घरगुती उपाय- ताप

💁‍♂ *व्हायरल ताप; करा घरगुती उपाय*



हल्ली व्हायरल इन्फेक्शनमुळे आलेल्या तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. या तापाबरोबरच सर्दी, खोकला, अंगदुखीसारखे आजारही डोकेवर काढत आहेत.

या तापात रोग प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे इतरही आजारांची लागण लवकर होऊ शकते. चला तर आज व्हायरल तापाची लक्षणं कोणती? त्यावर काही घरगुती उपाय आहेत का? याविषयी जाणून घेऊयात...

----------------------
😍
----------------------

🤔 *व्हायरल तापाची लक्षणं* : घसा दुखणं, खोकला, डोकेदुखी, घसा खवखवणे, सांधेदुखी,स उलट्या आणि अतिसार सुरू होतो. याशिवाय डोळे लाल होऊन डोकं गरम व्हायला सुरुवात होते.

व्हायरल तापावर वैद्यकीय सल्ला तर घ्यावाच. पण तुम्ही काही घरगुती उपचार देखील करू शकता. योग्य आहारातून तुम्ही रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करू शकता. यामुळे तापही लवकर बरा होऊ शकतो. लिंबाचा रस आणि मध व्हायरल ताप कमी करते. घशाची खवखव थांबते. शिवाय उलट्या-जुलाबांपासून आराम मिळू शकतो.

ताप 102 किंवा त्याहून कमी असेल तर घरगुती उपचार करूनही ताप कमी करता येऊ शकतो. शरीराचं तापमान कमी होईपर्यंत रुग्णाच्या शरीरावर, कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात. दर सहा तासांनंतर पॅरासिटेमॉलची (क्रोसीन किंवा तत्सम कुठलीही जेनेरिक गोळी) एक गोळी द्यावी. असे करूनही ताप उतरला नाही तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

1) *काढा ट्राय करा* : एक चमचा लवंगांची पावडर, ताज्या आणि स्वच्छ केलेल्या तुळशीच्या पानांबरोबर एक लीटर पाण्यात टाकून उकळा. दर 2 तासांनी हा काढा प्यायला द्या. यामुळे शरीरातील सर्व बॅक्टेरिया, कीटाणू आणि अन्य विषाणू नष्ट होतात.

2) *चहा ट्राय करा* : धण्यात असलेले अँटिबायोटिक तत्त्व विषाणूंविरोधात लढण्याची शक्ती देतात. धण्याच्या बिया शरीराला व्हिटॅमिन देतात. पाण्यात एक मोठा चमचा भरून धणे उकळा. यानंतर यात थोडं दूध आणि साखर मिसळा.


टिप्पण्या