो नम:🌹⚜
🌙 llवंदे सर्वेश्वरी गुरुपरंपराम्ll🌞

टिप्पण्या