डॉक्टरांचा युनिफाँर्म निळा /हिरवा

👨‍⚕ *डॉक्टर निळ्या/हिरव्या रंगाचाच युनिफॉर्म का घालतात?*

जेव्हा आपण डॉक्टरांना भेटतो, पाहतो तेव्हा त्यांच्यासोबत विशिष्ट रंगाचं कनेक्शन आहे दिसतं. जर आपण बारकाईने लक्ष दिले तर जाणवेल डॉक्टर बहुदा सफेद, हिरव्या किंवा निळ्या रंगाच्या युनिफॉर्ममध्ये दिसतात. त्यांच्या या रंगांच्या युनिफॉर्ममागचं कारण आपण आज जाणून घेणार आहोत.

1) *सफेद रंग* : हा रंग शांततेचे व स्वच्छतेचे प्रतिक आहे. यामुळे विविध प्रकारचे रुग्ण हाताळताना डॉक्टरांना मानसिक ताण येऊ नये. शांत वाटावे म्हणून डॉक्टर सफेद रंगाचा कोट घालतात.

2) *हिरवा/ निळा रंग* : 1914 साली एका डॉक्टरने सफेद रंगाच्या डॉक्टरांच्या युनिफॉर्मचा रंगच बदलून हिरवा करुन टाकला. तर काही डॉक्टरांनी हिरव्याला निळ्याचीही जोड दिली. यामुळे तेव्हापासून डॉक्टर ऑपरेशन करतेवेळी हिरव्या तर कधी निळ्या रंगाच्या युनिफॉर्मचा वापर करू लागले.

📝 'टूडे सर्जिकल नर्स' (1998) या वैद्यकिय अहवालावर आधारित एका लेखात याबाबत सांगण्यात आले आहे.

● हिरवा रंग हा डोळ्यांना आराम देणारा असल्याने डॉक्टरांनी ऑपरेशन करताना या रंगाचा युनिफॉर्म घालण्याचे ठरवले.
● जर आपण एखाद्या गडद रंगाकडे एकटक पाहीले तर डोळ्यांना त्रास होतो. डोळे थकतात. कधी कधी डोळ्यांना सूजही येते.
● वैद्यानिक दृष्टीकोणातून विचार करता आपले डोळे हिरवा आणि निळा रंग बघण्यासाठी अधिक सक्षम आहेत.
● ऑपरेशन करतेवेळी रक्ताचा लालभडक रंग सतत बघून डॉक्टरांच्याही डोळ्यांवर ताण येतो. अशावेळी आजूबाजूला डोळ्याला आराम देणारा रंग दिसल्यास थकवा जाणवत नाही.

वरील सर्व कारणांचा विचार करून हिरव्या आणि निळ्या रंगाचा युनिफॉर्म घालणे डॉक्टर पसंत करतात.

🎯 

टिप्पण्या