कोकण

🌴 *डोळ्यांचं पारणं फेडणारं कोकण*

 I Kokan*

💁‍♂ गोव्यापेक्षा आर्थिकदृष्टय़ा परवडणारा आणि कौटुंबिक पर्यटनासाठी शांत व सुरक्षित परिसर म्हणून कोकण हा सर्वोत्तम पर्याय आहे. विस्तीर्ण समुद्रकिनारा, फळबागा, तसेच खाण्याची रेलचेल या सर्वांमुळे कोकण इतर ठिकाणांपेक्षा वेगळे ठरते.

👉 *कोकणातील काही खास ठिकाणं :*

⛳ *गणपतीपुळे :* रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावरचे गणपतीचे मंदिर प्रसिद्ध आहे.सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात विराजलेली गणेशमूर्ती आणि जवळच पश्चिमेला अरबी समुद्र ह्यामुळे हे देऊळ आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते

🏰 *अलिबाग :* रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेले अलिबाग समुद्रकिनारे, सागरी किल्ले, विविध फळबागांनी परिपूर्ण आहे. कुलाबा किल्ला, मुरुड जंजिरा इत्यादी किल्ले तसेच अलिबाग, किहीम,नवगाव, थळ, वरसोली इत्यादी समुद्रकिनारे प्रसिद्ध आहेत.

⛄ *माथेरान :* माथेरान हे कोकणातील थंड हवेचे प्रसिद्ध ठिकाणं आहे. माथेरानमधील द लुईझा पॉईंट, हार्ट पॉईंट, मंकी पॉईंट, रामबाग पॉईंट हे पॉईंट प्रसिद्ध आहेत. आसपासचे डोंगर आणि दऱ्यांचे सुंदर दृश्य अनुभवण्यासाठी माथेरान हा सर्वोत्तम पर्याय आहे.

🛣 *माळशेज घाट :* हा घाट धबधब्यांसाठी प्रसिद्ध असून पावसाळी पर्यटनासाठी उत्तम पर्याय आहे. हायकर्स, ट्रेकर्स आणि साहसवीरांसाठी देखील माळशेज घाट पसंदीचे ठिकाणं आहे.

🌊 *दिवेआगर किनारा :* शुभ्र वाळू आणि स्वच्छ पाणी अनुभवायचे असेल तर दिवेआगरचा सागरकिनारा फिरणे हा उत्तम पर्याय आहे. पक्षी अभयारण्य तसेच सुरुची झाडं हे येथील प्रमुख आकर्षण आहे

🎯 

टिप्पण्या