घटस्थापना

🙏🏻जय श्रीराम🙏🏻

बंधू भगिनीनो ,

उद्या घटस्थापना.या निमित्ताने आपण सर्व घर दार झाडून पुसून स्वच्छ करतो  ते आवशक आहे.
 पण तसेच देवघरातील मुर्त्या बाबत खालील काळजी घ्यावी .

घटस्थापने पुर्वी देवघरातील सर्व मूर्तींना दही भातात भिजवून ठेवावे (साधारण:त ५ ते १० मिनिटे)
नंतर त्या सर्व मुर्त्या चिंचेचे कोळ भिजवून त्या पाण्यात ठेवाव्यात

आणी शेवटी भीमसेनी कापुर पाण्यात टाकून त्या पाण्यात या सर्व मूर्ती ठेवाव्यात

नंतर स्वच्छ पाण्याने धुवून कोरड्या करून पुढील पूजेसाठी तयार ठेवाव्यात

या प्रक्रियेमुळे मूर्तीवरील पवित्र संस्कार टिकून राहतात व अपवित्रता पूर्णपणे नष्ट होऊन मूर्तीतील चेतने मध्ये वाढ होते .

हि माहिती मला एका पुस्तकात मिळाली होती व माझा अनुभव आहे कि हे पूर्णपणे  सत्य आहे .

त्यामुळे आपण सर्वांनी घट स्थापने पूर्वी व गुढी पाडव्याच्या दिवशी पूजे च्या आधी हा प्रयोग आठवणीने करावा .

वर्षातून २ वेळा मूर्तीवर असे संस्कार होणे आपल्या साधनेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे
🙏🏻 जय श्रीराम🙏🏻

टिप्पण्या