मुलं खोटं का बोलतात !

👀 *मुलं खोटं का बोलतात?*

*| Parenting*

"नेहमी खरे बोलावे!" हे अगदी पुस्तकी वाक्य वाटलं तरी हेच तर आपण लहान मुलांवर संस्कार करत असतो. आपल्याला हवं तेव्हा आपण मुलांशी खोटं बोलतो.

अगदी साधी गोष्ट, जेव्हा मुलं एखादी गोष्ट आणि त्यामागची कारणं विचारतात तेव्हा आपण आपल्या सोयीने हवे ते सांगत बसतो. असं करून आपण त्यांना खोटं बोलणं योग्य आहे किंवा कधीतरी ते चालू शकतं हेच सुचवत असतो.

👉 मुलं आपलं वागणं बोलणं पाहूनच शिकत असतात. आपलं वागणं आणि इतरांशी बोलणं हेच त्यांच्यासाठी एक प्रमाण असतं. त्यामुळे आपल्या वागण्याकडे आपलं लक्ष असणं खूप महत्वाचं असतं.

📍  *खोटं बोलण्यामागील कारणे काय?*

*1.* एकतर घरात अगदी कडक वातावरण असतं. ज्यामुळे मुलं आपल्या चुका मोकळेपणाने सांगू शकत नाहीत.

*2.* एखादी चूक जेव्हा मुलांना कळते कि, माफ होऊ शकत नाही किंवा त्या चुकीसाठी त्यांना मोठी शिक्षा मिळू शकते तेव्हा मुलं चूक लपवायला आणि खोटं बोलायला सुरवात करतात.

*3.* मोठ्यांकडून जेव्हा चुका होतात तेव्हा त्यांना शिक्षा नसते आणि जेव्हा आपण चुका करतो तेव्हा मात्र आपल्याला मार बसतो हे त्यांना कळते तेव्हा त्यांना मोठ्यांची घृणा वाटते.

*4.* खरं बोलून जर मार पडणार असेल तर मी गोष्टी लपवून किंवा खोटं बोलून वेळ साधून नेईल अशी त्यांची धारणा होऊ शकते.

💁‍♂  यापैकी काहीही घरात घडत असेल तर ते तात्काळ थांबवणे तुमचे काम आहे. "खरं बोललं तरी चालेल मी तुला मारणार नाही!" हे वाक्य त्यांना खरं बोलायला मदत करणारं ठरतं. मारणं हा काही मुलांना सुधारण्याचा पर्याय नाही याउलट त्याचा वाईट परिणाम त्यांच्यावर होऊ शकतो हे पालकांनी समजून घ्यायला हवे.

🎯 

टिप्पण्या