राई(मोहरी) औषधि

##  राई... मोहरीचे.. औषधि उपयोग...

१)  अपचन, पोटदुखि, अजिर्णः।  मोहरीचे चूर्ण व साखर एकत्रित पाण्यासोबत घेतल्यास लगेच पोटदुखि थांबते.. मुरडा येणे थांबते.
२)  पायात काटा, अथवा काच रूतून बसल्यास मोहरिचे चूर्ण, तूप व मध याचा एकत्रित लेप लावल्यास काटा
 आपोआप वर येतो.
३)  बेशुद्ध व मिरगीने मूर्च्छा आल्यास राईच्या  चूर्णाचे नस्य केल्यास व्यक्ति तात्काळ शुद्धिवर येते.
४)  सफेद कोडः। मोहरिचे पिठ  गायिच्या जुन्या तूपात कालवून तिथे लावल्यास तिथे  रक्तसंचालन चांगले होउन मग, ते डाग दूर होतात. व  सामान्य त्वचेचा रंग येतो.
५)  तिव्र ज्वरः सर्दि, मौसमि ताप कफ असेल तर मोहरिचे चूर्ण मधासोबत थोडे थोडे देत राहावे ताप उतरतो.
६) संधिवाताचे दुखणेः  हात पाय वाकडे झाल्यास एरंडाच्या पानाला राईचे तेल लावून ते गरम करून दूखर्या जागेवर बांधावे सूज. व दुःख दुर होते.
७)  पोटातले जंतः।  मोहरिचे चूर्ण व गोमूत्र एकत्रित करून सकाळि घेतल्यास काहि दिवसात पोटातले क्रूमि मरून बाहेर पडतात.
८)  शरिरात कुठेहि गाठ आल्यास काळे मिरे व राईचे चूर्ण
 तूपात मिसळून तिथे लावल्यास ति कमि होते.
९)  रांजणवाडि, मांजोळनि बरि करण्यासाठी, मोहरिचे चूर्ण व तुप मध एकत्रित करून तिथे लावल्यास ति बरि होते.
१०)  लहान मूले अंथरूणात युरिन करतात. तेव्हा राईचे चूर्ण मधात कालवून द्यावे. सवय सुटते.
११)  दातदूखी, दातात किडः।  मोहरि थोड्या पाण्यात
 उकळवून त्याने गुळण्या केल्यास दातातलि किड मरते
  हिरड्यांचि  सूज उतरते.
१२)  मूळव्याध, बवासिरः। मोडावर, कोंबावर मोहरिचे तेल लावल्यास तो गळून पडतो.
१३)  खाज, खरुज, त्वचेचे आजारः  मोहरि गोमूत्रात वाटून त्यात थोडि हळदहि मिसळावि. मग  प्रभावित जागेवर लावावे.  व नंतर आंघोळ करून  पून्हा सरसूचे तेल लावावे. सर्व चर्मरोग बरे होतात.
१४)  मस्से, चामखिळः। मोहरिचे तेल तिथे लावल्यास मस्से गळतात.
१५) मासिक पाळि नियमित येण्याकरता मोहरिचे चूर्ण घेत राहावे.
१६)  १० ग्रँम मोहरि व २५० ग्रँम  पाणि घेउन उकळावे
 ते कोमट असताना पिल्यास न थांबणारि उचकि  थांबते.
१७) रक्ति मूळव्याधः  मेथि व मोहरि समभाग घेउन त्याचे चूर्ण करुन ते एक- एक चमचा पाण्यासोबत घ्यावे
 आराम पडतो.
१८) दमा, अस्थमा,  श्वसनविकारः  एक चतुर्थांश मोहरिचे चूर्ण, हरभर्याएवढे सैंधव मीठ, व खडिसाखर, मिसळून रोज दोन वेळा पाण्यासोबत घ्या. छातित  जमा झालेला कफ,  पातळ होउन बाहेर पडतो.
१९) अर्धशिशिः।  मस्तकशूळ उठल्यास मोहरि बारिक वाटून याचा लेप लावावा. मायग्रेनचे दुखणे बरे होते.
२०)  कानदुखिः  मोहरिचे तेल गरम करून ते दोन दोन थेंब कानात टाकल्यास बरे वाटते.
        #*#*#.....#*#*#......

टिप्पण्या